Home A blog A सब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारसा

सब से पहले सच्चे मुसलमान बनें : प्रा. अझहरअली वारसा

दापोडी (वकारअहमद अलीम)-
इस्लामचे अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (स.) हे समस्त जगवासियांचे आदर्श आहेत. त्यांचे आचार, विचार व मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे ‘दीन’ (इस्लामी जीवनपद्धत) चा ठोस  पाया आहे. आधुनिक शिक्षणाने तुम्ही डॉक्टर, इंजीनियर वा इतर उच्चपदावर जाऊ शकता. परंतु त्या अगदोर तुम्ही सर्वोत्तम मुसलमान बना. यामुळेच भौतिक जगात व पारलौकिक  जगात तुम्ही यशस्वी व्हाल, असे भावपूर्ण उद्गार प्रा. अझहरअली वारसी यांनी येथे व्यक्त केले. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील  ‘इकरा इंग्लिश मेडियम स्कूल’ येथे जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र अंतर्गत येथे नवीन विभाग सुरू करण्यात आला, त्याच्या शुभारंभानिमित्त येथे ‘स्टडी सर्कल’ (चिल्ड्रन सर्कल) चे  आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्याथ्र्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूना कॉलेजचे रसायनशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. वारसी हे  बोलत होते.
इकरा इंग्लीश स्कूलचे चेअरमन मौलाना उबेर काझी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे पुण्याचे अध्यक्ष रिझवान खान, जमाअतचे  पिंपरीचे स्थानिक अध्यक्ष फेरोज खान, जमाअतचे पुणे विभागाचे सचिव तजम्मुल खान, पूना कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख, जमाअतच्या आकुर्डी शाखेचे सदस्य म. सलीम मुजावर   आणि इकरा स्कूलचे सचिव म. सलीम शेख, मौलाना अब्दुल मजीद आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
जमाअतच्या नवनिर्मित दापोडी शाखेचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की वय १४ पर्यंतच्या मुलांमध्ये इस्लामी  जीवनपद्धतीसंबंधी जागृती निर्माण करणे,शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे, अंतिम प्रेषितांचा ज्ञानार्जनासंबंधीचा दृष्टिकोन विद्याथ्र्यांमध्ये आणणे हेच स्टडी सर्कलचे उद्दिष्ट आहे. याद्वारे आईवडिलांची आज्ञाधारकता, शारीरिक व सार्वजनिक स्वच्छता, अपायकारक वस्तूंपासून दूर राहाणे, आदि आदर्श मूल्यांची जोपासना मुलांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच  शालेय स्पर्धा, खेळ इत्यादींमध्ये सहभागी होणे आणि त्याद्वारे निश्चित ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तयारी करवून घेणे, नमाज वेळेवर अदा करणे, उच्च चारित्र्य निर्माण करण्याचा  उद्देश असून दर रविवारी केवळ इकरा स्कूलचेच नव्हे तर सबंध दापोडी परिसरातील १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन जमाअतच्या स्थानिक शाखेतर्फे करण्यात
येणार असल्याची माहिती अजीमोद्दीन शेख यांनी या वेळी दिली.
इकरा इंग्लीश स्कूलचे सचिव म. सलीम शेख यांनी ‘स्टडी सर्कल’ उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले की स्टडीमुळे मुलांमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. आमच्या शाळेतील उपस्थित विद्याथ्र्यांमधील नैतिक, चारित्र्यात्मक बदल पाहून परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्टडी सर्कलमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील, असा   आशावादही शेख यांनी व्यक्त केला.
लहान मुलांना समजेल व उमजेल अशा अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत मार्गदर्शन करताना प्रा. वारसी यांनी थेट संवाद साधला. ह. मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून प्रेषित्वाची  शुभसूचना मिळाली. प्रेषितांनी आपल्या घराण्यातील सर्वांना एकत्रित करून याची उद्घोषणा केली. पण एकानेही प्रेषितांचे म्हणणे मान्य केले नाही. पण प्रेषितांच्या काकांचा ११ वर्षांचा  मुलाग उठून उभा राहिला. वडीलधाऱ्यांसमोर उभारताना त्याचे पाय लटपटू लागले. पण… निश्चय पर्वतासमान. त्याने निर्भीडपणे सांगितले, हे प्रेषिता! आपण अल्लाहचे सच्चे प्रेषित आहात. मी त्यावर श्रद्धा ठेवतो. मी इस्लाम स्वीकारून माझे आचरण आपल्या आदेशानुसार करीन. इतिहासात त्या मुलाचे नाव अजरामर झाले. तेच इस्लामचे चौथे खलीफा ह. अली  (रजि.) होत. प्रेषितांचे ते जावईही झाले.
ही दृढनिश्चयता स्टडी सर्कलद्वारे जमाअत मुलांमध्ये आणू इच्छिते. त्यासाठी प्रत्येक रविवारी विविध विभागांतील तज्ज्ञ मंडळी येतील आणि मुलांना मार्गदर्शन करतील. येणाऱ्या  काळात समाजाचे नेतृत्व यामधूनच फुलू लागेल, असा विश्वासही प्रा. वारसी यांनी व्यक्त केला.
एस.आय.ओ.चे अध्यक्ष रिझवान खान यांनीही आपले विचार व्यक्त केले. मौ. उबेर काझी यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर वकारअहमद अलीम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात सुश्राव्य कुरआन पठणाने झाली. अजीमोद्दीन शेख यांनी अत्यंत सूचकतेने सूत्रसंचालन केले. शेवटी मुलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *