‘निकाह को आसान करो’ मोहीम : मौ. अब्दुल कवी फलाही यांचे प्रतिपादन
आकुर्डी (वकार अहमद अलीम) – ”अन् निकाह मिन् सुन्नती” निकाह करणे ही माझी कार्यधारणा आहे, असे प्रेषित ह. मुहम्मद (सल्ल.) यांचे वचन आहे (हदीस) म्हणजेच ’सुन्नत’ आहे. प्रत्येक सुन्नत (अनुकरण) ही एक उपासना आहे. नमाज, रोजा, जकात आदी यासुद्धा उपासना आहेत. उपासना करण्याची जी पद्धत इस्लामने शिकविली आहे त्याप्रमाणेच ती उपासना केली पाहिजे. प्रेषितांनी दाखविलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने जरी विविध उपासना केल्या तरी त्या उपासना होऊ शकत नाही. निकाहसुद्धा एक ’उपासना’ आहे. मात्र ती सुद्धा प्रेषित ह. मुहम्मद (सल्ल.) यांच्या आदेश आणि पद्धतीनुसारच झाली पाहिजे तरच ती उपासना म्हणून इस्लामला मान्य होईल व त्याचे परिणामसुद्धा अतिशय फलदायी होतील. म्हणून समस्त मुस्लिमांनो! निकाहला उपासना समजून, अतीशय सोप्या पद्धतीने ती करावी, असे भावस्पर्शी आवाहन मौलाना अब्दुल कवी फलाही यांनी येथे केले.
पुणे स्थित आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे रविवार 13 जानेवारी 2019 रोजी, सायंकाळी 6.30 वाजता ”निकाह को आसान करो” या मोहिमे अंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शोब-ए-खवातीन जमाअत-ए- -(उर्वरित पान 7 वर)
इस्लामी हिंद (महिला शाखा), एस.आ. ओ., जी.आय.ओ. पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन कण्यात आले होते. 13 ते 20 जानेवारी पर्यंत, संपूर्ण पूणे जिल्ह्यात, मोहेमीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी, अध्यक्षीय समारोप करताना मौ. अब्दुल कवी बोलत होते.
’निकाह’ इस्लाममध्ये केवळ प्रेषित आचरण नव्हे तर अनिवार्य कर्तव्य (फर्ज) ही आहे. निकाहमुळेच समाजात दृष्टीची जपणूक होते. निकाहमुळे स्त्री, पुरूष, समाजाचा एक आवश्यक भाग, बेसिक युनिट बनतात. घरगृहस्थी त्याचा पाया आहे. निकाहमुळेच एका सभ्य घराची, समाजाची स्थापना होते. पण निकाह हे केवळ रितीरिवाजाचे नाव नसावे तर ते एक ईश्वरी आदेशानुसार एक उपासना असावी, अशी अपेक्षा व्यक्त करून, मौलाना कवी म्हणाले, ’निकाह’ मुळे इतके फायदे समाजाला मिळतात, म्हणूनच निकाहला ’आसान’ केले पाहिजे. यासाठीच जमाअतच्या महिला विभागकडून आयोजलेली ही मोहिम, प्रशंसनीय आहे, असेही मौलानांनी सांगितले.
समाजामध्ये निकाह (विवाह) एक समस्या होत चालली आहे. दहेज, कपडा-लत्याची रक्कम, मंगनी आणि वेगवेगळ्या रिती-रिवाजामुळे ’निकाह’ ला अवघड व दुष्प्राप्य बनविले गेले आहे. यावेळी प्रस्तावनेमध्ये ”निकाह ला इतके सोपे करा की ़िजना (व्याभिचार) करणे अशक्य व्हावे”. अनावश्यक रिती-रिवाज विरूद्ध जनजागृती करणे हाच या मोहिमेचा उद्देश असल्याची ग्वाही, महिला विभाग प्रमुखाद्वारे, प्रास्ताविकेत स्पष्ट करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहर, उलेमा कौन्सिलचे सेक्रेटरी, मौलाना नय्यर नूरी साहेबांनी, ”निकाह को आसान करो” हा संदेश नवीन नाही, प्रेषित ह.मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या आयुष्यातच केवळ याची उद्घोषणाच केली नाही तर, प्रात्यक्षिकरित्या कृतीसह ते सिद्ध करून दाखविले. मुस्लिम समाज, प्रेषितांच्या कृतीला (आचरणाला) सुन्नत समजतो पण त्याची अंमलबजावणी करीत नाही. निकाहची सुन्नत अंमलबजावणीसाठी मोठ्या हॉलची जरूरी नाही. मस्जिदमध्ये निकाह व्हावा. वायफळ खर्च न करता, निकाह साधेपणाने झाले तर सामाजिक गरीबीचे उच्चाटन होऊ शकते असा आशावाद ही मौ. नूरी यांनी व्यक्त केला.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य,मौ. निजामुद्दीन फख्रुद्दीन यांनी, निकाह अजमत (सन्माननीय) आणि बरकतवाला असल्याचे सांगून, आजकाल लग्नासाठी महागड्या निमंत्रण पत्रिका तयार करण्याच्या ’फॅशन’ची टर उडविताना सांगितले की, प्रेषित सल्ल. यांचे सहकारी आपल्या लग्नात, प्रेषितांना सुद्धा आमंत्रित करीत नसल्याचीही काही उदाहरणे इस्लामी इतिहासामध्ये आहेत.
नकीबे मिल्लत, पिंपरी चिंचवड शहराचे मौ. मुहम्मद अलीम अन्सारी यांनी, प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हे जगाचे ’रोल मॉडेल’ आहेत. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. खरेच आमचे जीवन प्रेषित सल्ल. यांच्या आदेशानुसार आहे का? हे पहावे. इस्लामी शरियत शिवाय होणारी प्रत्येक कृती ही बरबादी आहे, असा रोखठोक इशारा यावेळी मौ. अन्सारी यांनी दिला.
आता जगात तो सर्वश्रेष्ठ मानवी समुह तुम्ही (मुस्लिम) आहात, तुम्हाला समस्त जगवासियांच्या मार्गदर्शनासाठी आणि सुधारणा करण्यासाठीच अस्तित्वात आणण्यात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता, दुराचापासून रोखता, असे कुरआनच्या आयातींद्वारे आवाहन करून, जमाअत-ए-इस्लामी हिंद, पुणे विभागाच्या प्रमुख नाजिमा सईद साहेब यांनी, ’निकाह’ याची व्याख्या स्पष्ट केली. अनोळखी पुरूष आणि स्त्री, यांनी सन्मानाने जीवन व्यतीत करणे म्हणजे ’निकाह’ होय. निकाह हा अश्लिलता, व्याभिचार आदी सामाजिक दुर्व्यवस्थेपासून दूर ठेवतो. केवळ निकाहमुळेच समाजाची योग्य पद्धतीने सुधारणा होऊ शकते असे सांगून नाजेमा यांनी निकाहाची कारण मिमांसा स्पष्ट केली. यहूदी संपत्तीमुळे निकाह करतात, ईसाई सौंदर्यामुळे निकाह करतात, पण प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना मानन्यार्यांनों, तुम्ही केवळ ’दीनदारी’ (धर्माचरण) वर निकाह करा. यामुळेच समाजात नितीमत्ता, चारित्र्य आदी गुणांची वाढ होते व सामाजिक सुधारणा होते.
सूत्रसंचालन अजिमुद्दीन यांनी करताना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. पुणे जिल्ह्याचे जमाअत-ए-इस्लामी हिन्दचे, नाजीमे शहर डॉ. उमर फारूख यांनी उपस्थितांचे आभार मानले. जवळपास साडेतीन तास, अत्यंत शांतपणे स्त्री, पुरूषांनी विषय समजावून घेतला.
0 Comments