कोल्हापूर (अशफाक पठाण)-
जमाअत ए इस्लामी हिंद, कोल्हापूर शाखेच्या वतीने दि. १३ रोजी ‘मानव सेवा : आपली जवाबदारी व कर्तव्य’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली. या कार्यक्रमला जमाअतचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मौलाना इलियास फलाही हे ओरंगाबाद येथून उपस्थित होते. त्याचबरोबर मजहर फारूक, सचिव जनसेवा विभाग, महाराष्ट्र, नदीम सिद्दिकी, अन्वर पठाण, इस्माईल शेख हे उपस्थित होते. कोल्हापूर-सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विभागातील घरांच्या पुनर्वसनकार्यात आयडीयल रिलीफ टीमतर्फे शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात रिलीफचे काम करण्यात आले. गावात धान्यावाटप, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली. त्यासोबत शाळेतील विध्याथ्र्यांना बॅग, वह्यांचे वाटप झाले. या सर्व कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला व शिरोळ तालुक्यातील मौजे कणवाड या गावात ४० घरांचे बांधकाम करण्यात येणार असून ग्रंथालयास पुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती जमाअतचे जनसेवा विभागाचे सचिव मझहर फारूक यांनी दिली.
मौलाना इलियास फलाही म्हणाले, मुस्लिम समुदायाची जबाबदारी कुरआनमध्ये स्पष्ट सांगण्यात आली आहे. त्यानुसार आज मुस्लिम समाज वागताना दिसत नाही, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नाही. त्यासाठी कुरआनशी चांगले संबंध निर्माण करणे, कुरआनच्या शिकवणी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. इस्लाम एकमेव असा धर्म आहे की ज्यात समाजसेवा किंवा मानवसेवा करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. माणसाच्या जास्तीतजास्त कामी यावे, तरच माणूस म्हणून आपण यशस्वी व्हाल, असे
त्यांनी सांगितले.
यानंतर जमाअतचे कोल्हापूर शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी पुढील महिन्यात प्रेषित जयंतीचे औचित्य साधून ‘प्रेषित मुहम्मद (स.) सर्वांनसाठी’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या अभियानात अंतर्गत मान्यवराच्या भेटी, व्याख्याने, पत्रकार परिषद असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशपाक पठाण यांनी केले. तर आभार नदीम सिद्दिकी यांनी मानले. या वेळी कोल्हापूर, मिरज व कराड येतील जमाअतचे सदस्य उपस्थित होते.
मानव सेवा हीच इस्लामची शिकवण : इलियास फलाहा
संबंधित पोस्ट
0 Comments