Home A परीचय A आज्ञाधारकता आणि कुरआन

आज्ञाधारकता आणि कुरआन

अल्लाहची भक्ती (उपासना, पूजा) हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आहे. यासाठी प्रेषितांची नियुक्ती केली. असे कार्य (अल्लाहची भक्ती) अनिश्चित आणि अपरिपक्व स्वरूपाचे असू शकतच नाही. हे फक्त पूजापाठ अथवा उपासनापध्दतीपर्यंतच मर्यादित नाही किवा फक्त आज्ञाधारकतेपुरतेच मर्यादितसुध्दा नाही. बुध्दीविवेक आणि कुरआननुसार हे सिध्द आहे. हे बुध्दीविवेकास धरून आहे की ज्या ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तोच ईश्वर मालक, पालक आणि शासक आहे आणि तोच एकमेव ईश्वर मानवासाठी पूजनीय आहे. सर्व प्रकारची भक्ती आणि उपासना फक्त त्या एकमेव ईश्वर (अल्लाह) साठीच आहे. कुरआनचा स्पष्ट निर्णय आहे की त्याच्या अनुयायींना ईशभक्ती आणि ईशआज्ञाधारकता एकसारखी आहे. कुरआन आयती मुस्लिमांना (आज्ञाधारकांना) स्पष्ट आदेश देत आहेत की त्यांनी एकाच ईश्वरापुढे (अल्लाह) नतमस्तक व्हावे. त्याचीच प्रशंसा आणि गुणगान करावे. त्याचेच श्रेष्ठत्व स्वीकारावे आणि उपासना त्याच्यासाठीच असावी. त्याच एकमेव ईश्वर (अल्लाह) ची मदत मागावी आणि नियमित त्याचे कृपाभिलाषी बनावे. कुरआन अशा एकमेव ईश्वरलाच फक्त शासक मानतो, तोच विधीनियमांचा आणि हुकूम देणारा शासक आहे. त्याचीच आज्ञा पाळली जावी आणि त्याच्या आदेशानुसारच जीवनयापन मनुष्याने करावे. अल्लाहने घालून दिलेल्या नियमांचेच पालन व्हावे. अल्लाहने वैध ठरविलेले आणि अवैध ठरविलेले आपल्यासाठीसुध्दा मनुष्याने तेच ठरवावेत. म्हणून भक्तीचा अर्थ कुरआननुसार तेव्हाच परिपूर्ण होतो जेव्हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आणि प्रेषितांच्या नियुक्तींचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मनुष्य करतो. अशा प्रकारे कुरआनप्रणित भक्ती (पूजा, उपासना) मध्ये भक्ती आणि आज्ञाधारकता दोघांचाही समावेश आहे. आपण हा मुद्दा आणखी स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या पध्दतीने त्याचे आकलन करू या. कुरआनने मानवनिर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना खालील शब्दांचा उल्लेख केला आहे.
‘‘ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पाहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे.’’ (कुरआन ६७: २)
दुसऱ्या ठिकाणी स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ‘‘मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (कुरआन २: ३०)
मानवनिर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना, निर्मात्याने भक्तीबरोबरच ‘‘अधिक चांगले कृत्य करणारा’’ आणि खलीफा (निर्मात्याचा प्रतिनिधी) हे शब्दप्रयोगसुध्दा केले आहेत. हे जरी वेगवेगळे शब्द आहेत तरी त्यांचा मतितार्थ (खरा अर्थ) एकच आहे. कुरआननुसार अल्लाहची भक्ती, अधिक चांगले कृत्य करणे (सदाचरण) आणि निर्मात्याचे प्रतिनिधित्व करणे (खलीफा) हे एकाच ध्येयाची व उद्देशाची वेगवेगळी स्पष्टीकरणे आहेत. म्हणून तिन्हींचा मिळून भक्तीचा खरा अर्थ होतो. सदाचरण आणि निर्मात्याचे प्रतिनिधित्वाला सोडून भक्ती कुरआनच्या दृष्टीने अपूर्ण आहे. फक्त आज्ञाधारकता (भक्तीविना) हे सदारचण नव्हे. तसाच प्रकार निर्मात्याचे (अल्लाहचे) प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे. येथे आज्ञाधारकता जरी अपेक्षित आहे तरी भक्तीचा त्यात समावेश आवश्यक आहे. भक्तीच्या इस्लामी संकल्पनेत या दोन्ही गोष्टींचा (आज्ञाधारकता-पूजा) समावेश होतो आणि कोणतीही धार्मिक बाब यातून सुटूच शकत नाही.
इमाम इब्ने तैमिया खालील कुरआनोक्तीचे स्पष्टीकरण देताना म्हणतात,
‘‘लोकहो, उपासना (भक्ती) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले.’’ (कुरआन २: २१)
‘‘भक्ती हा व्यापक शब्द आहे. त्यात जाहीर आणि गुप्त गोष्टी आणि अल्लाहच्या आवडत्या आणि प्रसन्नतेशी निगडीत शिकवणींचा समावेश आहे. उदा. उपासना (नमाज) रोजा, हज, चांगुलपणा, विश्वासुपणा, दयाळुपणा, आईवडिलांची सेवा, सदाचाराचा प्रसार आणि दुराचाराचा प्रतिकार, अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा, शेजारधर्म, अनाथांची सेवा, कुरआन पठण, इ. भक्तीचेच अंग आहेत. त्याच प्रकारे अल्लाहशी प्रेम, अल्लाहच्या कोपचे भय, प्रेषितांशी प्रेम, ईशपरायणता, इ. गुप्त गोष्टीसुध्दा भक्तीचेच अंग आहेत.’’ (अल अबुदियात – २)
याच भाषणात ते पुढे म्हणतात, ‘‘भक्तीमध्ये धर्म व त्याच्या सर्व अंगांचा समावेश होतो. सर्व प्रेषित भूतलावर मानवाला ईशधर्माचे धडे देण्यासाठीच आलेले होते. या वस्तुस्थितीचा कुरआनमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे. प्रत्येक प्रेषिताने ‘ईश्वरभक्ती करा’ ही शिकवण दिली. यावरून हे स्पष्ट होते की धर्म आणि भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’’
यावरून हेच स्पष्ट होते की पूर्ण धर्मपालन म्हणजेच भक्ती होय. धर्माच्या एका अंगास भक्ती आणि दुसऱ्या अंगास भक्तीपासून दूर ठेवणे अशक्य आहे. धर्म हा एक घटक आहे त्याचे अनेक घटक करणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर एक पूर्ण घटक आहे त्यास विविध घटकांत आपण विभागू शकत नाही.

संबंधित पोस्ट
November 2024 Rabi'al Thani 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *