Home A blog A जेव्हा आपला आत्मा जन्मापुर्वीच एका ईश्वराला मानतो तेव्हा आता का नाही?

जेव्हा आपला आत्मा जन्मापुर्वीच एका ईश्वराला मानतो तेव्हा आता का नाही?

सीमा देशपांडे – 7798981535
ईश्वराने मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून  त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे  पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने  त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले  तुमचा स्वामी कोण आहे?  सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले  निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात.   व मग त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर  शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही  मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .
    जेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी समर्पित  होवुन जाते. जेव्हा की  हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते? कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास  ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच,  सर्वात भयानक म्हणजे  ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही… म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व  त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची  उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची? असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत?
    त्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राहीले तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा.  नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय? खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय? मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे  परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्‍लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय?
    तुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित? काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी.  एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा? अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा? काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा? पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे  ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्‍चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु!)
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *