करे गैर गर बुत की पूजा तो काफिर, जो ठहराए बेटा खुदा का तो काफिर।
झुके आगपर बहर सजदा तो काफिर, कवाकिब में माने करिश्मा तो काफिर॥
मगर मोमिनोंपर कुशादा हैं रहे परस्तिश करे शौक से जिसकी चाहे।
अर्थात – इतर कुणी मूर्तीपूजा केली तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. जसे हिंदू, जर कुणी एखाद्याला (येथे संदर्भ येशू ख्रिस्त) ईश्वराचा पुत्र मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा. जर कोणी (येथे संदर्भ अहुरमज्दला मानणारा अग्निपूजक पारशी समाज) अग्नीसमोर नतमस्तक झाला तर तो अल्लाहचा इन्कार करणारा मानला जातो. तर एखाद्याने तेजस्वी ताऱ्यामध्ये चमत्कार असल्याचे मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. परंतु श्रद्धावंतांसाठी (मुस्लिमांसाठी) सर्व मार्ग मोकळे आहेत. त्यांनी आपल्या इच्छेनुसार कोणतीही पूजा करावी.
याच्या पुढे जाऊन एकेश्वरत्व असा आहे की, आराधना आणि अर्चना अल्लाहची करा आणि आज्ञापालन त्या शक्तीचे करा, ज्याची आज्ञा काळावर चालत असेल. याशिवाय त्याचे आज्ञापालन कराल तर अल्लाहचे भय बाळगून करा. अल्लाहच्या भीतीसारख्या स्थितीत सेवा, सैतानाच्या आज्ञेचे पालन अथवा त्या शक्तीच्या आज्ञेचे पालन करा जी काळावर आपला हुकूम चालवीत आहे. जर तिला भिऊन तिची सेवा कराल तर या गोष्टीचा मेळ एकेश्वरत्वाशी बसत नाही. असे नव्हे तर अल्लाह ज्याची आज्ञा पूर्णपणे पाळली जाते, असे मानून अल्लाहच्याच भयाने थरथरत त्याच्या द्रोहींची सेवा व आज्ञापालन करू नका, कारण तुम्ही एकेश्वरवादी आहात. एकेश्वरत्वाच्या विरुद्ध त्या गोष्टीपासून तरी स्वत:ला वाचवा ज्या पुरातन काळापासून अनेकेश्वरत्व म्हणून ओळखल्या जातात. परंतु जे अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान आहेत, ज्यांना सामान्यत: अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान नाही तर शासक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याविरुद्ध काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांचे जग वेगळे आहे आणि आमचे वेगळे. जर असे कराल तर ही ऐहिकता ठरेल जी धार्मिकतेच्या विरुद्ध आहे.
0 Comments