अन्याय हा सुद्धा केला की, समाजाच्या आणखीन एका मोठ्या भागाला योग्य आणि उपयोगी कामापासून हटवून अशिष्ट, अपमानजनक आणि हानिकारक कामामध्ये लावून दिले आणि सभ्यतेच्या गतीला योग्य मार्गाशी वेगळे करून अशा मार्गाकडे वळवून दिले जे मानवांना भ्रष्टतेकडे घेऊन जाणारे आहेत. मग या बाबीचा अंत तिथेच झाला नाही. मानव संपत्तीला नष्ट करण्यासोबतच त्यांनी भौतिकसंपत्तीचा अयोग्य प्रकारे उपयोग केला. त्यांना महालांची, फुलवाडयांची, मनोरंजनाच्या स्थळांची, नाचघरांची आदीची गरज पडली, इथपर्यंत की मेल्यानंतर जमिनीवर या महाशयांना शेकडो एकर जमीन आणि अलिशान भावनांची गरज भासली. या प्रकारे ती जमीन, ते निर्मितीचे सामान, तो मानवी श्रम जो अनेक लोकांच्या राहण्याचा प्रबंध करण्यासाठी पुरेपूर होता. एकेका विलासी माणसाच्या आवास आणि स्थायी ठिकाणावर लावला गेला. त्यांना आभूषणांची, उत्तम वस्त्रे, उत्कृष्ट यंत्र, भांडी, शृंगार आणि साज सज्जतेचा वस्तू, शानदार सवारी आणि न जाणो कोणकोणत्या वस्तू ची गरज भासली. इथपर्यंत की या अत्याचारर्यांचे दरवाजे सुद्धा किमती पडद्या वीणा विवस्त्र समजले जात होते, त्यांच्या भिंती सुद्धा शेकडो आणि हजारो रुपयांच्या चित्रांनी सुसज्जित झाल्या शिवाय राहू शकत नव्हत्या, त्यांच्या खोल्यांची जमीन सुद्धा हजारो रुपयांची कालीन पांघरु इच्छित होती. त्यांच्या कुत्र्यांना देखील मखमली गाद्या आणि सोन्याच्या पट्ट्यांची गरज होती. या प्रकारे ती खूप अशी सामुग्री आणि प्रचुर मानवी श्रम जे हजारो लोकांचे शरीर झाकण्यासाठी आणि पोट भरण्याच्या कामी येऊ शकत होते, त्यास एक एका व्यक्तीच्या विलासिता आणिअय्याशितेवर लावून दिले गेले. हा सैतानी मार्गदर्शनाच्या एका भागाचा परिणाम होता. दुसऱ्या मार्गदर्शनाचे परिणाम या पेक्षा अधिक भयानक आहेत. हा सिद्धांत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात त्याच्या आपल्या गरजेपेक्षा जास्त जीवीकांची साधने असलेली असतील तर त्यांना तो एकत्रित करत चालला आणि मग अधिकजिविकेची साधने प्राप्त करण्यासाठी वापर करीत राहिला. हे तर स्पष्ट व चुकीचे आहे. विदित आहे की ईश्वराने जीवीकेची जी सामग्री पृथ्वीवर निर्माण केली आहे तिला सजीवांच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केले आहे. तुमच्याजवळ सुदैवाने आज जर अधिक सामग्री आलेली आहे तर तो दुसऱ्यांचा वाटा होता, जो तुमच्या पर्यंत पोहोचलेला आहे. याला एकत्र करण्यास कुठे चालले आपल्या चौफेर बघा लोक, सामुग्रीतून आपला वाटा प्राप्त करण्यास अयोग्य दिसतील किंवा त्यास प्राप्त करण्यात असफल राहुल गेलेले असतील किंवा ज्यांनी आपल्या गरजेपेक्षा कमी मिळविलेआहे, समजून घ्या की हेच ते लोक आहेत त्यांचा वाटा तुमच्या पर्यंत पोहोचला आहे. ते प्राप्त करू शकले नाही तर तो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्या. हे योग्य काम करण्याऐवजी तुम्ही त्या माणसांना आणखी अधिक आर्थिक संसाधन प्राप्त करण्यासाठी उपयोग कराल तर हे चुकीचे काम होईल. कारण कोणत्याही परिस्थितीत ती अतिरिक्त सामग्री जी तुम्हीमिळवाल तुमच्या गरजेपेक्षा आणखी जास्त होईल. मग यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करत राहणे आणि आम्ही आपल्या वाढीव इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे यापेक्षा अधिक भ्रष्टतेचा मार्ग कोणता असू शकतो. जिविकेच्या वस्तू प्राप्त करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचा वेळ,श्रम आणि योग्यतेचा जितका भाग आपल्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करता त्याचा व्यय तर उचित रूपात होत असतो. पण या मौलिक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंना या कामात लावण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आर्थिक पशु नव्हे तर धन निर्माण करण्याचे यंत्र बनत अहात. परंतु तुम्हाला वेळ, श्रम, मानसिक आणि शारीरिक शक्तीसाठी अर्थोपार्जनाशिवाय आणखीन चांगली कामे सुद्धा आहेत. बुद्धी आणि निसर्गाच्या प्रमाणानुसार हा सिद्धांत संपूर्ण चुकीचा आहे. जो सैतानाने आपल्या शिष्यांना शिकविला आहे. परंतु या सिद्धांताच्या आधारावर ज्या व्यापारीक पद्धती बनविल्या गेल्या आहेत त्यांचे परिणाम इतके भयानक आहेत की त्यांचा योग्य अंदाज करणे अत्यंत कठीण आहे.
गरजेपेक्षा जास्त अर्थसाधनांना व अधिकाधिक संसाधनांनी ताब्यात आणण्यासाठी उपयोग करण्याचे दोन प्रकार आहेत.
या साधनांना व्याजावर कर्ज दिले त्यांना व्यापारी आणि औद्योगिक कार्यामध्ये लावले जावे. या दोन्ही विधी जर निसर्गात एक दुसऱ्या पेक्षा वेगळे जरूर आहेत. परंतु दोन्हीचा संयुक्त रूपाने व्यवहरात असण्याचा स्वाभाविक परिणाम हा होत असतो की समाज दोन्ही वर्गामध्ये विभागला जातो.एक तो अल्प वर्ग जो आपल्या गरजांपेक्षा अधिक संसाधन बाळगतो आणि आपल्या साधनांना आणखी संसाधन प्राप्त करण्यासाठी लावून देतो दुसरा तो मोठा वर्ग जो आपल्या आवश्यकतेनुसार किंवा त्यापेक्षा कमी संसाधन ठेवत असतो किंवा काहीच ठेवत नाही या दोन्ही वर्गाचे हित फक्त एक दुसऱ्यांच्या विरुद्धच राहत नाही तर त्यांच्यात संघर्ष आणि वाद उभा राहात असतो. अशा प्रकारे मानवाची अर्थव्यवस्था निसर्गाने विनिमय आणि पारंपारिक देवान-घेवाणाला ज्याचा आधार वाढविला होता. तो एक प्रकारे पारस्परिक युद्धात स्थापित होऊन राहून जातो. मग हा संघर्ष इतका वाढत जातो की, श्रीमंत वर्ग संख्येत कमी आणि गरीब वर्ग अधिक होत जातो, कारण हा संघर्ष आहेच काही अशा प्रकारचा की जो जास्त श्रीमंत आहे तो आपल्या धनाच्या जोरावर कमी धनवान लोकांचे संसाधन सुद्धा ओढून घेतो आणि त्याला गरीब वर्गात लोटून देतो. याप्रकारे पृथ्वीचे आर्थिक संसाधन दिवसेंदिवस लोकसंख्येच्या कमीत कमी भागाजवळ जमा होते आणि दिवसेंदिवस लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग गरीब किंवा धनवानांचा आश्रित होत जातो.
प्रारंभी हे युद्ध आणि संघर्ष लहान प्रमाणावर सुरू होते. मग वाढत वाढत देश आणि राष्ट्रापर्यंत पसरते. इथ पर्यंत कि सर्व जगाला आपल्या सापळ्यात घेऊन सुद्धा त्याचे पोट भरत नाही. प्रकार हा आहे की जेव्हा एका देशाचा सार्वत्रिक कायदा हा होऊन जातो की ज्या लोकांजवळ आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त धन असेल त्यांनी आपला अतिरिक्त माल लाभकारी कामांमध्ये लावावा आणि हा माल गरजेच्या सामग्री निर्माणावर खर्च व्हावा. तर त्यांच्या लावलेल्या पूर्ण रकमेचे लाभा सोबत परतणे या गोष्टीवर अवलंबून असते की जितक्या वस्तू देशात तयार झाल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व त्याच देशात विकत घेतल्या जाव्यात. परंतु व्यवहारतः असे होत नाही आणि वास्तवात हे होऊही शकत नाही. कारण गरजेपेक्षा कमी माल ठेवणाऱ्यांनाची क्रयशक्ती कमी असते आणि आवश्यकतेपेक्षा जास्त धन ठेवणाऱ्यांना ही चिंता असते की, जितकी मिळकत व्हावी त्यातून एक भाग वाचवून लाभकारी कामात लावावा. यासाठी ते आपले सर्व धन खरेदीवर खर्च करत नाहीत. या प्रकारे अनिवार्य रुपाने तयार केलेल्या मालाचा एक भाग न विकता राहून जातो. याचा दुसरा अर्थ हा आहे की भांडवलदारांनी लावलेल्या रकमेचा एक भाग न गुंतविता राहून गेला आणि ही रक्कम देशाच्या उद्योगावर कर्ज म्हणून राहिली. ही केवळ एका चक्राची परिस्थिती आहे. तुम्ही अनुमान करू शकता की अशी जितकी चक्रे होतील त्यातून प्रत्येकात श्रीमंत वर्ग आपल्या प्राप्त आवकेचा एक भाग पुन्हा लाभकारी कामांमध्ये लावत जाईल, आणि जी रक्कम परत मिळण्यापासून राहिलेली आहे त्याचे प्रमाण प्रत्येक चक्रात वाढत जाईल. तसेच देशाच्या उद्योगावर अशा कर्जाचे ओझे दुप्पट, चौपट, हजारपट होत जाईल. ज्याला तो देश स्वतः कधीही फेडू शकत नाही. आज सर्वत्र हीच परिस्थिती आहे. या प्रकारे एका देशाला दिवाळखोरीचा जो धोका येऊन उभा राहतो त्यापासून वाचण्याचा उपाय याशिवाय काही नाही की जितका माल देशात विकण्याचा राहून जातो त्याला दुसऱ्या देशामध्ये नेऊन विकावा. म्हणजे असे देश शोधावेत ज्यांच्याकडे हे देश आपल्या दिवाळखोरीला स्थलांतरित करून टाकतील. या प्रकारे हे युद्ध किंवा संघर्ष देशांच्या सीमा पार करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पाय ठेवतात. आता हे स्पष्ट आहे की कोणी एक देश असा नाही की जो या सैतानी व्यवस्थेवर चालत असेल. जगाच्या सर्वच देशांची ही स्थिती आहे. ते स्वतः आपल्याला दिवाळखोरी पासून वाचविण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दांत आपल्या दिवाळखोरीला एखाद्या दुसऱ्या देशा वर टाकून देण्यासाठी विवश झाले आहेत. या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धा सुरू होते आणि ती काही रूपामध्ये विभागली जाते.
1- प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय बाजारात आपला माल विकण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी लागवडीवर अधिकाधिक माल तयार करावा या उद्देशाने कर्मचाऱ्यांचे वेतन खूप कमी ठेवले जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारात देशाच्या सामान्य जनतेला इतका कमी वाटा मिळतो की तिच्या मौलिक गरजाही पूर्ण होत नाहीत.
2- प्रत्येक देश आपल्या सीमेत आणि त्या क्षेत्रात जे त्याच्या प्रभावात असतात दुसऱ्या देशाचा माल येण्यावर प्रतिबंध लावतो. कच्च्या मालाच्या उत्पादनाची जितकी साधने त्याच्या अधिकारात आहेत त्यांच्यावरही पहारा बसवितो, कारण दुसरा त्यापासून लाभ घेऊ शकणार नाही. याने आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होतो. याचा परिणाम युद्ध आहे.
3- जे देश या दिवाळखोरीच्या संकटाला आपल्या डोक्यावर येण्यापासून रोखू शकत नाहीत त्यांच्यावर लुटारू तुटून पडतात आणि फक्त आपल्या देशाचा उरलासुरला माल त्यांच्यात विकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर ज्या धनाला स्वतः आपल्या इथे लाभकारी कामांमध्ये लावण्याची आवश्यकता राहत नाही, त्यालाही या देशामध्ये नेऊन लावतात. याप्रकारे शेवटी त्या देशांमध्येही हीच समस्या निर्माण होऊन जाते जो प्रारंभी पैसा लावणाऱ्या देशांमध्ये निर्माण झाली होती. म्हणजे जितका पैसा तिथे लावला जातो तो सर्वच्या सर्व वसुली होऊ शकत नाही त्या पैशाने जितकी मिळकत होते तिचा एक मोठा भाग पुन्हा त्यापेक्षा अधिक लाभकारी कामांमध्ये लावून दिला जातो इथपर्यंत की त्या देशावर कर्जाचे ओझे इतके वाढत जाते की त्या देशात स्वतःस विकून दिले गेले तरी सुद्धा लावलेल्या एकूण रकमेची परतफेड होऊ शकत नाही.
(क्रमशः, भाग – २)
-अब्दुल मजीद खान
नांदेड, Mob. 9403004232
0 Comments