स्पष्टीकरण
ज्या व्यक्तीला अल्लाह फक्त मुलीच देतो, तेदेखील अल्लाहकडून बक्षीसच असते आणि अल्लाह पाहू इच्छितो की आई-वडील त्या मुलींशी कसा व्यवहार करतात, ज्या त्यांना कमवून देणार नाहीत की सेवेसाठी त्यांच्याबरोबर कायमचे राहणारही नाहीत. तरीही त्यांच्याशी चांगली वर्तणूक करण्यात आली तर त्या मुली आपल्या आईवडिलांच्या पुरस्काराचे सबब बनतील.
माननीय नुअमान बिन बशी यांच्या कथनानुसार, ते म्हणाले की माझे वडील (बशीर) मला घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! एक गुलाम माझ्याकडे होता. मी या मुलाला दिला.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही आपल्या सर्व मुलांना गुलाम दिला आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तो गुलाम परत
घ्या.’’
दुसऱ्या एका कथनानुसार, ‘‘तुम्ही आपल्या सर्व मुलांशी असाच व्यवहार केला आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या मुलाबाळांमध्ये समसमान व्यवहार करा.’’ तेव्हा माझे वडील घरी आले आणि त्यांनी तो गुलाम परत घेतला.
आणखी एका कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘सर्व मुलांनी तुमच्याशी चांगली वर्तणूक करावी, ही गोष्ट तुम्हाला आवडेल काय?’’ माझे वडील म्हणाले, ‘‘होय.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग असे करू नका.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
मुलाबाळांशी समसमान वर्तणूक केली पाहिजे अन्यथा जोरजबरदस्ती व अन्याय होईल आणि जर असे केले गेले तर त्यांची हृदये आपसांत वितुष्टित होतील आणि ज्या मुलांना दिले गेले नाही त्याच्या हृदयात पित्याविरूद्ध द्वेष निर्माण होईल.
माननीय उम्मे सलमा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘अबू सलमाच्या मुलींवर खर्च करण्याचे मला पुण्य मिळेल काय? आणि मी त्या मुलांना अशाप्रकारे वंचित व उपेक्षितासारखे वन वन भटकण्यासाठी सोडू शकत नाही, कारण तीदेखील माझीच मुले आहेत?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय, जे काही तुम्ही त्यांच्यावर खर्च कराल त्याचा बदला तुम्हाला मिळेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
उम्मे सलमा (रजि.) यांच्या पहिल्या पतीचे नाव अबू सलमा (रजि.) आहे. त्यांच्या मृत्यूनंतर उम्मे सलमा (रजि.) यांचा विवाह पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी झाला होता. म्हणून अबू सलमा (रजि.) यांच्यापासून त्यांना जी मुले झाली होती त्यांच्या बाबतीत त्यांनी वरील प्रश्न विचारला.
0 Comments