स्त्रीची खरी जबाबदारी घर आहे
इस्लाम हे सुद्धा सांगतो की स्त्रीची खरी जबाबदारी, जिच्यासंबंधी ती अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. तिचे घर आहे. तिने पहिले प्राधान्य घराला द्यावयाचे आहे कारण ते तिच्या जबाबदारीत सामील आहे. ते तिच्या पतीच्या सुख-शांतीस कारणीभूत आहे, ” आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या. जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.” (दिव्य कुरआन, 30:21).
पती, त्याचे घर आणि मुलांच्या बाबतीत अल्लाहसमोर जबाबदार आहे,” तुमच्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्यांच्या बाबतीत जबाबदार आहे. स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याची मुले यांच्या बाबतीत उत्तरदायी आणि रक्षक आहे.” (हदीस : बुखारी)
”उंटावर स्वार होणार्या (अरबांच्या) स्त्रियांमध्ये सर्वोत्कृष्ट कुरैशांच्या (स्त्रिया) प्रामाणिक आणि संयमी असतात, ज्या आपल्या छोट्या मुलांच्या बाबतीत दयाळू आणि पतीच्या व्यवहारांची रक्षण करणार्या असतात.” (हदीस : बुखारी).
आर्थिक व्यवहाराकरिता सशर्त परवानगी
वरील जबाबदार्या पूर्ण करत असताना जर स्त्री आर्थिक व्यवहार करत असेल तर तिला त्याची परवानगी आहे. परंतु, ही परवानगी काही अटींच्या अधीन राहूल दिली जाते. त्यामध्ये खास करून खालील अटींवर लक्ष देणे योग्य आहे.
1) ती परक्या पुरूषांसमोर पडद्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याच्यासमोर जाताना तिला इस्लामच्या शिकवणुकीनुसार शालीन पोषाख करावा आणि पडद्याची उपयुक्त व्यवस्था करावी लागेल. ”हे पैंगबर (स.) इमानधारक स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साजशृंगार दर्शवू नये, त्या व्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल.” (दिव्य कुरआन, 24:31). ” हे पैगंबर (स.) आपल्या पत्नी व मुली आणि इमानधारकांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा, ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये.” (दिव्य कुरआन , 33:59).
2) हावभाव व बोलण्यात मृदुपणा नसावा आणि बेधडक बोलण्यापासून वाचले पाहिजे ज्यामुळे चारित्र्यहीनतेचे रस्ते मोकळे व्हावेत. ” हे पैगंबर (स.) च्या पत्नीनों! तुम्ही सामान्य स्त्रियांप्रमाणे नाहीत, जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगणार्या असाल तर हळू आवाजात बोलत जाऊ नका की विकृत हृदयाचा एखादा माणूस लालसेत पडेल, तर स्पष्ट सरळ आवाजात बोला.” (दिव्य कुरआन, 33:32)
3) ज्याच्याशी लग्नसंबंध होऊ शकतो अशा कोणत्याही पुरूषांबराबर (स्त्रीने) एकांतात राहू नये. स्त्री आणि लग्नसंबंध होऊ शकेल असा पुरूष एकांतात राहतील तर त्यांच्याबरोबर तिसरा सैतान असतो.” (हदीस : मुसनद अहमद).
4) कामाची दशा आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती अशी असू नये, ज्यामध्ये तिच्या स्त्रीसंबंधीच्या दुर्बलता, आवश्यकता आणि शरीअतच्या गरजांचा संकोच होऊ नये. हे तत्त्व कामाच्या वाटणीने, ज्याची चर्चा मागे झाली आहे, स्पष्ट आहे. या अटीच्या परिणामामुळे भांडवलवादी शक्तींना शोषणाची संधी मिळत नाही, जी व्यवसाय आणि स्त्रियांच्या बरोबरीच्या नावावर केली जात आहे.
नग्नता आणि अश्लीलतेसंबंधी
इतिहासाच्या प्रत्येक काळात अश्लीलता भांडवलदाराचे हत्यार राहिले आहे. देहव्यापार एक फार प्रसिद्ध व्यवसाय आहे. म्हणून इस्लामने अश्लीलता आणि देहव्यापाराचे निर्मुलन करण्यासाठी विशेष उपाय योजले आणि मुळापर्यंत जाऊन त्याचे दरवाजे बंद केले. इस्लामने स्वेच्छा आणि व्यापारी आधारावरील प्रत्येक प्रकारच्या शरीर संबंधास अवैध ठरविले आहे, जे विवाहबाह्य आहे. अवैध शरीरसंबंधास दंडनीय गुन्हा ठरविला आहे आणि कठोर शिक्षेची तरतूद केली आहे, इतकेच नव्हे तर यापुढे जाऊन त्यास कारणीभूत होणार्या प्रेरक तत्वांना निषिद्ध ठरविले आहे.
फक्त व्याभिचारच नाही तर अश्लील चित्रे, अश्लील साहित्य, अश्लील संभाषन, अश्लील विचारापर्यंत सर्व प्रकारच्या अश्लीलतेचा इस्लामने पूर्णपणे निषिद्ध केले आहे.
”अल्लाह न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो, आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो. तो तुम्हाला उपदेश करतो जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा.” (दिव्य कुरआन, 16:90). ” हे पैगंबर (स.) यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने ज्या वस्तू निषिद्ध केल्या आहेत त्या तर अशा आहेत, निर्लज्जपणाची कामे मग ती उघड असोत अथवा गुप्त आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार कराल ज्याच्या संबंधात त्याने कोणतेही प्रमाण उतरविले नाही, आणि असे की अल्लाहच्या नावाने तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगावी जिच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नसेल (की ती खरोखर त्यानेच फर्माविले आहे).” (दिव्य कुरआन, 7:33). ”हे पैगंबर (स.) यांना सांगा की, ” या मी तुम्हाला ऐकवितो की तुमच्या पालनकर्त्याने तुमच्यावर काय निर्बंध घातले आहेत. व अश्लील गोष्टीच्या जवळपासदेखील फिरकू नका. मग त्या उघड असोत अथवा गुपित.” (दिव्य कुरआन, 6:151)
अश्लीलतेचे दरवाजे इस्लाम किती कणखरपणे बंद करतो याचा अंदाज या हदीसने होतो. पैगंबर मुहम्मद (स.)म्हणाले, ” डोळ्याच्या व्याभिचार पाहणे आहे, जीभेचा व्याभिचार बोलणे आहे आणि मनाचा व्याभिचार इच्छिणे आहे, जननेंद्रिय त्याची पूर्तता करतो किंवा त्यास नकार देते.” (हदीस : बुखारी).
पाहण्याची मनाई फक्त वस्तू व अवयवापर्यंतच मर्यादित नाही. चित्र, व्हीडिओ, वेबकॉन्फरन्स इत्यादींचासुद्धा त्यात समावेश आहे. कोणत्याही स्त्रीच्या आकाराचे विस्तृत वर्णन करणे किंवा तिच्या छुप्या सौंदर्याचे चित्रांकन करणे हेसुद्धा इस्लाम पसंद करत नाही.
”कोणत्याही स्त्रीने एखाद्या स्त्रीचे आपल्या पतीसमोर (तिच्या) आकाराचे असे वर्णन करू नये जणूकाही तो तिला समोर पाहात आहे.” (हदीस : बुखारी).
ज्या व्यापारामार्फत अश्लीलतेचा प्रचार-प्रसार तो व्यापार इस्लाम निष्क्रिय ठरवितो. जी व्यक्ती व्यापार, जाहिरात किंवा कोणत्याही माध्यमातून लोकांमध्ये अश्लीलतेचा प्रसार करते, पवित्र कुरआन त्या व्यक्तीस कठोर यातनेचा इशारा देतो.
” जे लोक इच्छितात की इमानधारकांच्या समुदायात अश्लीलता पसरावी ते लोक इहलोकात व परलोकात दु:खदायी शिक्षेस पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही.” (दिव्य कुरआन, 24:19).
पोर्नोग्राफी (अश्लील साहित्य, फिल्म वगैरे) अथवा याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचा व्यापार निषिद्ध आहे. यातील कोणत्याही व्यापाराला कसल्याही प्रकारची मदत निषिद्ध आहे. अशा कंपनीचे शेअर विकत घेणे निषिद्ध आहे. ज्या कोणाचे थोडे भांडवल या व्यापारात लागले असेल तेही निषिद्ध. एखादी व्यक्ती इंटरनेटचा कॅफे चालवित असेल तर त्याने आपल्या कॅफेमध्ये चुकीची साईड पाहिली जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे. ” जेव्हा अल्लाह कोणत्याही गोष्टीची मनाई करतो तेव्हा त्याची किंमत (घेणे आणि देणे) याससुद्धा मनाई करतो.” (हदीस : मुसनद अहमद, अबु दाऊद).
याप्रमाणे इस्लामने अश्लीलतेच्या उद्योगधंद्यात सहभागी असणारे, विकत घेणारे, त्यामध्ये भांडवल लावणारे आणि त्यांची कोणत्याही प्रकारे मदत करणारे अशा सर्वांचे रस्ते बंद केले आहेत. देहव्यापार तर इस्लामी समाजात अजिबात चालू शकत नाही. पवित्र कुरआनने दासींकडून असे काम करविणे (याची त्या काळातील सदाचारी लोकांतही प्रथा होती) यास मनाई केली आहे.
”आणि आपल्या दासींना आपल्या ऐहिक लाभापोटी वेश्या व्यवसायासाठी अगतिक करू नका. जेव्हा त्या स्वत: सच्चरित्र राहू इच्छित असतील.” (दिव्य कुरआन, 24:33.) क्रमश:
0 Comments