माननीय अनस (रजि.) यांचे निवेदन आहे.
एकदा आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत होतो. त्या वेळी पाऊस पडू लागला. अनस (रजि.) यांचे कथन आहे की त्यावेळी पैगंबरांनी अंगावरील कापड काढले आणि ते पावसात भिजू लागले. आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आपण असे का केले?’’
पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘यामुळे की पावसाचे हे पाणी आताच त्याच्या रब (स्वामी) कडून आले आहे.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
‘‘आपल्या अंगावरील कापड काढले’’ म्हणजे डोक्यावरील किंवा पाठीवरील कापड काढले. या हदीसनुसार कळते की दासाला आपल्या प्रभुच्या कृपेविषयी अत्यंत संवेदनशील असले पाहिजे. आमच्यासाठी आवश्यक आहे की प्रभुची ताजी कृपा आमचे ईमान व जाणिवांना ताजेतवाणे करोत आणि आमच्याकडून अभिव्यक्ती व्हावी – प्रकट व्हावे की आम्ही ईशकृपेचे प्रत्याशी आहोत. आम्ही कधीही आणि कोणत्याच स्थितीत ईशकृपेची उपेक्षा करू शकत नाही.
पावसाचे पाणी ईशयोजनेनुसार पडत असते. या योजनेत दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ चालत नाही, अल्लाहशी याचा प्रत्यक्ष संबंध आहे. ते पावसाचे निरामय थेंब सर्वथा पवित्र असतात. कारण ईशद्रोही व अवज्ञाकारीचे हात तोपर्यंत त्याला स्पर्श करत नाहीत. म्हणून पावसाच्या या प्रथमसरी अत्यंत समृद्धशाली असतात. त्यांना आपल्या शरीरावर घेणे एक शुभेच्छा व शुभ मनोभाव व्यक्त करणे आहे.
0 Comments