Home A hadees A संवेदनशीलता

संवेदनशीलता

माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.


आम्ही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत अबू  सैफ लोहार यांच्याकडे गेलो (जे पैगंबरांचे पुत्र इब्राहीम यांना दूध पाजणाऱ्या मातेचे पती होते.) पैगंबरांनी इब्राहीम यांना कडेवर घेऊन त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा अबू सैफ यांच्याकडे गेलो, त्या वेळी इब्राहीम हे मरणासन्न अवस्थेत होते. हे पाहून पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले. अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘हे इब्ने औफ! ही कृपाशीलता आहे.’’

यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. पैगंबर म्हणाले, ‘‘डोळे अश्रुंनी डबडबलेले आहेत आणि हृदय दु:खी झाले आहे. तरीसुद्धा आमच्या तोंडून तेच निघेल ज्यामुळे आमचा प्रभु प्रसन्न होईल. हे इब्राहीम, निश्च्ति आम्ही तुझ्या विरहात शोकाकुल आहोत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पुत्र इब्राहीम यांना प्रेम केले. त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. आपल्या तोंडासह नाक इब्राहीमच्या तोंडावर अशा प्रकारे ठेवले जसे कोणी फुलाचा वास घेत आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पुत्र इब्राहीम तेव्हा सोळा-सतरा महिन्यांचेच होते की त्यांचे देहावसान झाले. येथे त्यांच्या आजारपणाचा व मरणासन्न अवस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे. पैगंबरांनी जेव्हा पाहिले की हृदयाचा तुकडा नेहमीसाठी विलग होत आहे, तेव्हा पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले.

माननीय अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’ याचा अर्थ होतो की अशा परिस्थितीत मनुष्य दु:खी होतो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात. हे महानतेच्या प्रतिकूल अजिबात नाही. पैगंबर जगात यासाठी तर पाठविले जात नाहीत की त्यांनी लोकांना भावनाशून्य व संवेदनाहीन बनवावे. पैगंबर तर लोकांना जीवनाचा स्वाभाविक व सत्य मार्ग दाखविण्यासाठी येतो. मानवी जीवनात सुख व दु:खाचे अवसर येतच राहतात. दु:खाच्या समयी मनुष्याने दु:ख प्रकट करावे, परंतु त्याला ईश्वराच्या निर्णयावर काही तक्रार असू नये. मनुष्यासाठी सर्वाधिक उत्तम व योग्य नीती हीच आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या नातवाच्या निधनावरसुद्धा आपली मुलगी फातिमा (रजि.) यांच्या घरी गेले होते. जाण्यासाठी निघण्यापूर्वी एक निरोप पाठविला होता, ‘‘ते अल्लाहचेच आहे जे त्याने परत घेतले आणि तेसुद्धा अल्लाहचेच आहे जे त्याने दिलेले आहे. म्हणून तुम्हाला धैर्य राखले पाहिजे आणि प्रतिदान (सदका) इच्छुक होणे आहे.’’

पुत्रीच्या आग्रहाखातर जेव्हा पैगंबर त्यांच्याकडे गेले आणि मुलाला त्यांच्या कडेवर देण्यात आले तेव्हा ते मूल मरणासन्न अवस्थेत होते. पैगंबरांचे डोळे पानावले गेले. माननीय साद (रजि.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर!हे काय आहे?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘ही कृपाशीलता आहे, ज्यास अल्लाहने आपल्या दासांच्या मनात ठेवली आहे. म्हणून अल्लाह त्याच्या त्याच दासांवर कृपावर्षाव करतो ज्यांच्या मनात दयाभाव असतो.’’

(हदीस : बुखारी, मुस्लिम) अर्थात, हा दयाभाव आहे जो प्रशंसनीय आहे, अप्रशंसनीय नाही. अशा स्थितीत जे अवैध आहे ते म्हणजे कपडे फाडणे, मातम करून रडणे इ. दु:खाचा मनुष्यावर जो स्वाभाविक परिणाम होतो त्यास तुच्छ समजणे संकुचित दृष्टिकोन आहे आणि धर्माच्या मूळ स्वभावाशी अनभिज्ञ होण्याव्यतिरिक्त आणखीन काहीही नाही.

संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *