Home A ramazan A रमजान पर्व आनंदात सर्व

रमजान पर्व आनंदात सर्व

– बशीर शेख
9923715373

रमजान दु:ख हरण करणारा (गमगुसारी) महिना आहे. या महिन्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आणि जगाला एक अशा जीवन व्यवस्थेची ईश्वरीय देणगी मिळाली की त्यानुसार चालणारा प्रत्येक व्यक्ती आनंदात राहू शकतो. त्याचे सर्व दु:ख हरण होऊन जातात. कुरआनचे आदेश सर्वांसाठी आहेत. त्यामुळे ते कोण्या एका जाती आणि समुहापुरते मर्यादित नाहीत. रमजानमध्ये कुरआन अवतरित झाल्यामुळे या महिन्याला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात, हज या पाच  इस्लामच्या मुलभूत तत्वांपैकी रोजा एक आहे.  रोजाचा मूळ उद्देश चारित्र्यनिर्मिती हा आहे. अल्लाहचे भय मनात वाढावे यासाठी रोजा ठेवला जातो. कारण अल्लाहचे भय असल्याखेरीज चांगले चरित्र असलेली माणसे निर्माणच होऊ शकत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे.
    या महिन्यात नमाज, रोजा, जकात, सदका, फित्रा व ऐच्छिक दान याला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे ऐपतदारच नव्हे साधारण आर्थिक स्थिती असलेले मुस्लिम सुद्धा या महिन्यात दानशूर बनतात. ते आपल्या मेहनतीच्या हलाल कमाईचे शुद्धीकरण करून घेतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात जकात अदा केली जाते आणि जकात दिल्याने देणार्याच्या संपत्तीचे शुध्दीकरण तर होतेच उलट त्यात वृद्धीसुद्धा होते. रमजानमध्ये केल्या जाणार्या जकात, सदका, फित्रा, खैरात इत्यादी मार्गाने केलेल्या अर्थत्यागातून प्रत्येकाला आत्मीक आनंद मिळतो. घेणार्याचीही आर्थिक चणचण दूर होते  आणि त्याला जीवन जगणे काही प्रमाणात सुसह्य होते.  यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावा करण्यासही बंद घातलेली असल्यामुळे प्रत्येक देणारा व्यक्ती हा काळजी घेतो की त्याची प्रसिद्धी होणार नाही. आणि ज्याला आपण दान देत आहोत त्यालाही अपमानित झाल्यासारखे वाटणार नाही.   दान देणार्या व्यक्तीबाबत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, जो कोणी या महिन्यात एक रूपयाही कुण्या गरजवंतांना दान करील त्याला त्याचा 70 पट मोबदला अल्लाह देईल. जकात काढणे अनिवार्य असल्यामुळे ती योग्य लोकांत देण्याची जबाबदारीही त्याच व्यक्तीवर आहे.
    सुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केलेले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी – यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी – साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    सदका (दान) : सदका देणे ऐच्छिक आहे. सदका देताना सांगितले आहे की, तो कुठलाही गाजावाजा न करता फार नम्रतेने द्यावा. ’सदका तुम्हारी जान व माल की हिफाजत करता है, अल्लाह गजब को ठंडा करता है’ असेही हदीसमध्ये नमूद आहे. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचाराने थरकांप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे’ (कुरआन : अलमोमिनून- 60).
    खैरात (दान) : फकीर/भिकार्याला स्वेच्छेन दान देणे म्हणजे खैरात. याबद्दल असे म्हटलेले आहे की, फकीर आणि गरजवंतांसोबत नरमाईचा व्यवहार करा. त्यांच्याशी तुसडेपणाने वागू नका, त्यांना रूबाब दाखवू नका आणि आपले श्रेष्ठत्व त्यांच्यासमोर जाहीर करू नका. मागणार्याला देण्यासाठी तुमच्याकडे काही नसले आणि तो मागतच असेल तरी तुम्ही त्याला नरमाईने सांगा त्याची नम्रपणे क्षमा मागा, त्यामुळे त्याला काही दिले नाही तरी तो शांतपणे तुम्हाला दुआ देत जाईल. अल्लाहचा आदेश आहे, ” आणि मागणार्याला झिडकारू नका’. खैरात करणे पुण्याचे काम आहे.
    फित्रा : फित्रा देणे अनिवार्य केले गेले आहे. प्रत्येक श्रीमंत व्यक्तीवर त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावणे दोन किलो गहू किंवा तत्सम रक्कम गरजवंतांना दिली गेली पाहिजे. ईदच्या नमाज अगोदर त्यांना फित्रा देणे बंधनकारक केले गेले आहे. म्हणजे महिनाभर दान, पुण्य तर कराच करा उलट ईदचा आनंद साजरा करतानासुद्धा गरीबांकडे अगोदर लक्ष द्या, अशी नितांत सुंदर शिकवण इस्लामणे आपल्या अनुयायांना दिलेली आहे.
    एकंदर या रमजानच्या महिन्यात गरीबांना दिलासा तर देणार्याला अत्युच्च आत्मिक आनंद मिळतोच मिळतो, शिवाय त्याला याचा ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही फायदा मिळतो. याबद्दल अल्लाहने मोबदला देण्याचा वादाही कुरआनमध्ये केला आहे.

संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *