Home A blog A उपभोक्ता आणि आर्थिक दडपण

उपभोक्ता आणि आर्थिक दडपण

भांडवलशाही साम्राज्याने उपभोक्तावाद (कन्झुमरिझम) आणि भोग-विलासाची जी मानसिकता तयार केली, तिचा सर्वात अधिक परिणामसुद्धा स्त्रियांवरच होतो.
जाहिराती सर्वात जास्त स्त्रिया (आणि मुले) यांनाच उद्देशून तयार केल्या जातात. जीवनस्तराची स्पर्धा मानसशास्त्रीय स्वरूपात स्त्रियांमध्येच जास्त असते. जेव्हा जाहिरातींद्वारा कृत्रिम स्वरूपात जीवनस्तराला उंचावण्याची विचारसरणी निर्माण केली जाते आणि उपभोक्तावादाचे दडपण सातत्याने निर्माण केले जाते, तेव्हा त्यांचा नुकसानकारक प्रभाव सर्वात जास्त स्त्रिया ग्रहण करतात.
उपभोक्तावाद आणि उधळपट्टीची प्रवृत्ती वाढून मानसिक रोगाच्या स्वरूपात ग्रहण होते. मानसिक रोगाच्या विशेषज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे, हळूहळू मनुष्यास खरेदी आणि खर्च करण्याचे व्यसन तसेच लागते जसे नशेचे व्यसन. मुंबईचे एक मानसशास्त्रज्ञ डॉ. असीत सेठ यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराच्या रोग्याचा मेंदू वस्तूंची खरेदी केल्यामुळे एक प्रकारचा रासायनिक पदार्थ उत्सजित करतो. त्या पदार्थाचे नाव एन्डोर्फिन्स आहे. या पदार्थामुळे माणसाला हळूहळू खरेदी करण्याचे व्यसन लागते. आवश्यक असो वा नसो शॉपिंग मॉलमध्ये जाऊन बेहिशोब खरेदी केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. पैसे नसतील तर तो कर्ज घेऊन खरेदीसाठी जात असतो आणि अगदी दारूड्यांप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत तो आपले व्यसन पूर्ण करतो. म्हणून जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation W.H.O.) आणि डॉक्टर या रोगाला पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर (Pathological Disorder) असे नाव देतात. या रोगाला स्त्रिया अधिक बळी पडतात.
    मागील काही वर्षापासून आपल्या देशात खुशाल आणि शिकल्यासवरलेल्या स्त्रियांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढली आहे. विशेषज्ञ या प्रवृत्तीलासुद्धा उपभोक्तावाद आणि उच्च जीवनस्तराचे दडपण आणि त्याशी संबंधित तणाव यांच्याशी कारणीभूत असल्याचे सांगतात. उपभोक्तावाद व भोग-विलासपूणर्ण चंगळवादी जीवनशैली यामुळे मोटार गाड्या, फ्लॅट्स आणि ब्रँडेड कपडे आणि पादत्राणे यांच्या प्रतिस्पर्धेचे असे व्यसन लागले आहे की या स्पर्धेत उतरून सुख-चैन हरवून बसले आहेत.
    सहा महिन्यांचे गरोदर, 24 वर्षाची सुजाता फास लावून आत्महत्या करते. त्याचे कारण हा विचार होता की तिचा पती एम.एन.सी. (M.N.C.) मध्ये मॅनेजर असून त्याची आर्थिक स्थिती इतकी सुधारली नव्हती की तिचे होणारे बाळ चांगले आयुष्य जगू शकले नसते. 25 वर्षाच्या संगतीच्या आत्महत्येचे कारण हे होते की तिच्या सर्व मैत्रिणींमध्ये तीच अशी एकटी होती की तिच्याजवळ स्वतःचा फ्लॅट नव्हता.
    आकडेवारीवरून समजते की संपूर्ण जगामध्ये शिकल्यासवरलेल्या तरूण स्त्रियांच्या आत्महत्येची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जेव्हा एक स्त्री आत्महत्या करते तेव्हा 20 स्त्रिया आत्महत्येचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनाचे (World Health Organisation W.H.O.) चे म्हणणे आहे की पुढील दशकात डिप्रेशन (नैराश्य) स्त्रियांचा सर्वात मोठा मारेकरी असेल. इ.सन 2001 च्या रिपोर्टनुसार जगभराच्या शहरी तरूण स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य रोग यु.डी.डी. (युनिपोलार डिप्रेशन डिसऑर्डर) अर्थात निरंतर थकवा आणि घाबरटपणाची स्थिती असेल. मानसशास्त्रज्ञ या रोगाचे मोठे कारण लोभ, भोगविलास आणि उपभोक्तावाद सांगतात. या रोगाने जगामध्ये 1.86 टक्के स्त्रिया प्रभावित होऊन लाचार होतात.
    ही संख्या हार्ट अ‍ॅटॅक आणि कॅन्सरपेक्षा अधिक आहे. मुंबईच्या डॉक्टरचे म्हणणे आहे की सुखसंपन्न घरातील स्त्रिया आणि नोकरी करणार्‍या महिला दिवस पूर्ण करण्यासाठी ’अल्पराजोलाम’ सारख्या तणाव प्रतिबंधक गोळ्या (अ‍ॅन्टी अ‍ॅन्झायटी ड्रग्ज) वर अवलंबून असतात. या स्त्रिया गोळ्या पाण्याप्रमाणे घेतात. 30 वर्षाची सुजाता द्विेवदी एका वेळी 30-30 गोळ्या खात असते. एके दिवशी निद्रानाशाला कंटाळून तिने 200 गोळ्या खाल्ल्या आणि हॉस्पिटलमध्ये ती जागा झाली.
    या उपभोक्तावाद आणि जीवनस्तराच्या (स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग) स्पर्धेमुळे हुंड्यासारख्या शापाचा जन्म झाला. आता नववधूला जाळण्याचे अमानवी कर्म परंपराप्रिय अशिक्षित घराण्यापर्यंतच मर्यादित राहिलेले नाही, तर इंग्रजी बोलणार्‍या सुशिक्षित आणि सुखवस्तू घराण्यातल्या पत्नी जाळल्या जात आहेत. आय.ए.एस. अधिकार्‍याची आय.ए.एस. पत्नीसुद्धा हुंड्यासाठी छळाला बळी पडते. दिल्ली महिला आयोगानुसार त्यांच्याकडे येणार्‍या तक्रारींमध्ये 10 टक्क्यांचा संबंध समाजाच्या अत्यंत सुखसंपन्न आणि सभ्य वर्गाशी असतो.
    या उपभोक्तावादाने (चंगळवादाने) निर्माण केलेल्या अमर्याद चैनीच्या जबर इच्छेमुळे मनुष्य वस्तू आणि रूपया – पैशाच्या मागे वेडा होतो. हे कधी भ्रष्टाचाराच्या रूपात प्रकट होते तर कधी हुंड्यासारख्या हिंसक मागण्यांच्या स्वरूपात प्रकट होऊन, सर्व काही असतांनासुद्धा आणखी अधिक भुकेमुळे सुनांना जाळून टाकले जाते.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *