Home A hadees A रोजा आणि कुरआन ईमानधारकासाठी शिफारस आहे

रोजा आणि कुरआन ईमानधारकासाठी शिफारस आहे

अब्दुल्ला बिन उमर (रजि.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘रोजा आणि कुरआन ईमानधारकांसाठी शिफारस करतील. रोजा म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी या माणसाला दिवसा खाण्यापिण्यापासून व इतर लज्जतीपासून रोखले, तर याने स्वत:ला रोखून ठेवले. तर हे माझ्या पालनकर्त्या! या माणसाबाबत माझी शिफारस  कबूल कर, आणि कुरआन म्हणेल, ‘‘मी याला रात्री झोप घेण्यापासून रोखले (आपली साखरझोप सोडून नमाजमध्ये कुरआन पठण करीत राहिला) तेव्हा हे अल्लाह! या माणसांबाबत  माझी शिफारस कबूल कर. सर्वश्रेष्ठ अल्लाह दोघांची शिफारस कबूल करेल.’’ (हदीस- बैहकी, मिश्कात)

रोजा : नरकाग्नीपासून बचाव करीता ढाल आहे माननीय जाबीर (रजि.) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांना कआब बिन उज़जा (रजि.) शी संबंधीत होऊन सांगताना ऐकले  की, ‘‘हे कआब बिन उज़जा! ‘नमाज’ ईश्वराशी जवळीकता साधण्याचे माध्यम आहे. तसेच रोजा नरकाग्नीपासून बचावाकरीता ढाल आहे. त्याचप्रमाणे सदका (दान) पापांना असे नष्ट  करतो जसे पाणी अग्नीस विझवतो.’’ हे कआब बिन उज़जा! माणसे दोन प्रकारची असतात. प्रथम प्रकारची माणसे, स्वत:ला या ऐहिक जीवनाच्या अती किरकोळ वस्तुंच्या मोबदल्यात  विकतात. आणि स्वत:ला संकटाच्या स्वाधीन करतात. दुसऱ्या प्रकारची माणसे स्वत:स खरेदी करतात आणि नरकाग्नीपासून स्वत:ची सुटका करतात. (तरहीब व तरगीब)

भावार्थ
अर्थात जगामध्ये दोन प्रकारची माणसे असतात. एक वर्ग, ऐहिक जीवनाच्या भोग-वस्तुंचे पूजारी असतात व हीच माणसे ईश्वरीय कोपास बळी पडतात. दुसऱ्या प्रकारची माणसे ऐहिक  भोगवस्तुपासून स्वत:चा बचाव करतात आणि ईश्वराचे दास्यत्व आणि उपासनेत जीवन व्यतीत करतात. निश्चितच असे लोक नरकाग्नीपासून मुक्त होतील.

रोजाचे महत्त्व
माननीय अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘जो माणूस रमजान महिन्याच्या एक सुद्धा रोजा, कोणत्याही धर्म-संमत कारणाशिवाय (शरअी कारणाशिवाय) सोडून देईल, त्या रोजाची भरपाई, रमजान व्यतिरिक्त काळात आजीवन धरलेल्या रोजामुळे पूर्ण होणार नाही.’’ (हदीस – तिर्मिजी व अबू दाऊद)

भावार्थ
रमजानचे रोजे हे प्रत्येक श्रद्धावंतासाठी फर्ज (अनिवार्य) आहेत. रोजा सोडण्यापासून ज्या कारणांची शरिअतने परवानगी दिली आहे, त्या शरअी कारणाव्यतिरिक्त एखाद्याने, रमजानचा  एक रोजा सुद्धा सोडून दिला तर हा त्याचा अपराध मानला जाईल. त्या व्यक्तीने रमजान व्यतिरिक्त इतर महिन्यात आजीव रोजे धरले तरी, त्या एका अनिवार्य (फर्ज) रोज्याची  भरपाई होणार नाही. म्हणून श्रद्धावंतांनी रमजानचे रोजे, कुठल्याही प्रकारे, नित्यनेमाने हे केलेच पाहिजे.

रोजा : शरीराची जकात
माननीय अबु हुरैरा (रजी.) म्हणतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘प्रत्येक क्लेश दूर करणारी वस्तू ईश्वराने निर्माण केली आहे आणि शरीरास (रोगांपासून)  मुक्त करणारी अथवा पवित्र करणारी वस्तू रोजा आहे आणि रोजा निम्मे सब्र (संयम) आहे.

भावार्थ

आधुनिक संशोधनानुसार संपूर्ण मुस्लिम आणि मुस्लिमेतर डॉक्टर्स यावर सहमत आहेत की, ‘रोजा’मुळे बऱ्याच जीवघेण्या रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच रोजा, निम्मे संयम असण्याचा  अर्थ म्ह़यणजे, ‘रोजा’ इतर उपसना (इबादत) पेक्षा जास्त शुद्ध आणि प्रामाणिक आहे. त्यामध्ये दांभिकतेचा किंचितसा संशयसुद्धा नसतो. म्हणून मानवीय अभिलाषा व भौतीक सुख  उपभोगण्याच्या इच्छाआकांक्षावर ताबा मिळविण्याची शक्ती मिळते. ही शक्ती इतर संपूर्ण इबादत (उपासना) पासून मिळणाऱ्या क्षमतेच्या निम्मी असते.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *