Home A blog A इस्लाम मानवतेचा सर्वश्रेष्ठ शिल्पकार

इस्लाम मानवतेचा सर्वश्रेष्ठ शिल्पकार

हजरत मुहम्मद (स.) यांचे नाव जगातील पहिल्या शंभर प्रसिद्ध व्यक्तींच्या सूचित पहिल्या क्रमांकावर असल्याचे वाचले आणि झालेला आनंद अविस्मरणीय असा होता. हजरत मुहम्मद (स.) यांचा जन्म (मक्का) आणि मृत्यू (मदीना) या दोन्ही घटना रबिऊल अव्व्ल महिन्यातील होत. हजरत मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि त्यांचे कार्य यांचे स्मरण रबिऊल अव्व्ल महिन्याच्या औचित्यातून करण्याचा या लेखाचा प्रयास आहे. माझ्या लेखासाठी प्रा. के. एस. रामाकृष्ण राव यांचे पुस्तक मुहम्मद (स.) आदर्श प्रेषित याचा आधार घेतला आहे.

ते लिहितात :- मुहम्मद (स.) प्रेषित, सेनापती, शासक, योद्धे, व्यापारी, उपदेशक, तत्त्वज्ञानी, राजनीतीज्ञ, वक्ते, समाजसुधारक, अनाथांचे पोषणकर्ते, गुलामांचे रक्षक, स्त्रीजातीचे उद्धारक, नायनिष्ठ आणि संत या सर्व भूमिकांमध्ये व मानवतेच्या सेवाकार्य क्षेत्रात त्यांची योग्यता महान विश्व्नायकाची आहे. जगभरात चारित्र्य नावाला उरले नव्हते, अनीती शिगेला पोहचलेली होती अशा वेळी गरज होती ती मानवतेच्या शिकवणीची. अल्लाहने या कामासाठी निवड केली मुहम्मद (स.) यांची, जे अशिक्षित होते मात्र प्रामाणिकपणा त्यांच्या नसानसांत भरलेला होता. या कामाची जबाबदारी म्हणून त्यांस लाभली, या लाभाबरोबरच ते अल्लाहचे पैगम्बरही बनले.

त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर विषयाची माहिती व प्रशिक्षण त्यांस देणे आवश्यक होते. अल्लाहने आवशयक ती माहिती व प्रशिक्षण दिले. त्यानंतर मुहम्मद पैगंबर (स.) यांनी त्यांचे कार्य हाती घेतले. ते कार्य होते एकेश्वरवाद पुनर्जीवित करणे, मानव समानतेचा अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहचविणे. अर्थात हे कार्य तेथील समूहास रुचेनासे होते तेव्हा त्यांनी मुहम्मद (स.) व त्यांचे सह्काऱ्यांचा अनन्वित छळ केला ज्यामुळे त्या सर्वांना मक्का सोडून मदीनेस जाणे भाग पडून ते मदीनेस गेले. एका बाजूने छळ चालू होता तर दुसऱ्या बाजूने पैगम्बर मुहम्मद (स .) यांनी अल्लाहची पाठराखण व सह्कार्यचे विश्वासच्या जोरावर कार्य चालू ठेवले परिणामी कारवाही वाढत गेली आणि स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करता येईल  याची खात्री झाली .या खात्रीचे पुढे हाती घेतलेले मिशन यशस्वीपणे १० वर्षाच्या  कालावधीत पूर्ण झाले .आणि याची देही याची डोळे सर्व काही घडून आलेचे समाधान लाभून वयाच्या ६३ व्या वर्षी हजरत मुहम्मद पैगम्बर (स .)अल्लाहला प्रिय झाले .

प्रा .के एस रामकृष्ण राव आणि काही भारतीय बुद्धिमान विचारवंत  या पुसकात नमूद केले आहे ते पुढील प्रमाणे : जर्मनचे मोठे कवी ‘गोयटे’ म्हणतात : ‘हा ग्रथं प्रत्येक युगात लोकांवर आपला अत्याधिक प्रभाव पाडत राहील’                                                            

जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात पुढील शंभर वर्षात इंग्लंडच नव्हे तर संपूर्ण युरोपवर धर्म इस्लाम असेल . प्रा. हर्गरोन्ज (Hurgronje) यांच्या शब्दांत, इस्लामच्या पैगंबरांद्वारे प्रस्थापित राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय एकता आणि विश्वबंधुत्वाच्या नियमांना अशा सार्वभौमिक आधारांवर स्थापन केले आहे, जे इतर राष्ट्रांना मार्गदर्शन करीत राहातील. प्रा. हर्गरोन्ज पुढे लिहितात, वस्तुस्थिती ही की, राष्ट्रसंघाच्या धारणेस वास्तविक रूप देण्याकरिता इस्लामची ही कामगिरी आहे. जगातले कोणतेही राष्ट्र याचे उदाहरण सादर करू शकत नाही. महात्मा गांधी म्हणतात, “इस्लाम ज्याने स्पेनला सभ्य बनविले, त्या इस्लामपासून ज्याने मोरोक्कोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविला आणि संपूर्ण विश्वाला बंधुभावाचे बायबल शिकविले. दक्षिण आफ्रिकेतील यूरोपियन इस्लामच्या विस्तारामुळे केवळ एवढ्यासाठी भयभीत आहेत की त्याच्या अनुयायींनी गौरवर्णीयांशी समानतेची मागणी करू नये? असे असेल तर त्यांचे भयभीत होणे योग्यच आहे. बंधुभाव पाप आहे, कृष्णवर्णीयांची गौरवर्णीयांशी समानता होण्याची त्यांना भीती वाटते. तर मग (इस्लामच्या प्रसाराने) त्यांच्या भयभीत होण्याचे कारणही लक्षात येऊ शकते. सरोजिनी नायडू म्हणतात ,”हा पहिला धर्म आहे ज्याने लोक्तांत्राची शिकवण दिली आणि त्याला एक व्यावहारिक रूप दिले . या करीता त्यांनी मस्जिद मधील सामूहिक नमाज हे उदाहरण घेतले आहे ते असे कि नमाज मध्ये श्रीमंत -गरीब , उच्च-निच्च ,राजा -रंक  आणि गोरा -काळा असा भेदभाव नाही . (pg 2)

इस्लाम बाबत थॉमस कार्लायलचे मत पुढे विचारत येईल ,ततपूर्वी  लेखक प्रा . के एस रामाकृष्ण राव यांनी केलेले  विवेचन पाहू .

मुहम्मद (स.) अनाथ आणि निरक्षर होते त्यांचा जन्म मक्का शहरात झाला होता त्या शहराततील लोक शीघ्रकोपी व सूडभावनचे होते .तर काही सुज्ञ होते मुहम्मद (स.) अशाच  सुज्ञ मंधील सर्वउत्तम होते ,त्यांच्यातील  प्रामाणिकपणा व न्यायी वृती  यामुळे तेथील आपसांतील भांडणात ते मध्यस्थी असत . मानव ,गुरेढोरे झाड -माड एकूणच सर्वप्रती ते दयावान होते . आणि तरीही त्यास अशा भयंकर छळाला सामोरे जावे लागले ,कि यातना असह्य होहून आपले घरदार सोडून शहर मदिना मध्ये जाऊन आश्रय घेतला त्यांच्यातिल सद्गुणा मुळे त्यांच्या सादचारामुळे त्यांनी हाती घेतलेली इस्लामी मानवतेचे मिशन मध्ये लोक सामील झाले होते . ते या छळाला  बळी पडले तरीही त्यांनी आपले या नेत्याची साथ प्रसंगी त्यांच्यातील काहींनी मरण पत्करून दिली . तर काहींनी स्वतःचे घरदार सोडून त्यांच्या बरोबर शहर मदिना जाऊन साथ दिली.

परिणामी या सोसलेल्या यातनांचे इनाम म्हणून मक्का शहर मुहम्मद (स.) त्यांच्या सहकार्यनच्या ताब्यात रक्ताचा एक थेंब सांडून न देता अल्लाहने दिले.

मुहम्मद (स.) नी ज्या यातना स्वतः सोसल्या त्या हि पेक्षा त्याना अधिक वेदना त्यांच्या सहकार्यस सोसाव्य लागल्या. आणि तसे त्याचं कृतितुन दिसूनही येत होते . परंतु त्यांनी हे सर्व जे काही सहन केले ते एका निश्चित ध्येयासाठी होते आणि ते ध्येय होते एकेश्वरवादचे सत्य ,मानवतेचे सत्य या सर्वाना अल्लाहने लोकांचे जीवन सुलभ शांती व समाधानाचे व्हावे म्हणून केलेले मार्गदर्शन अर्थात धर्म दिन इस्लाम लोकपर्यंत पोहचवावे ,अखेर ते पोहचले नंतर त्यानि केलेली कृती म्हणजे उच्चतम मानवतेत रोवलेला एक अवीसमरणीय ,अनमोल तुरा होता आणि तो होता ज्यानी छळून त्यांस व त्यांच्या सहकार्यास शहर मक्का सोडण्यास भाग पडले होते. त्या सर्वाना दिलेली क्षमा -माफी होय अदभूतच कारण माफी देताना मुहम्मद (स०)म्हणाले होते आज तुमच्यावर कोणताही अपराध नाही आणि तुम्ही सर्व स्वतंत्र आहात . page 3

मानवता टिकावी म्हणून हि इस्लामचे मार्गदर्शन आहे ते हे कि ,एकाधिकार ,व्याज ,बाजार पेठांवर कब्जा करणे साठेबाजी ,कृत्रिम टंचाई निर्माण करणे यांना अवैध ठरविण्यात आले शिवाय  व्यभिचार, जुगार ,दारू यानाही निषेध केले गेले . तर शिक्षण संस्था ,उपासना स्थळे ,रुग्णालये  आदि समजयोगी साधनांना प्राधान्य दिले गेले . अनाथालयाचा प्रारंभ मुहम्मद (स)याचे कडून झालेला होता आणि हे सर्व विचारांत घेऊन मुहम्मद (स .)  यांचे विषयी कार्लईल म्हणतात कि निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या या वाळवंटी पुत्राच्या ह्रदयात मानवता द्या आणि समता  स्वभाव निसर्गत: होता .याच कार्लईल व कवी गोयटे यांच्यातील या बाबतचा संवाद अब्दोधक  ठरेल .p4

पैगम्बर हजरत मुहम्मद (स०) यांचे  एकूणच जीवन चरित्राने बेहद खुश आणि प्रभावित झालेले थॉमस कार्लईल लिहितात”आणि मग इस्लामची देखील हि मागणी आहे ,आम्ही स्वतःला अल्लाह करिता समर्पित केले पाहिजे तो आमच्याशी जे काही करतो ,आम्हला जे काही पाठवितो ,मग तो मृत्यू का असेना किंवा त्याहून एखादी वाईट गोष्ट ,ती वास्तविक आमच्या भलाईची आणि आमच्याकरिता उत्तमच असेल. अशा प्रकारे आम्ही स्वतःला ईश्वराच्या प्रसन्ने करीता समर्पित करतो “. गोयटे विचारतात जर हा इस्लाम आहे तर आम्ही सर्व इस्लामी जीवन जगत नाही काय?”यावर कार्लईल लिहातांत “होय ,आमच्या पैकी ते सर्व जे नैतिक व सदाचारी जीवन जगतात ते सर्वच ज्ञान आणि प्रज्ञा आहे ,जी आकाशातून या भूतलावर अवतरीत केली आहे . पैगम्बर मुहम्मद (स०) याचे पवित्र जीवन त्यांचे पवित्र कुराण इस्लामचे मार्गदर्शन सर्वकाही झऱ्यातून वाहणाऱ्या निर्मल पाण्या सारखे असले तरी देखील तलवार ,स्त्रिया असे आक्षेप दूषित मनाचे काही लोक घेत आलेत आणि आजही ते आपली राजकीय पोळी भाजून घेत असतात . जित्याची खोड हि म्हण तिचे ठिकाणी योग्यच परंतु ज्यांना नीट माहिती नसते अशाना इस्लाम वरील आक्षेप कसे अज्ञानातून असतात हे वेळोवेळी समाजातून सांगण्यात येत असतेच तरी देखील सभ्य माणसाने अशा खोडसाळपणा पासून दूर राहावे तसे प्रयत्न नेहमीच गरजेचे ठरतात .

           प्रा .के एस रामकृष्ण राव स्त्रियांचा इस्लामने केलेले उद्धाराबाबत लिहितात – इस्लाम स्त्री उद्धारक या रूपाने आला आणि  त्याने स्त्रीला पतृक वारसात हिस्सेदार बनविले .त्याने शेकडो वर्षपूर्वी स्त्रियांना मिळकतीचा अधिकर दिला आणि त्याच्या बारा शतका नंतर इ. स. १८८१ मध्ये इंग्लंड जो लोकतंत्र प्रणालीचा प्रणेता समजला जातो त्याने इस्लामचा हा सिद्धांत अंगीकारून त्या करीता विवाहित स्त्रियांचा विधिनियम नावाचा कायदा पास केला (आपण २६-१-१९५० पर्यंत ब्रिटिश डोमिनियन मध्ये होतो हे आरोपकर्त्यानी ध्यानी घेतलेले बरे बरका .) प्रा के एस रामकृष्ण राव याच्या हिंदीतील पुस्तकाचे भाषांतरकार अनुवादक मन्सूर आगानी म्हंटले आहे कि मुहम्मद (स ०) याचे बाबत असे पुस्तक हिंदी ,इंग्रजी साहित्यात ते काय उर्दू मध्ये हि सुलभ नाही . अर्थात प्रा रामकृष्ण राव आपले विवेचन पृ . २१ वर लिहितात :जे लोक श्रध्दा बाळगतात आणि सत्कर्म करतात केवळ तेच लोक स्वर्गात जाऊ शकतील “,हे कुरआनने वारंवार सांगितले आहे .जे लोक श्रध्दा बाळगतील ,पण तयानुसार आचरण करीत नसतील तर त्याचें इस्लाम धर्मात काहीच स्थान नाही . वरील प्रमाणेचे इस्लामी मार्गदर्शन करण्यात ज्या यातना सोसव्या लागल्या होत्या त्यांचा अभ्यासकांवर परिणाम होणे स्वाभाविक होते कारण मानवास मानवंतावादी  बनवणेच हे त्याचं कार्य असे २३ वर्ष चालूच होते अखेर वयाचे ६३ व्या वर्षी इस्मलाचे पैगम्बर हजरत मुहम्मद (स ०) अल्लाहचे महबुबना अल्लाहने आपले समीप घेतले . प्रा रामाकृष्ण राव याचे या समयीचे बोल कोणच्या हि डोळयांत अश्रू आणणारे असेच आहेत ते लिहितात = ज्या कपडयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यात  अनेक ठिगळे लावलेली होती . ते घर ज्या पासून संपूर्ण जगात प्रकाश पसरला ते अंधारात होते . कारण दिवा लावण्या करीता तेल सुद्धा नव्हते ..

-बशीर मोडक,

रत्नागिरी

संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *