पती-पत्नींत, भावा-भावात, भाऊ-बहीणीत, बहिणी-बहीणीत, आईवडील-मुलांत, सासु-सुणेत, शेजारी-शेजारी राष्ट्रांमध्ये भांडण लावणारा कोण आहे तो? कोण आहे तो माणसाला धर्म, जातपात मध्ये विभाजीत करणारा? कोण आहे तो माणसामध्ये धर्माच्या मोठ-मोठ्या भिंती उभी करणारा? कोण आहे तो धर्माचा नाव होऊन माणसात भांडण लावणारा? कोण आहे तो माणसाला निर्दयी, पापी, दुष्ट बनविणारा? कोण आहे तो दारू पिण्यास, गुटखा खाण्यास, बिडी, सिगारेट, तंबाखू, गांजा, चरस, जुगाराचे व्यसन लावणारा?
भ्रष्टाचार, व्याभिचार, सामुहिक, बलात्कार, आत्महत्या, व्याजाचे व्यवहार या सर्व गोष्टी करण्यास माणसास प्रवृत्त करणारा कोण आहे तो? न दिसणारा, पण आपल्या शरीरात रक्तासारखा भ्रमण करणारा, आपल्या मनात, डोक्यात विविध प्रकारचे वाईट विचार आणणारा कोण आहे तो? समस्त मानवजातींचा शत्रू कोण आहे आहे ते त्याला आपला हेवा आहे, मत्सर आहे, इर्शा आहे. त्याला आपण चांगले राहिलेले पहावत नाही आणि आपणही दुःखी, नाऊमेद झाल्यास तो खूप आनंदीत होतो. तो आपल्याला स्वर्गात जाण्यापासून रोखण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्याची मनोकामना आहे की आपण त्याच्यासोबत नर्कात जावेे.
पवित्र रमजान महिन्यात तो बंदीस्त होता आता परत रमजान समाप्त झाले की तो सुटला आहे त्याचे अनुयायी आपल्या सोबत आहेत. होय तो सैतान आहे!
शैतानाच्या प्रमुखाचे नाव इब्लीस आहे. ज्याने अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा केली आणि आदम (अलैसलाम) यांच्या संततीच्या आधीन राहण्यास नकार दिला. यालाच शैतान म्हटले आहे. हे केवळ एखाद्या शक्तीचे नाव नसून ते सुद्धा मानवाप्रमाणे एक निश्चित असे व्यक्तीमत्व धारण केलेले अस्तित्व आहे म्हणून कुरआन खुलासा करतो की शैतान, जिन्नपैकी होता जे इशदूत (फरिश्ते) पेक्षा वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे.
मानवाच्या निर्मिती अगोदर अल्लाहने फरिश्ते (इशदूत) आणि जिन्न यांची निर्मिती केली होती. आदम आणि हव्वा (अलैसलाम) यांच्या सत्य घटनेस नाकारणे म्हणजे येणाऱ्या पिढीने कोरोनाला नाकारणे होय.
जगातील तीन मोठे धर्मांचे अनुयायी म्हणजेच ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामचे अनुयायी आदम आणि ईव्ह च्या घटनेला सत्य मानतात. एखादी गोष्ट आपल्यासमोर नाही घडली की त्याला नाकारायचेच का? आदम आणि इवचे अस्तित्व नाकारणे म्हणजे आपले आई-वडिलांना नाकारने आपले अस्तित्वच त्यांचा पुरावा आहे.
कुरआनमधील सुरे अलऐराफ (11-25) मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे की,
11) आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला मग तुम्हाला स्वरूप दिले मग दुतांना सांगितले की, आदम समोर नतमस्तक व्हा (सज्दा करा) या आज्ञेनुसार सर्व नतमस्तक झाले परंतु इब्लीस नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही.
12) विचारले, ’’तुला कोणत्या गोष्टीने नतमस्तक होण्यासून रोखले. जेव्हा मी तुला आज्ञा दिली होती? ’’म्हणाला’’ मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तू मला अग्नीपासून निर्माण केले व त्याला मातीपासून. 13) फरमाविले, असे होय, तर तू येथून खाली उतर, तुला, अधिकार नाही येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो, की वस्तूतः तू त्यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात.
14) तो म्हणाला, ’’ मला त्या दिवसापर्यंत सवलत दे, जेव्हा हे सर्व दुसऱ्यांदा उपस्थित केले जातील. 15. फर्माविले, ’’ तुला सवलत आहे. 16. म्हणाला, ’’ बरे तर ज्या तऱ्हेने तू मला मार्गभ्रष्ट केले आहेस, मी सुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर असलेल्या या मानवाच्या पळतीवर राहीन. 17. पुढून आणि मागून, उजवीकडून व डावीकडून चोहोबाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत. 18. फर्माविले, चालता हो येथून, अपमानित व धिःकारित. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझे अनुकरण करतील तुझ्यासहीत त्या सर्वांनिशी नरक भरून टाकीन.
19. आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघे या स्वर्गामध्ये रहा. येथे जी वस्तू खाण्याची तुमची इच्छा असेल खा, परंतु, त्या वृक्षाच्या जवळ फिरकू नका, नाहीतर अत्याचाऱ्यांपैकी व्हाल.
20. मग शैतानने त्यांना बहकाविले जणेकरून त्यांचे गुप्तांग जे एकमेकांपासून लपविले गेले होते त्यांच्या समोर उघड झाले. त्याने त्या दोघांना सांगितले. ’’ तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला या वृत्ताची जी मनाई केली आहे त्याचे कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेस तुम्ही देवदूत बनू नये अथवा तुम्हाला अमरत्व लाभू नये.
21. आणि त्याने शपथ घेउन त्यांना सांगितले की मी तुमचा खरा हितचिंतक आहे.
माणूस आपल्या हितचिंतकावर खूप विश्वास करतो आणि कोणी शपथ घेउन सांगतो तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही.
22. अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्याने हळूहळू आपल्या वळणावर आणले. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे झाले आणि ते आपल्या गुप्तांगाना स्वर्गातील पानांनी झाकू लागले तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना पुकारले, ’’काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखले नव्हते आणि म्हटले नव्हते की शैतान तुमचा उघड शत्रू आहे?
23. दोघे बोलते झाले, ’’हे पालनकर्त्या आम्ही स्वतःवर अत्याचार केला, जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू’’ 24. फर्माविले, ’’ चालते व्हा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवर निवासस्थान व जीवनसामग्री आहे. 25. आणि फर्माविले, तेथेच तुम्हाला जगणे व तेथेच मरणे आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशवेटी काढले जाईल.
या आयातींमधून आपल्याला स्पष्ट होते की कसं शैतानाने अहंकार आधीन जाऊन अल्लाहची अवज्ञा केली व अल्लाहच्या मार्गावर मानवाला चालू न देण्याची जणू शपथच घेतली आहे. आधी समस्त मानवजात एक अल्लाहच्या मार्गावर होती शैतानने मार्गभ्रष्ट करून माणसांत धर्म-जात-पात निर्माण केली.
सैतानच्या चाली (ट्रिक्स)
1. लोकांना त्यांच्या परमेश्वर (अल्लाहच्या) उपासनेपासून रोखणे.
2. वाईट गोष्टींना चांगले करून दाखविणे जसं की मेकअप केल्यानंतर चेहरा चांगला दिसतो पण तो काही वेळासाठीच. मेकअप हा पूर्णपणे उणीवांना भरत नाही तर फक्त वरवरच चांगले भासवितो. तसेच शैतान व्याजाला नफा (इंट्रेस्ट) नाव देऊन कधी … म्हणून त्याला चांगले करून दाखवतो, दारूला हेल्थ आणि बॉडी बिल्डींगचे आणि दुःख विसरण्याचे साधन म्हणून दाखवितो.
3. दारू, जुगार मार्फत लोकांत शत्रूत्व घालतो. अॅक्सीडेंट, बलात्कार आणि गुन्ह्यांमागे दारूच असते. जॅकपॉट, कॅसिनो हे स्टँडर्ड जुगार आहेत.
4. अल्लाहची आठवण (जिक्र)पासून माणसाला रोखतो. 5. नमाज खराब करण्यासाठी सैतानचा स्पेशल टाईप आहे त्याचे नाव ’’खिनझीब’’ आहे हा नमाजमध्ये येऊन माणसाला बहकावितो. सर्व पेंडिंग कामाची आठवण करून देतो.
6. रागात आणणे : आज कारागृहात जे लोक आहेत अधिकांश त्यांच्यातले रागामध्ये येऊनच गुन्हे केलेले आहेत. राग आल्यावर उभे असाल तर बसा, बसलेले असाल तर झोपा, राग आल्यानंतर पाणी अवश्य पिले पाहिजे कारण सैतान अग्नीपासून बनलेला आहे आणि पाणी अग्नीला विझवते. अल्लाहची शरण घेणे. आऊजू बिल्लाही मिनश्शैतानी निर्रजिम (मी अल्लाहची शरण घेतो शैतान धिःकारलेल्यापासून) चे पठण करणे. 7. शैतान आपल्याला चेहऱ्यांमध्ये बदल करायला लावतो. (प्लास्टिक सर्जरी, आयब्रोट्रिमिंग) आणि दातांमध्ये गॅप बनविण्यास लावतो. 8. आई-वडिलांचे आज्ञापालन करू न देणे. आई-वडिलांचे आज्ञापालन न करणारा नरकात जाणार आहे आणि हेच शैतान इच्छितो. 9. नातेवाईकांचे हक्क न अदा करण्यास प्रवृत्त करतो. एकमेकांविषयी वाईट विचार मनात घालतो. 10. वायफळ खर्च करणारे शैतानचे बंधू असतात. विनाकारण मॉलमध्ये जाऊन वायफळ खर्च केला जात आहे आजकाल तो शैतानच्या मोटीव्हेशन मुळेच. 12. गर्भपात करण्यास प्रोत्साहित करतो. संततीला ओझे आहे असे दाखवितो. लिव्हिंग स्टँडर्ड हाय करायचा असेल तर त्यांना मारून टाकावे जास्त संततीचे पालनपोषण कसे करावे? अश्या निगेटीव्ह थॉट्स माणसाच्या मनात घालतो, अल्लाह सुरे बनी इसराईल मध्ये फरमावितो की आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा, वस्तुतः त्यांना ठार करणे एक मोठे अपराध आहे.
13. व्याभिचार : शैतान माणसाला व्याभिचारासाठी प्रोत्साहित करतो आणि अल्लाहचा फरमान आहे की, व्याभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. हा आदेश प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा आहे आणि संपूर्ण समाजासाठी सुद्धा आहे. केवळ व्याभिचार कार्यापासूनच नाही तर त्याला प्रोत्सहन देणाऱ्या गोष्टींपासून व उत्प्रेरकांपासून. 14. शैतान खोट्या इच्छा आकांक्षा आणि आशा दाखवून आपल्या फेऱ्यात अडकवितो. 15. भयानक स्वप्न शैतानाकडूनच असतात म्हणून पैगंबरांचा आदेश आहे की भयानक स्वप्न आल्यास डाव्या बाजूला धुतकारून, आडंग बदलून झोपावे व 3 दिवस कोणाला सांगू नये. 16. माणसाला माणसावर जादू टोणे, करणी-धरणी करायला लावतो. 17. अश्लील गाणींद्वारा माणसाला इंन्टॉक्सीकेट करतो.
शैतानची कमजोरी (निगेटीव्ह पॉईंटस्)
1. अल्लाह समोर सज्द-ए-तिलावत केल्यास शैतान रडतो, आदमच्या संतानला सजद्याच्या हुकूम झाला. त्यांनी केला आणि स्वर्गात जाणार, मलाही हुकूम झाला होता मी नाही केला आणि नर्कात जाणार.
2. दुपारी थोडावेळ झोपणे (कैलूला करणे). सैतान कैलूला करत नाही.
3. पाप झाल्यास अल्लाहकडे क्षमा मागितल्यासही शैतान चिडतो. आणि अल्लाह परम दयाळू, कृपाळू आणि क्षमा करणारा आहे. तो कितीही वेळा माफ करायला तैय्यार आहे, त्याला आवडते की माणसाने गुन्हा केल्यास त्याची क्षमा मागावी, ’’सर्वात चांगले गुन्हेगार ते आहेत की जे पटकन झालेल्या चुकांची माफी मागतात आणि परत न करण्याच्या निश्चय करतात.
सैतानापासून बचाव कसं करावे?
1. कधीही राग आला, निगेटीव्हीटी आली. उदासीनता झाली तर अल्लाहच्या शरणी जा (अऊझुबिल्लाही मिनशैतानी निर्रजीम) म्हणत दररोज सकाळी 10 वेळा 3 सायंकाळी 10 वेळा.
2. कोणत्याही कामात जलदबाजी, घाई, गडबड न करणे केलेल्या गुन्ह्यांची माफी मागणे.
3. अल्लाहशी संबंध मजबूत ठेवणे,
4.कुरआन पठाण करणे.
5. मृत लोकांची, आत्म्यांची भिती मनात न ठेवणे कारण मेल्यानंतर आत्मा परत येत नाही ती ’बरजख’ मध्ये असते. 6. संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळी लेकरांना घरात घेऊन ’’ बिस्मील्लाह’’ म्हणून घराचा दार लावून घ्या अन्यथा शैतान घरात शिरतो आणि बिसमिल्लाह न बोलून जेवण केल्यास खूप आनंदीत होतो की राहण्यासोबत जेवण्याचीही सोय झाली. कारण अल्लाहचा नाव न घेता खाणे ही शैतानच्या पोटात जाते आणि जेवूनही न जेवल्यासारखे वाटतेे.
7. कपडे बदलनाता बिस्मील्लाह म्हणणे, वॉशरूमचे दार नेहमी बंद ठेवणे आणि वॉशरूम जाण्याआदीही बिसमिल्लाह म्हणणे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात बिस्मील्लाहने केली की तेे लवकर पूर्ण होतेे.
8. शक्यतो रागावर नियंत्रण ठेवणे. पैगम्बर सल्ल. ने सांगितले आहे की, खरा बहादूर (शूर) व्यक्ती तो असतो जो रागाच्या भरात स्वतःवर नियंत्रण ठेवतो.
9. परस्त्री सोबत एकांतात बसू नये.
10. एकट्या स्त्रीने लांबचे प्रवास करू नये. जेव्हा एकटी स्त्री घराबाहेर पडते तेव्हा शैतान तिचा मागे लागतो तिला टक लावून पाहतो.
11. सूरे अलबकराची नित्याने तिलावत करणे. ज्या घरात या सुरहची तिलावत केली जाते सैतान त्या घरात शिरूच शकत नाही.
12. आयतुल कुर्सींची तिलावत करणे.
13. जांभळी आल्यानंतर तोंडावर डाव्या हाताच्या पाठीमागचा भाग ठेऊन लाहोलवला कुवता म्हणणे.
14. शैतानाच्या प्लानींग लोकांना समजून सांगणे.
15. शिवीगाळ करू नये. शिव्या दिल्याने शैतान खूश होतो. इस्लामची शिकवण आहे की कुणाला शिवी देऊ नये. शैतानालाही शिवी देऊ नये. तर माणसाला शिवी द्यायचा विचारही करू नये.
16. सैतान आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्याला बहकविण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सावधान अल्लाह सर्वांचा शेवट चांगला करो. सैतानापासून आपले रक्षण करावे.
आमीन.
– डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
0 Comments