Home A मुस्लिम पर्सनल लॉ A व्यक्तिगत कायदा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे, त्याच तर्कशुद्ध कारणमीमांसा

व्यक्तिगत कायदा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे, त्याच तर्कशुद्ध कारणमीमांसा

इस्लाम धर्माच्या शिकवणूकीचे क्षेत्र कौटुंबिक आणि सामाजिक समस्यापर्यंत विस्तारित पावले आहे. ही धारणा ज्या गोष्टींच्या परिणामस्वरूप निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घेणे प्रथम आवश्यक आहे. ही कारणे पवित्र कुरआनमधील मौलिक धारणामध्ये दिसून येतात. पवित्र कुरआनमध्ये, अल्लाह, धर्म आणि उपासनेसंबंधी विवेचन करण्यात आले आहे. यातील धारणाशिवाय प्रत्येक धारणा चूकीची किवा अज्ञानमूलक किवा असत्य आहे. त्यासंबंधी आवश्यक स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे.
अल्लाहने सर्व सृष्टीला निर्माण केले आहे. तो सर्व सजीवांचा पालनकर्ता, ईश्वरी गुणानी युक्त, न्याय करण्याची क्षमता, बुद्धीमत्ता, दया, शक्ती ज्ञान इत्यादि वैशिष्ठयानी परिपूर्ण आहे. तो जसा सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता तसाच त्याचा व्यवस्थापकही आहे. तो मालक आणि ईश्वर सुद्धा आहे. तो स्वामी आणि शासकही आहे. तो कायदा देणारा सुद्धा आणि कायदा बनविणारा सुध्दा आहे. तो उपास्य आणि रक्षकही आहे. त्याच्या या वैशिष्टयांमध्ये, या योग्यतामध्ये आणि त्याच्या या अधिकारामध्ये कोणीही सहभागी नाही. म्हणून आराधना योग्य फक्त तोच आहे आणि आज्ञा पालनाचा खरा अधिकारी सुद्धा तोच आहे.
अल्लाहच्या या उपदेशांचा, आदेशांचा आणि कायद्याच्या संग्रहाचे नाव धर्म(इस्लाम) आहे. सरळ मार्ग दाखविण्यासाठी, सत्त्याच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि खरी सफलता मिळवून देण्यासाठी आणि ठरलेल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा धर्म अल्लाहने मानवास प्रदान केला आहे. अल्लाह न्यायी, शासक, पालक आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याने मानवाला नैतिक, आध्यात्मिक आणि भौतिक जीवनासाठी सर्वकाही उपलब्ध करून दिले आहे.
अन्यथा त्याची बुद्धीमत्ता, शासन व्यर्थ सिद्ध झाले असते, ईश्वर म्हणवून घेण्याचा हक्क त्याला राहिला नसता. आपल्या जीवनाचा उद्देश्य आणि त्या उद्देश्याच्या प्राप्तिसाठी, यथार्थ मार्गासाठी सावधान करण्याची मानवास अत्यंत आवश्यकता होती जेणेकरून भ्रम, दुष्ट बुध्दी आणि भावनांच्या काळोखात भरकटत न जाता जीवनाच्या उद्देश्यपूर्तीसाठी सरळ मार्ग उपलब्ध व्हावा. धर्माचा(इस्लामचा) उद्देश्य आणि हेतुही हाच होता की ते मानवाच्या पूर्ण नैतिक जीवनाचे अधिष्ठान व्हावे शासक आणि सर्व मानवजातीचा ईश्वर असण्यासाठी त्याने मानवी जीवनाचे सर्व पैलू व्यापून टाकले आहेत. कोणताही पैलू त्याच्या आवाक्या बाहेर नाही. मानवी जीवनातील कोणत्याही बाबी किवा व्यवहाराच्या नैतिक बाजू संबंधी चांगल्या व वाईट गोष्टींची चर्चा उद्भवू शकते. म्हणून अल्लाहकडून कोणत्याही बाबतीसंबंधी उपदेश आणि मार्गदर्शनास मानव वंचित राहता कामा नये. म्हणून अल्लाहचा हा अंतिम धर्म म्हणजे इस्लाम एक एक करून सर्व समस्यावर चर्चा करतो. उपासना गृहापासून सामुदायिक जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक बाबीसंबंधी उपदेश करतो. या सर्व उपदेशांच्या सर्व समावेशक संग्रहाचे नांव इस्लाम धर्म(परिपूर्ण जीवनपद्धती) आहे आणि त्याची प्रत्येक बाब धर्माचा अंश असते.
इस्लामच्या दृष्टीने पूजा, उपासना, आराधना आणि तपस्या यांच्या पेक्षा ‘‘इबादत’’ खूप विकसित आहे. ईश्वराची आराधना आणि त्याचे स्मरण हा भक्तीचा प्राण आहे, परंतु परिपूर्ण भक्ती नाही. इस्लामनुसार, अल्लाहने दिलेल्या संपूर्ण आदेशांचे पालन करणे ही परिपूर्ण भक्ती आहे. कोणत्याही भेदभाव आणि विभाजना शिवाय पूर्ण निष्ठेने आणि खर्या भक्ती भावाने आणि मनःपूर्वक आज्ञापालनासह केलेली भक्ती ही ‘‘इबादत’’ आहे. अल्लाहने पाठविलेला हा धर्म सर्वसमावेशक उपदेशांचा आणि आदेशांचा संग्रह आहे, हा धर्म समस्त मानवजातीसाठी आहे, हे लक्षात ठेवून इस्लामच्या संपूर्ण शिकवणीतील प्रत्येक लहान सहान बाबीसह सर्व अमंलात आणून संपूर्ण जीवनाला समर्पित केल्याशिवाय ‘‘इबादत’’ परिपूर्ण होत नाही.
इस्लाम आणि पवित्र कुरआननुसार परमेश्वर, धर्म आणि भक्ती यांच्या जर या व्याख्या असतील तर माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधीत गोष्टीबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. चर्चा केली गेली तरी ती इस्लाम धर्म, ईश्वर भक्ती यात त्याचा समावेश होणार नाही, कौटुंबिक आणि सामाजिक बाबी या सुद्धा मानवी जीवनाचाच एक भाग आहे. मग परमेश्वरी धर्म या बाबीना दृष्टीआड कसा करू शकेल? याबाबतीत उपदेश किवा आदेश कसा न देईल? सत्य आणि न्याय यांची आवश्यकता कशी नसेल? जे आदेश किवा उपदेश याबाबतीत दिले असतील त्याना धार्मिक महत्व कां नाही? त्यांचे पालन करणे सक्ती केले असते काय? त्यांचे अमलात आणणे किवा न आणणे याचा मुस्लिम असणे किवा नसणे यावर काहीच परिणाम झाला नसता काय?
ईश्वर, धर्म आणि उपासना याबाबतच्या काही लोकांच्या धारणा वेगळ्या असू शकतात. नव्हे तर अधिकांश लोकांच्या या धारणा वेगळ्याच आहेत. अशा लोकांना इस्लामी व्यक्तिगत कायद्याच्या धार्मिक प्रतिष्ठेचे आकलन होणे आणि त्यांची योग्यायोग्यता ठरविणे फारच कठीण आहे. परंतु येथे योग्यायोग्यतेचा ही प्रश्न उद्भवत नाही. तथापि मूळ प्रश्न वास्तवतेचा आहे आणि वास्तवता ही आहे की हे कायदे धार्मिक प्रतिष्ठेचे असून ते धर्माचाच एक अविभाज्य भाग आहेत, यास कोणत्याही प्रकारे नाकारता येत नाही. पवित्र कुरआनची शिकवणुक, इस्लामची धर्मविषयक आणि ईश्वर विषयक धारणेशी सुसंगत असून इस्लामचे व्यक्तिगत कायदे इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे.
सामुदायिक आणि सांस्कृतिक महत्व
मुस्लिम व्यक्तिगत कायद्याच्या प्रतिष्ठेची योग्यता आणि मौलिक महत्व उपरोक्त विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. त्या विषयी अधिक खुलासा करण्याची आवश्यकता दिसत नाही. परंतु प्राप्त परिस्थितीच्या आवश्यकते नुसार, या कायद्याची धार्मिक प्रतिष्ठा तात्पुरती बाजुला ठेवून त्या कायद्याच्या केवळ सांस्कृतिक व सामुदायिक दृष्टीकोनातून त्याच्या महत्वाच्या बाबतीत परिक्षण करू. या जेणे करून कोणत्याही कारणाने त्यांची धार्मिक प्रतिष्ठा समजण्यास जे असमर्थ असतील, त्यांच्याही हे लक्षात यावे की मुस्लिम आपल्या व्यक्तिगत कायद्यांना का कवटाळून बसले आहेत आणि त्याना तसे करणे का अपरिहार्य आहे?
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *