Home A hadees A सहप्रवाशाचा अधिकार

सहप्रवाशाचा अधिकार

माननीय मुआज (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर एका ‘गजवा’ (इस्लामसाठी केलेले युद्ध – जिहाद) मध्ये गेलो. लोकांनी राहण्याची जागा कमी  केली आणि मार्ग बंद केला. पैगंबरांनी एका मनुष्याला पाठवून उद्घोषणा केली, ‘‘जो कोणी राहण्याची  जागा अडवील अथवा मार्ग बंद करील त्याला ‘जिहाद’चे पुण्य लाभणार नाही.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
लोकांनी आपली राहण्याची जागा लांब-रूंद आणि विस्तृत केली होती आणि आणखीन पसरून राहात होते. परिणामस्वरूप चालणाऱ्यांना त्रास होऊ शकत होता. म्हणून पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी असे जाहीर करविले की, ‘‘जे लोक प्रवासात निघाले आहेत आमि त्यांचा हा प्रवास पुण्याईचा प्रवास ठरो यासाठी त्यांनी पसरून न राहता आवश्यकत तेवढ्याच जागेत राहावे,  जेणेकरून दुसऱ्या साथीदारांना राहाण्यासाठी जागा मिळावी अथवा ये-जा करण्यात त्यांना त्यास होऊ नये.

आजाऱ्याची विचारपूस
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, ‘‘हे आदमपुत्रा! मी आजारी होतो तेव्हा तू माझी  विचारपूस करण्यासाठी आला नाहीस.’’ तेव्हा तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझी विचारपूस कशी करणार, तू तर संपूर्ण जगाचा पालनकर्ता आहेस?’’ तेव्हा अल्लाह म्हणेल,  ‘‘तुला हे माहीत नव्हते काय की माझा अमुक दास आजारी पडला होता तेव्हा तू त्याची विचारपूस करण्यासाठी गेला नाहीस. तुला हे माहीत नव्हते काय की जर तू त्याची विचारपूस  केली असतीस तर त्याच्याजवळ तुला माझे सान्निध्य आढळले असते? (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
आजाऱ्याची विचारपूस करणे म्हणजे फक्त एखाद्या आजारी माणसाच्या घरी जाणे आणि त्याची स्थिती कशी आहे हे विचारणे एवढेच नसून आजाऱ्याची वास्तविक आणि खरी विचारपूस  म्हणजे जर तो गरीब असेल तर त्याच्या औषधपाण्याची व्यवस्था करणे अथवा गरीब नसेल मात्र कोणी वेळेवर औषध आणणारा व पाजणारा नसेल तर त्याची काळजी घेणे. माननीय  अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आजाऱ्याची विचारपूस करा आणि भुकेल्याला जेऊ घाला आणि कैद्याच्या सोडवणुकीची व्यवस्था करा.’’  (हदीस : बुखारी)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, एक ज्यू मुलगा पैगंबर मुहम्मद (स.) यांची सेवा करीत होता. तो आजारी पडला तेव्हा पैगंबर त्याची विचारपूस करण्यासाठी गेले. त्याच्या  उशीजवळ बसले आणि त्याला म्हणाले, ‘‘तू इस्लामचा स्वीकार कर.’’ त्याने आपल्या जवळच बसलेल्या वडिलांकडे पाहिले. ते (मुलाचे वडील) म्हणाले, ‘‘तू पैगंबर मुहम्मद (स.) यांचे  म्हणणे मान्य कर.’’ तेव्हा त्या मुलाने इस्लामचा स्वीकार केला. त्यानंतर पैगंबर त्याच्या घरातून असे म्हणत निघाले, ‘‘अल्लाहची कृपा आहे ज्याने नरकापासून त्याला वाचविले.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन मित्र आणि शत्रू सर्वांना ठाऊक होते आणि सर्व ज्यू लोक पैगंबरांचे शत्रू नव्हते. या ज्यूचा पैगंबरांशी वैयक्तिक संबंध होता म्हणून त्याने  आपल्या मुलाला पैगंबरांची सेवा करण्यासाठी पाठविले होते.

संबंधित पोस्ट
July 2025 Muharram 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 5
1 6
2 7
3 8
4 9
5 10
6 11
7 12
8 13
9 14
10 15
11 16
12 17
13 18
14 19
15 20
16 21
17 22
18 23
19 24
20 25
21 26
22 27
23 28
24 29
25 30
26 Safar 1
27 2
28 3
29 4
30 5
31 6
1 7
2 8
3 9

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *