Home A hadees A सर्वांत महान माणसं

सर्वांत महान माणसं

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणी एका व्यक्तीला टंचाईत मदत केली तर अल्लाह त्या व्यक्तीला या जगी आणि परलोकात मदत करील. जर कुणास असे वाटावे की अल्लाहने कयामतच्या दिवशी त्याची मदत करावी तर त्यांनी टंचाईत सापडलेल्या माणसाचा बोजा कमी करावा किंवा त्याला माफ करावे.

प्रेषित म्हणाले की ‘‘जर कुण्या माणसानं आपल्या मुस्लिम बांधवांच्या कृत्यांवर पडदा टाकला तर अल्लाह कयामतच्या दिवशी अशा व्यक्तीच्या कृत्यांवर पडदा टाकेल.’’

अबु हुरैरा म्हणतात की प्रषितांनी मुस्लिमांना उद्देशून सांगितले की तुम्ही श्रद्धेचा स्वीकार करत असाल तरी तुमच्या मनांमध्ये श्रद्धा पोहोचली नाही, तुम्ही एकमेकांच्या गोष्टी कुणाला सांगू नका आणि लोकांच्या गुपित गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नका. जर कुणी लोकांची गुपिते उघड करत असेल तर अल्लाह त्याच्या गुप्त गोष्टी बाहेर आणील आणि अशा माणसाला त्याच्या नातेवाईकांच्या नजरेतच बदनाम करील.

‘‘जे लोक श्रद्धावंतांमध्ये व्यभिचाराला प्रोत्साहन देऊ इच्छितात त्यांना या जगी आणि परलोकात यातनादायक शिक्षा दिली जाईल.’’ (कुरआन, सूरह नूर)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या भाऊबंदांना मदत करत राहतो, तोपर्यंत अल्लाह देखील अशा व्यक्तीला मदत देत असतो. जो कुणी आपल्या भावाच्या गरजा पूर्ण करण्यात व्यक्त असतो अल्लाह देखील त्याच्या गरजा पूर्ण करत राहतो.’’

हजरत उमर (रजि.) म्हणतात, ‘‘सर्वोत्तम नेकी श्रद्धावंताना सदैव प्रसन्न ठेवत राहणे आहे. त्याला वस्त्रं नसतील तर त्यांची पूर्तता करा. तो भुकेला असेल तर त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा.’’

दुसरे खलीफा ह. उमर (रजि.) विधवा महिलांच्या घरी रात्रीच्या वेळी पाणी भरत असत. ह. अबु बाईल (र.) गल्ली-मोहल्ल्यातील वयस्क आणि निराधार महिलांची सेवा करत असत.

अबु दाऊद (रजि.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे त्यांचे अनुयायी जमले होते. ते प्रेषितांना एका व्यक्तीविषयी सांगत होते की आम्ही त्यांच्यासारखा नेक माणूस पाहिला नाही. जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर चालत होतो तेव्हा ते पवित्र कुरआनचे पठण करत असत. आम्ही सर्वजण कुठे थांबलो तर ते नमाज अदा करत ऱाहतात. त्यावर प्रेषितांनी त्यांना विचारले, ‘‘अशा वेळी त्यांच्या गरजा कोण पूर्ण करत होते?’’ प्रेषितांनी प्रत्येक गोष्टीविषयी विचारणा केली. त्यांच्या जनावरांची देखभाल कोण करत? हेदेखील विचारले. तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले की त्यांची सर्व कामे आम्ही करत होतो. यावर प्रेषित म्हणाले, ‘‘मग तर तुम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा महान आहात.’’

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)

संबंधित पोस्ट
January 2026 Rajab 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 10
30 11
31 12
1 13
2 14
3 15
4 16
5 17
6 18
7 19
8 20
9 21
10 22
11 23
12 24
13 25
14 26
15 27
16 28
17 29
18 30
19 Sha'ban 1
20 2
21 3
22 4
23 5
24 6
25 7
26 8
27 9
28 10
29 11
30 12
31 13
1 14

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *