Home A स्त्री आणि इस्लाम A स्त्री गुलामगिरी विरुद्ध इस्लामचा आवाज
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

स्त्री गुलामगिरी विरुद्ध इस्लामचा आवाज

इस्लामच्या पूर्वी स्त्रीचा इतिहास अत्याचारपीडिताचा व गुलामगिरीचा होता. तिला कमी दर्जाची व नीच मानण्यात येई. तिला सर्व उपद्रवाचे व अमंगलाचे मूळ संबोधण्यात येई. साप आणि विचवापासून जसा स्वतःचा बचाव केला जातो तसा बचाव तिच्यापासून केला जावा असा सल्ला दिला जाई. पशूप्रमाणे तिची बाजारात खरेदी व विक्री केली जाई. तिचे कोणतेही कायमस्वरूपी स्थान नव्हते व ती पुरुषाच्या अधीन होती. तिला कोणताही अधिकार नव्हता. ती पुरुषाच्या दया व कृपेवर जिवंत राही. इस्लामने तिच्या गुलामगिरीविरूद्ध इतका बुलंद आवाज उठविला की, संपूर्ण जग त्याने निनादून गेले आणि आज कोणाचेही धाडस नाही की, तिच्या पूर्वस्थितीला त्याने बरोबर आणि योग्य ठरवावे। त्याने संपूर्ण शक्तीनिशी उद्घोष केला –
‘‘लोकहो ! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा, ज्याने तुम्हाला एका जिवापासून निर्माण केले व त्याच्यापासूनच त्याची जोडी बनविली आणि त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रियांचा विस्तार केला आणि अल्लाहचे भय बाळगा ज्याच्याद्वारे तुम्ही एक दुसऱ्याकडून सहाय्याची याचना करता आणि नातसंबंधांचा आदर करा. निःसंशय अल्लाह तुम्हाला पाहत आहे.’’ (सूरतुन्निसा – १)
ही त्या गोष्टीची घोषणा होती की, जगाने माणसामाणसात जो फरक केला आहे तो निखालस खोटा आहे. त्याला कोणताही आधार नाही. संपूर्ण मानवजातीची निर्मिती एकाच माणसापासून झालेली आहे. सर्वांचे मूळ एकच आहे. जन्मतः कोणीही सज्जन अथवा दुर्जन नाही, कोणीही उच्च कुळाचा अथवा नीच कुळाचा नसतो, सर्वजण बरोबरीचे व समान योग्यतेचे मालक आहेत. वंश, टोळी, रंग, जात, देश, राष्ट्र, भाषा आणि व्यवसायाच्या आधारे त्यांच्यात भेदभाव करणे चुकीचे व अयोग्य होय.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *