नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
इस्लामी दृष्टिकोनानुसार समाजात कोणीही व्यक्ती अविवाहित राहू नये, विवाहामधे साधेपणा असायला हवे, प्रेषित ह़जरत मुहम्मद (स.) यांच्या वेळेस त्यांचे अतिप्रिय सोबती ह़जरत अब्दुल रहमान विन औ़फ ऱिज यांनी आपला विवाह खूप साध्या पद्धतीने केला होता, या विवाहात त्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांनासुद्धा आमंत्रित केले नव्हते. मुहम्मद (स.) यांनी स्वत: आपले आणि आपल्या मुलींचे लग्न खूपच साध्या पद्धतीने केले, असे विचार जमा़अत ए इस्लामी हिंद नागपूर पश्चिम महिला विभागाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत ‘निकाह आसान करो’च्या ‘ओपन डिस्कशन’मधे ज़ेबा खान यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम पश्चिम नागपूर स्थित वेलकम सोसायटीच्या इकरा ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेला होता.
त्यांनी सांगितले की आज समाजात खूप वायफळ खर्च आणि रुढीपरंपरानी विवाह संपन्न केले जात आहेत. श्रीमंत लोक आपल्या मुलींच्या लग्नात खूप जास्त पैसा खर्च करतात. गरीब लोक हे दृश्य पाहून अशा प्रकारचे लग्न करण्यास कर्ज घेऊन मुलींचे लग्न करतात. श्रीमंत लोकांनी आपल्या लग्न समारंभात साधेपणा आणायला पाहिजे जेणेकरून समाजात असे उदाहरण तयार होईल की गरीब लोक कर्ज घेण्यापासून वाचतील.
विवाहच्या रितीरिवाज ‘विदअत’मधे सामील होतात आणि ‘विदअत’ हा भटकण्याचा मार्ग आहे. महिला विभागच्या शहर अध्यक्षा डॉ सबिहा हाशमी यांनी राज्यव्यापी ‘निकाह आसान करो’च्या संबंधात राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या मोहीमबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की विवाहाच्या बाबतीत लोक चिंतीत आहेत आणि त्याच्या समाधानाचे प्रयत्न करीत आहेत. पॅनल डिस्कशनमधे सरळसोप्या लग्नाची पद्धत समोर आली. यामध्ये स़िफया खान, इऱफाना कुलसुम, ज़ेबा खान, रोमा खान, साजिदा परवीन, सादिया खान व अस़िफया इऱफान यांनी भाग घेतला. ज्यांनी शरियतनुसार साधारण विवाह केला होता त्यांचा सत्कार करण्यात आला. या सेशनमधे ४५ वर्षीय पीएचडी अस़िफया इऱफान यांनी आपल्या साध्या विवाहाची महत्ता आणि सफलता यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात सानिया फ़ातेमा यांनी नात पठण केले. सूत्रसंचालन साजिदा परवीन व आभारप्रदर्शन सुमय्या शे़ख यांनी केले. कुरआन पठण अ़जरा परवीन यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुली उपस्थित होत्या.

0 Comments