Home A hadees A हज

हज

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हजयात्रेचा निश्चय करणाऱ्या मनुष्याने ती लवकरात लवकर पूर्ण करावी; कारण कदाचित तो  आजारी पडेल, कदाचित प्रवासाचे वाहन उपलब्ध नसेल (म्हणजे प्रवासात अडथळा निर्माण होईल, प्रवासात एखादे संकट कोसळेल, प्रवासखर्च उरणार नाही) आणि कदाचित एखादी अशी  स्थिती निर्माण होईल ज्यामुळे हजयात्रेचा प्रवास अशक्य होईल. (याकरिता घाई करा, कोणती विवशता येईल सांगता येत नाही की ज्यामुळे तुम्ही तुमची हजयात्रा पूर्ण करू शकणार  नाही.) (हदीस : इब्ने माजा)

माननीय हसन (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांनी सांगितले, ‘‘माझी अशी इच्छा आहे की हजयात्रा करू शकणाऱ्या कोणकोणत्या लोकांनी हजयात्रा  केलेली नाही हे पाहण्यासाठी या शहरांमध्ये (इस्लामी राष्ट्रांमध्ये) काही माणसे पाठवावीत. मग त्यांनी त्या लोकांवर जिझिया कर (सक्षम मुस्लिमेतर नागरिकांकडून घेतला जाणारा  संरक्षण कर) आकारावा. हे लोक मुस्लिम नाहीत, हे लोक मुस्लिम नाहीत. (जर ‘मुस्लिम’ असते तर कधीचीच हजयात्रा पूर्ण केली असती. ‘मुस्लिम’चा अर्थ आहे स्वत:ला अल्लाहच्या  स्वाधीन करणारा, अथवा त्याने खरोखरच स्वत:ला अल्लाहच्या स्वाधीन केले आहे, तेव्हा तो कोणत्याही विवशतेशिवाय हजसारख्या महत्त्वाच्या उपासनाविधीबाबत निष्काळजीपणा कसा करू शकतो.) (हदीस : मुन्त़का)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य हज अथवा उमरा अथवा जिहादचा निश्चय करून आपल्या घरातून बाहेर पडला  असेल आणि वाटेत त्याला मृत्यू आला असेल तर अल्लाह त्याला तेच पुण्यकर्माचे फळ देईल जे तेथे हाजी, गाजी आणि उमरा करणाऱ्यांसाठी निश्चित आहे.’’ (हदीस : मिश्कात)

वैध कमाई
माननीय मिकदाम बिन मअदी करब यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वकमाईपेक्षा उत्तम भोजन कोणत्याही व्यक्तीने कधीही केले नाही आणि अल्लाहचे  पैगंबर दाऊद (अ.) स्वकमाईने आपला उदरनिर्वाह करीत होते.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

या हदीसचा उद्देश ईमानधारकांना भीक मागण्यापासून आणि दुसऱ्यांसमोर हात पसरण्यापासून रोखणे आहे आणि या गोष्टीचे प्रशिक्षण देणे आहे की मनुष्याने आपला उदरनिर्वाह स्वत:  कमविला पाहिजे, एखाद्या व्यक्तीवर भार बनून जीवन व्यतीत करू नये.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह पवित्र आहे आणि फक्त पवित्र धनच कबूल करतो आणि अल्लाहने ईमानधारकांना याच  गोष्टीचा आदेश दिला आहे ज्याचा त्याने पैगंबरांना आदेश दिला आहे. म्हणूनच तो म्हणतो, ‘हे पैगंबरांनो! पवित्र उपजीविका खा आणि सत्कर्म करा’ आणि ईमानधारकांना उद्देशून तो  म्हणतो, ‘हे ईमानधारकानो! ज्या पवित्र व वैध खाद्यपदार्थ आम्ही तुम्हाला दिले आहेत ते खा.’ मग पैगंबरांनी एका अशा मनुष्याचा उल्लेख केला जो खूप लांबून पवित्रस्थळी येतो,  मनोमालिन्याने वैतागलेला असतो आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उचलून म्हणतो, ‘हे माझ्या पालनकर्त्या!’ (आणि दुआ मागतो.) खरे तर त्याचे अन्न निषिद्ध आहे, त्याचे
पाणी निषिद्ध आहे, त्याचा पोषाख निषिद्ध आहे आणि निषिद्ध गोष्टींद्वाचे त्याचा उदरनिर्वाह चालतो; मग अशा मनुष्याची दुआ (प्रार्थना) का स्वीकारली जाईल. (हदीस : मुस्लिम)

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *