Home A hadees A भाग्यावर ईमान

भाग्यावर ईमान

माननीय अबू ख़िजामा (वडिलांकडून प्राप्त माहितीवरून) यांच्या कथनानुसार, ते म्हणाले, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘ही दुआ (प्रार्थना) ‘तअवीज्’ (ताईत) जे आम्ही  आजारपणाच्या बाबतीत करतो आणि ज्या औषधांचा आम्ही आपला आजार दूर करण्यासाठी वापरतो आणि दु:ख व संकटांपासून वाचण्यासाठी जे उपाय करतो, हे सर्व उपाय अल्लाहच्या  भाग्यापासून वाचवू शकतात काय?’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘या सर्व वस्तूदेखील अल्लाहच्या भाग्याचाच एक भाग आहेत.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण असे आहे की ज्या अल्लाहने हा आजार आमच्यासाठी लिहिला आहे त्याच अल्लाहने हेदेखील निश्चित केले आहे की अमुक औषधाने   आणि अमुक उपायाद्वारे हा आजार बरा होऊ शकतो. आजार निर्माण करणारा अल्लाहच आहे आणि तो बरा करणारे औषधाचा निर्मातादेखील. सर्वकाही त्याने  बनविलेल्या कायदेकानू- नुसारच आहेत.

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे स्वारीवर बसलो होतो. पैगंबर म्हणाले, ‘‘हे मुला, मी तुला काही सांगत आहे (ते  लक्षपूर्वक ऐक). पाहा, तू अल्लाहचे स्मरण कर अल्लाह तुझे स्मरण करील. तू अल्लाहचे स्मरण कर, अल्लाहला समोर पाहशील. जेव्हा मागशील तेव्हा अल्लाहकडे माग. जर तुला   एखाद्या संकटात मदत हवी असेल तर अल्लाहकडे माग. अल्लाहला तुझा मदत करणारा बनव आणि या गोष्टीवर विश्वास ठेव की अल्लाहने तुझ्याकरिता जे काही लिहून ठेवले आहे  त्याव्यतिरिक्त लोक एकत्र येऊन तुला एखादा लाभ पोहोचवू इच्छित असतील तरी ते तुला लाभ पोहचवू शकणार नाहीत. (म्हणजे कोणाकडे देण्याकरिता काहीही नसल्यामुळे तो देऊ  शकणार नाही, सर्व काही अल्लाहचे आहे. तो जे काही देण्याचा एखाद्याबाबत निर्णय घेतो तेवढेच मिळेल, मग ते कोणत्याही माध्यमातून मिळो.) आणि अल्लाहने तुझ्या भाग्यात जे  काही लिहिले आहे त्याव्यतिरिक्त जर लोकांनी एकत्र येऊन तुला एखादे नुकसान पोहचवू इच्छिले तरी ते कसलेही नुकसान पोहोचवू शकणार नाहीत. (तर मग अल्लाहलाच आपला  एकमेव आधार बनविले पाहिजे.) (हदीस : मिश्कात)

माननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्बल ‘मोमिन’ (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली ‘मोमिन’ उत्तम आणि अल्लाह अधिक   पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस  आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण  ‘ओठ’ (कस्रfचत) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात. (मिश्कात)

स्पष्टीकरण
या हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो  मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व  क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर ‘दीन’चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा  काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला  दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल ‘मोमिन’ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून  वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या ‘मोमिन’ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता  आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्षमतेला सहारा बनवत नाही  तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे
हे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *