Home A इस्लामी व्यवस्था A आक्रमक हल्लेखोरी आणि याची शिक्षा

आक्रमक हल्लेखोरी आणि याची शिक्षा

Justice hammer
इस्लामने ज्याप्रमाणे इतरांचे प्राण घेण्याची शिक्षा तजवीज केली आहे, त्याचप्रमाणे शारीरिक क्षती पोचविण्याची, अवयव कापण्याची वा इतर प्रकारची शारीरिक पीडा देण्याचीसुद्धा शिक्षा लागू केली आहे. अर्थातच या शिक्षेस ‘किसास‘(बदला घेण्याची) शिक्षा, ‘दैयत‘(खून वा क्षतीभरपाईची) शिक्षा म्हटले गेले आहे. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,‘‘आणि तौरातमध्ये यहुद्यांवर हा आदेश लिहिण्यात आला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्वच जखमांसाठी बरोबरीचा बदला होय. मग जो ‘किसास‘चा सदका करील. ते त्याच्याकरीता प्रायश्चित्त आहे आणि जे ईश्वराच्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-माइदा – ४५)
जखम व तिचे प्रकार
इस्लामी कायद्यात जखमांचे विविध प्रकार वर्णन करण्यात आलेले असून त्यांचा दर्जा ठरविण्यात आला आहे.
  1. एखादा अवयव शरीरापासून विभक्त करणे, उदाहरणार्थ, हात कापणे, डोळा फोडणे वगैरे.
  2. शरीराचा एखादा अवयव निकामी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या अवयवास अशाप्रकारे क्षती पोचविणे की, तो निकामी व्हावा. म्हणजेच ऐकू न येणे, हाताने पकडता न येणे, पायाने चालता न येणे, डोळ्याने न दिसणे, कानाने ऐकू न येणे, समागम करता न येणे, बोटांनी पकडता न येणे वगैरे.
  3. शरीराच्या वरच्या भागावर अथवा चेहर्यावर जखम करणे. यात रक्त वाहणे, मांसाचा लचका तोडणे वगैरे सामील आहे.
  4. डोक्याच्या खाली जखम करणे. उदाहरणार्थ छाती व पोट फाडणे, क्षती पोचविणे वगैरे.
  5. मामुली चोप देणे वगैरे.
शारीरिक जखमांवर लागू करण्यात आलेली शिक्षाहत्येप्रमाणेच शारीरिक क्षती पोचविण्याच्या शिक्षेसाठी अटी व शर्ती लागू आहेत. यामध्येसुद्धा जाणूनबुजून, चुकून व नकळत होणार्या हत्येच्या अपराधांप्रमाणेच शिक्षा लागू करण्यात आली आहे.
जखम पोचविण्याची शिक्षा ‘किसास‘ होय
अर्थातच ‘किसास‘ म्हणजे बदला आणि तोही तंतोतंत. जेवढ्या प्रमाणात जखम करण्यात आली असेल, अगदी त्याच प्रमाणात अपराध्यास जखम करून शिक्षा देण्यात येईल, किंवा क्षतीग्रस्ताने संमती दिल्यास ‘दैयत‘ म्हणजेच जखमेची आर्थिक भरपाई देण्यात येईल अथवा क्षतीग्रस्ताने माफ केल्यास अपराध्यास माफ करण्यात येईल.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *