Home A hadees A अल्लाहचा कृतज्ञ दास
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

अल्लाहचा कृतज्ञ दास

 

माननीय मुगीरा बिन शोबा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) नमाजमध्ये दीर्घकाळ उभे राहात, त्यामुळे त्यांचे पाय सुजले जात असत. पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘तुम्ही इतकात्रास का घेता जेव्हा की तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी अल्लाहचा कृतज्ञ दास बनू नको?’’

स्पष्टीकरण

‘‘तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत.’’ हा संकेत कुरआनच्या खालील आयतीकडे आहे,

‘‘हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला उघड विजय प्रदान केला जेणेकरून अल्लाहने तुमची पुढील व पाठीमागील प्रत्येक उणीव माफ करावी आणि तुमच्यावर आपली देणगी परिपूर्ण करावी व तुम्हाला सरळमार्ग दाखवावा.’’ (दिव्य कुरआन, ४८:१-२) ‘‘मी ईश्वराचा कृतज्ञ दास बनू नको?’’ म्हणजे उपासनेचा उद्देश (इबादत) केवळ हाच नाही की आमचे अपराध व उणिवांना माफ केले जावे आणि ईश्वराकडून आमची पकड होण्याचे भय व शिक्षा देण्याचे भय व संशय राहू नये. इबादत (उपासना) व प्रणिपातचा एक उद्देश आपल्या प्रभुप्रति कृतज्ञता व्यक्त करणेसुद्धा आहे, याचे आमच्यावर अगणित उपकार आहेत. त्यानेच आमचे मागील पुढील सर्व गुन्हे माफ केले आहेत. आपल्या या प्रभुप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा सर्वोत्तम विधी हा आहे की दासाने आपल्या प्रभुसमोर कृतज्ञतेच्या प्रगाढ व उत्कट भावनेसह नतमस्तक व्हावे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *