-डॉ. सबीहा ख़ान
नागपूर – (डॉ. एम. ए. रशीद)
आज मुस्लिम महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या साक्षरतेबाबत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परिपक्व इस्लामी ज्ञान नसल्याने कारण ट्रिपल तलाक़चा मुद्दा समोर आला. इ.सन १९३९मध्ये शरियतवर आधारित मुस्लिम पर्सनल लॉ बनविण्यात आला होता. मुस्लिम विवाह याच विधीअंतर्गत येतो. या विधीचे पालन करणे आमचा संवैधानिक अधिकार आहे. विवाह अधिनियमच्या अनुसार वधू पक्षाला हुंडा न देत निकाह कार्यक्रम आयोजित करण्याची शर्त ठेवण्यात आली आहे. वधूला सुनिश्चित रक्कम (मेहर) च्या आधारावर निकाह स्वीकार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. निकाह झाल्याबरोबरच पतीला मेहरची रक्कम पत्नीला देणे आवश्यक असते. असे विचार आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या वेळी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सबीहा ख़ान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
हा कार्यक्रम कांग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहाच आयोजित करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की मेहर प्राप्त करने पत्नीचा पहिला अधिकार आहे आणि हुंडा वधू पक्षावर अत्याचार आहे. तलाक़च्या अंतर्गत महिलांकरिता ख़ुलअ ( तलाक़ घेण्याचा) सुद्धा अधिकार आहे. वर्तमान शासन तलाक़बाबत मुस्लिम महिलांना ज्या परिस्थितीत आणू इच्छित आहे, त्यात अनेक कठीण बाबी आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही एकाच मंचवर १९ विभिन्न महिला संघटना मिळून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करीत आहोत.
सरोज आगलावे यांनी सांगितले की महिलांच्या शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये सुधारणा झालेली आहे आणि आता त्या पुढे जात आहेत, शिक्षणामुळे त्यांचे शोषण कमी झालेले आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. या व्यतिरिक्त स्त्रियांचे पारिवारिक जीवन अनेक बलिदानांनी युक्त आहे. ज्या प्रकारे आम्ही मुलींना चांगले संस्कार देतो त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा सुसंस्कृत करण्याची गरज आहे.
अॅड. रेखा बाराहाते यांनी सांगितले की स्त्री सक्षम असते, ती परिवाराला सुख आणि समृद्धीत साहाय्य प्रदान करते. मुलांना जन्म दिल्यापासून स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत आम्हा स्त्रियांची मुख्य भूमिका असते.
अरुणा सबाणे विदर्भातील प्रथम महिला संपादक आहेत, त्या म्हणाल्या की आत्मनिर्भर बनूनच मी माझ्या मुलांचे भविष्य बनविले आहे.
डॉ. शरयुताई तायवाड़े यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करीत सांगितले की स्त्रियांचे परिवारमध्ये उच्च स्थान आहे, ती मॅनेजमेंटची गुरू आहे. ती घरकामाला योजनाबद्ध पद्धतीने आवरून बाहेरची कामेही पूर्ण करते.
शुभांगी घाटोळे यांच्या संविधान वाचनाने श्रोत्यांना अतिशय उत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना वनकर तसेच आभार संध्या राजुरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफीया अंजुम आणि बेनज़ीर ख़ान यांनी केले.
या कार्यक्रममध्ये भारतीय महिला फेडरेशन, शेतकरी संघटना, जमाअत ए इस्लामी हिंद, नागपुर महिला विभाग, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, अनाथ पीडित महिला क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती, धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ, राष्ट्रीय ओ.बी.सी. महिला महासंघ, माहेर सामाजिक संस्था, जे. के. एस. सखी मंच, विदर्भ असंघटित कामगार संघटना, सुबुद्ध महिला संघटना, पलीता महिला बहु समाजसेवा संस्था तसेच आवाज़ आशा, टॉपर फाउंडेशन आदी महिला संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विभिन्न समुदायाच्या मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments