Home A blog A सत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक

सत्य जीवनमार्गाचा प्रकाश देणारे महानायक

-नजीर अहमद एम. अत्तार पुणे / ९६८९१३३२९३
पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहने (ईश्वराने) आपला ईशदूत अर्थात
 संदेशवाहक म्हणून जगात पाठविले. जगातील मानव समाजाला सत्यधर्म, जीवन, सत्यमार्ग यांची जाणीव करून देण्यासाठी निर्माण केले. मुहम्मद (स.) हे ईश्वराचे अंतिम पैगंबर होत.
मुहम्मद (स.) यांच्या अगोदर ईश्वराने अ‍ेक पैगंबर अर्थात संदेशवाहक निर्माण केले होते. त्यांनी त्या त्या काळात सत्य जीवनमार्गाचा प्रचार, प्रसार केला होता आणि सत्यधर्माची जाणीव करून दिली होती. सत्यधर्म इस्लाम हा प्राचीन काळापासून निर्माण झाला आहे. अर्थात ईश्वराकडून अवतरित झाला आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म कुरैश घराण्यात झाला. तो महिना रबिऊल अव्वल होता. मुहम्मद (स.) यांच्या जन्माअगोदर त्यांचे पिता स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या माता निवर्तल्या. ते अनाथ झाले. त्यांचे पालनपोषण काका आणि आजोबांनी केले. ते लहानपणी मेंढ्यांची राखण करायचे. तद्नंतर काकांबरोबर व्यापार करू लागले. व्यापारानिमित्त त्यांना निरनिराळ्या भागांत जावे लागत. त्यांनी व्यापारात प्राविण्य प्राप्त केले होते. ते एक प्रामाणिक सत्प्रवृत्तीचे होते. व्यापारानिमित्त त्यांचे अनेक व्यापाऱ्यांशी, लोकांशी संबंध प्रस्थापित झाले होते.
माननीय खदीजा (रजि.) या एक व्यापारी महिला होत्या. मुहम्मद (स.) यांचा प्रामाणिकपणा पाहून आपला व्यापार मुहम्मद (स.) यांच्या स्वाधीन केला. या व्यापारात त्यांची नेकी व इमानदारी पाहून खदीजा (रजि.) या प्रभावित झाल्या. त्या विधवा होत्या. त्यांचे त्या वेळी वय ४० वर्षे होते आणि मुहम्मद (स.) यांचे वय २५ वर्षे होते. ते दोघे विवाहबद्ध झाले.
विवाहानंतर ते व्यापार करीतच राहिले. त्यांनी व्यापाराचा त्याग केला नाही. व्यापार करीत असताना ते काही वेळा बेचैन होत असत. त्यांना मन:शांती लाभत नव्हती. त्यांना एकांतवास हवा होता. कारण मन:शांतीसाठी मनन चिंतन हवे होते. ते मार्गदर्शन मिळावे म्हणून हिरा नामक गुहेत जाऊन एकांत बसून विचारमग्न होत. ते ईश्वराची याचना व प्रार्थना करीत. मुहम्मद (स.) यांची श्रद्धा व निष्ठा पाहून अल्लाहने त्यांच्या सद्भावनांची कदर करून त्यांना प्रेषित्व अर्थात पैगंबरपद बहाल केले. यानंतर अल्लाहने आपले दूत जिब्रिल (अ.) यांच्याद्वारे संदेश पाठवून मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे केले आणि त्यांना जिब्रिल यांनी आज्ञा केली,
‘‘वाचा, आपल्या पालनकर्त्याचे नाव घेऊन मानवाला रक्तापासून निर्माण केले आहे.’’ (कुरआन)
मुहम्मद (स.) अचंबित झाले आणि भयभीत झाले. ही एक अद्भूत घटना होती. त्यांच्यात सत्यता, सत्यवचनी व प्रामाणिक गुण सामावलेले होते. म्हणून त्यांनी अल्लाहचे आभार मानून त्याचा आदेश मान्य केला. 
गुहेत घडलेली अद्भूत घटना त्यांनी आपल्या सुशील पत्नी खदीजा (रजि.) यांना कथन केली. त्यावर त्यांच्या पत्नींनी सांगितले, ‘‘आपण सत्यवचनी आहात, प्रामाणिक आहात म्हणून त्याचे हे फळ. आपण कार्य करावे. आपल्या कार्याची साह्यकरी म्हणून मी आपली अनुयायी बनू इच्छिते.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ईश्वराच्या साक्षीने सत्कार्यास सुरूवात केली.
अरबस्थानात आणि जगात त्या काळी मानवसमाजात अंधकार होता. वातावरण हिंसाचाराचे अत्याचाराचे होते. सगळे अरब जगत हिंसक वृत्तीचा बनला होता. भयभीत वातावरणात माखला होता. कुणातही ताळमेळ नव्हता. हिंसक वृत्ती वाढली होती. खूनदरोड्यांनी जग बरबटले होते.
अशा अवस्थेत मानवसमाजाला सत्य जीवनमार्गाची, सत्य जीवनपद्धतीची एकेश्वरी कल्पनेची, प्रामाणिकपणाची शिकवण देणे हे काही सोपे कार्य नव्हते. अत्यंत कष्टमय वातावरण होते व सत्यमार्गाचा आवाज उठविणे शक्य नव्हते. परंतु निर्मात्याने आपल्यावर टाकलेली जबाबदारीही झटकता येणार नाही अथवा झटवूâन चालणार नाही. या अवस्थेतही सत्कार्य करणे आवश्यक आहे.
अरबरस्थानात मूर्तिपूजा आणि अनेकेश्वरवाद बळावला होता. मानवसमाजात स्थिरता नव्हती. महिलांवरील अत्याचार वाढत चालले होते. रक्ताचे पाट वहात होते. या घडत असलेल्या घटना त्यांनी पाहिल्या. या सर्व वातावरणाचा सारासार अंदाज घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मोठ्या हिकमतीने, धाडसाने आणि न डगमगता आपले कार्य व एकेश्वरत्वाची शिकवण देण्यासाठी सज्ज झाले.
‘‘करते थे नारियों का अपमान
जीवित गाडते थे संतान
खून चुसते थे, न देते दान,
मुस्ख हो गये थे नादान’’
अशी होती अरबस्थानची स्थिती आणि बहकलेला मानवसमाज हे अनेकेश्वरवादी बनला होता.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अशा वातावरणात अनेकेश्वरवाद, सत्य जीवनमार्ग, प्रामाणिकपणाची शिकवण, सत्यधर्माची शिकवण ईशआदेशानुसार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले. मानवसमाजास संदेश देऊ लागले. हे कार्य करीत असताना त्यांना अडथळे निर्माण होऊ लागले. यातना सोसाव्या लागल्या. त्यांना मारहाण होऊ लागली. मानवसमाज त्यांना जादूगार म्हणून हिणवू लागला. त्यांना ठार माहण्याचा कट शिजू लागला. तरीदेखील आपल्या सत्कार्यातून पैगंबर मुहम्मद (स.) मागे हटले नाहीत. एकीकडे विरोधक वाढत होते तर दुसरीकडे सत्कार्यात अनुयायी हळूहळू सामील होत होते.
याच दरम्यान त्यांच्या पत्नी खदीजा (रजि.) त्यांना अध्र्या वाटेवर सोडून निवर्तल्या. त्याही स्थिती ईश्वरी कामात पैगंबर लीन झाले. त्यांना ठार मारण्यासाठी विरोधकांकडून योजना आखण्यात आली. जेव्हा त्यांना कळले की आपण येथून काही काळासाठी स्थलांतर होणे आवश्यक आहे, कारण आपले ईशकार्य पूर्णत: सिद्धीस आले नाही. म्हणून आपणास हिजरत करणे भाग आहे. म्हणून मक्का शहर काही काळ सोडण्याचा पैगंबरांनी निर्णय घेतला. ते मदीना शहरी स्थलांतर झाले.
मदीनेत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले ईशकार्य सुरू केले. येथेही त्यांना या कार्यात अडथळे निर्माण होऊ लागले. त्यांचा छळ होऊ लागला. त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. तरीही ते हार न मानता आपल्या दृढनिश्चयावर अटळ राहून सत्यमार्गावर आणि सत्यजीवनावर प्रामाणिकपणे तटस्थ राहून लढा देत राहिले. कारण त्यांची ईश्वरावर अढळ श्रद्धा होती.
येथील विरोधकांनी त्यांना उच्चपदाची लालूच, आमिषे दाखविली व ते देण्याचे प्रयत्नही झाले. परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरले. पैगंबर सत्कर्मापासून मागे हटले नाहीत. ते एक सत्यमार्गी महानायक होते.
एकच ईश्वर हा सर्व मानवजातीचा निर्माता असून तोच उपास्य आहे. त्याचा कोणी भागीदार नाही आणि पवित्र कुरआन हा ईशग्रंथ आहे. ईश्वरच या ग्रंथाचा वाली आहे. त्यानेच हा ग्रंथ निर्माण केला आहे आणि इस्लाम धर्म हाही ईश्वरानेच निर्माण केला आहे. हा धर्म कोणी साधू-संत-पैगंबरांनी निमाण केलेला नाही. म्हणून या धर्माचा संस्थापक पैगंबर मुहम्मद (स.) होऊच शकत नाहीत. फक्त ईश्वराने पाठविलेल्या सत्यजीवनाचा, धर्माचा प्रचार करण्याचे कार्य पैगंबरांनी केले आणि करीत आले आणि या माध्यमातूनच मानवसमाजात सुधारणा घडवून आणण्याचे कार्य केले.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असाही संदेश दिला की ‘‘या जगातील मानव समाजाचे जीवन क्षणभंगूर आहे. मर्यादित आहे. म्हणून मानवसमाजाने अनेकेश्वरवादी न बनता एकेश्वरवादी बनून ईश्ववाने सांगितल्याप्रमाणे सत्यमार्गी जीवनाचा स्वीकार करून सत्यमार्गी बनावे व आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे, यातच सौख्य सामाविलेले आहे.
या ठिकाणी एका सत्यघटनेचा आवर्जून उल्लेख करणे भाग आहे. ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अंतिम समयीची घटना आहे. त्यांनी आपले प्रिय लाडक्या कन्येस उपदेश दिला.
‘‘हे फातिमा! तू एक पैगंबराची कन्या आहे म्हणून अहंकार बाळगू नकोस अथवा अहंकारी बनू नकोस. तू सत्यमार्गी व प्रामाणिक राहा. प्रलयाच्या दिनी ईश्वरासमोर तुला उभे राहावे लागणार आहे. त्या वेळी मी तुझा साक्षीदार म्हणून मला साक्ष देता येणार नाही. फक्त तू सत्य राहा. सत्य जीवन जग.’’
नंतर हजस्थानी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्याकडे असलेली नाणी दान केली अन् सरतेशेवटी आपले ईमान शाबूत ठेवून हे जग सोडून गेले.
अशा महानायकाची म्हणजेच पैगंबर मुहम्मद (स.) यांची जयंती साजरी होत पुढील ईशवचनाचा पुनरुच्चार करावासा वाटतो,
‘‘अल्लाहशिवाय दुसरा ईश नाही आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे पैगंबर आहेत.’’
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *