Home A आधारस्तंभ A रोजा- ईशपरायणता द्योतक

रोजा- ईशपरायणता द्योतक

रोजा हे अनेक कारणामुळे इस्लामच्या खऱ्या स्वरुपाचे द्योतक आहे. कुरआनने धर्माची स्पष्ट केलेली कल्पना ही रोजा मध्ये सर्वांगांने स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणींच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देते. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात. याबद्दलचे स्पष्टीकरण खालील प्रेषितकथनाने अधिक स्पष्ट होते.
‘‘जी व्यक्ती आयुष्यभर रोजे ठेवते अशा व्यक्तीचे रोजे निरर्थक आहेत.’’ (बुखारी)
‘‘तुम्हाला दोन किवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे सततचे रोजे ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’’ (मुस्लिम)
एकदा प्रवासात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी लोकांची गर्दी एका व्यक्तीभोवती पाहिली. विचारपूस केल्यानंतर कळले की तो प्रवासी रोजादार आहे. प्रेषित म्हणाले, ‘‘प्रवासात रोजा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना अपरिमित कष्ट झेलावे लागतात.’’ (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा सोबती (र.) जो मदिनाबाहेर राहत होता तो एकदा त्यांच्याजवळ आला आणि भेट झाल्यानंतर निघून गेला. एक वर्षानंतर तो पुन्हा आला या वेळी तो फार दुबळा झाला होता. तो ओळखूसुध्दा आला नाही. प्रेषितांनी त्याला विचारले, ‘‘काय झाले आहे, मागील वर्षी तू चांगला सदृढ होता.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘मी वर्षभर दिवसातून एकदाच जेवण घेत असे (रोजा ठेवत असे).’’ हे ऐकल्यानंतर प्रेषित म्हणाले, ‘‘तू स्वतः ला का कष्ट दिले?’’ (अबू दाऊद)
आपण वरील प्रेषितकथनांचा विचार केला तर हे सिध्द होते की रोजामुळे ईशपरायणतेचा क्रांतीकारक अर्थ निघत आहे. ईशपरायणता रोजाचा मूळ हेतु आहे. रोजामध्ये ‘स्व’चा नाश होत नाही. तर ‘स्व’वर नियंत्रण राहते. दुसऱ्या शब्दांत ईशपरायणतेबरोबर त्याची मौलिकता आणि महत्त्वसुध्दा रोजादार जाणून घेतो. समजून उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच ‘स्व’च्या मागणीला रोखून धरणे म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येते. ती ‘स्व’च्या मागणीचा अतिरेकसुध्दा होऊ देत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.’’ (कुरआन ७९: ४१)
ईशपरायणता मनाला स्वैर सोडून कधीच प्राप्त होत नाही. रोजा दिव्य अवतरणानुसार त्या ‘स्व’वर नियंत्रण ठेवतो व त्याला सैरावैरा पळू देत नाही. याचा अर्थ ‘स्व’ला मारून टाकणे असा मुळीच नाही. दुसऱ्या धर्मात ‘स्व’ला अतिकष्ट देऊन आणि मनोकामनांचे दमन करून नष्ट करणे अतिउच्च दर्जाचे पुण्य समजले जाते. इस्लामला हा अतिरेक मुळीच मान्य नाही. इस्लामनुसार हे पुण्य नाही तर पाप आणि अत्याचार आहे. रोजा तुम्हाला या सत्यतेची आठवण नेहमी करून देतो. काही संबंधित प्रेषितकथने आपण येथे पाहू या.
1. ‘‘पहाटे सहेरी (जेवण) करा रोजा सुरू करण्यापूर्वी हे एक लाभकारक कृत्य आहे. – मुस्लिम
2. लोक रोजा सोडण्यासाठी वेळेत घाई करतील तेवढे त्यांना पुण्य लाभेल.’’ – मुस्लिम
3. ‘‘लोक जोपर्यंत रोजा सोडण्यात वेळेवर घाई करत राहतील तोपर्यंत हा धर्म वर्चस्व स्थापित करून राहील.’’ – अबू दाऊद
4. ‘‘अल्लाह स्पष्ट करतो की माझा प्रिय दास तो आहे जो वेळेत रोजा सोडण्यासाठी घाई करतो.’’ -तिरमिजी
अशा प्रकारे वरील प्रेषितकथनानुसार रोजाचे महत्त्व स्पष्ट होते. ईशपरायणता म्हणजे ‘स्व’चे दमन अथवा नाश नव्हे तर स्वयंनियंत्रण होय. हे स्वयंनियंत्रण दृष्टिकोनाची शिस्तबध्दता आणि आवडीनिवडीची शिस्तबध्दता दर्शविते. ‘स्व’ला दिव्यप्रकटन अथवा ईश्वरेच्छेला प्रत्यक्ष व्यवहारात कार्यान्वित करणे. असे करताना स्वतःच्या आवडीनिवडींना, इच्छांना कुठेही थारा न देणे ईशपरायणतेला अपेक्षित आहे. अल्लाहची प्रसन्नताप्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणे पुरेशे नाहीत तर त्याबरोबर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वतःच्या इच्छेनुसार न वागणे आवश्यक आहे. अल्लाहची उपासना- इबादत करणे म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकथित ईश्वरांना नाकारणे आणि अल्लाहचे एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणे या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणे आणि ईशपरायण जीवन जगणे म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताची आज्ञाधारकता स्वीकारणे होय. ज्यांना न करण्याचा आदेश दिला आहे त्यांना नाकारणे आणि ज्यांच्यासाठी परवानगी दिली आहे त्या गोष्टी आचरणात आणणे हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करुन देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वतःची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन कंठत राहणे ईशपरायणता आहे.
रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृध्दिगंत करणे आहे. एकीकडे रोजा ठेवण्याच्या व्यक्तीला पहाटे जेवण सेहरी करण्याची कडक ताकीद दिली आहे. सेहरी न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करु शकत नाही, तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधीसुध्दा कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब याला श्रध्देत कमतरता म्हटले गेले आहे. ही दोन्ही कृत्ये ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. ‘स्व’वर नियंत्रण अशा कृत्यामुळे होते. यामुळे रोजाचा हेतूसुध्दा साध्य होण्यास मदतच होते. ही दोन्ही प्रकारची ताकीद स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा मार्ग बंद करते. स्वतःच्या इच्छेनुसार आवडीनुसार तर रोजाचे योग्यरित्या पालन होऊच शकत नाही. रोजा ठेवण्यासाठी ठरवून दिलेली वेळ न पाळता आपल्या मनाप्रमाणे करणे हे स्वार्थी वृत्तीचे लक्षण आहे. हे तर खरे धर्मात स्वतःची ढवळाढवळ करण्यासारखे आहे. असे जर असेल तर रोजामुळे स्वयंनियत्रंण होते हे म्हणणेच चुकीचे ठरते. मर्यादांचे उल्लंघन करणे याचसाठी निषिध्द आहे. या सर्व बाबींचा आपण विचार केला तर कळून येते की रोजाला इस्लामचा आधारस्तंभ का म्हणून संबोधले आहे आणि इस्लामची इमारत या अधारस्तंभाअभावी का म्हणून अपूर्ण राहते हेसुध्दा आपणास कळून येते.
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *