माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,
‘‘अल्लाहच्या पैगंबरांचे चारित्र कुरआन होते.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) कुरआनला अभिप्रेत मणुष्याचे पूर्ण आदर्श होते. कुरआन शिकवणींनुसार ज्या उच्च दर्जाचा मनुष्य अपेक्षित आहे, त्यानुसार पैगंबर मुहम्मद (स.) पूर्ण आदर्श मानव होते. कुरआनमध्ये ज्या महान नैतिक शिकवणी आल्या आहेत त्या सर्वांना पैगंबरांच्या चरित्रात आणि व्यक्तिमत्त्वात तुम्ही पाहू शकता. पैगंबर मुहम्मद (स.) कुरआन शिकवणीचे एक जिवंत व पूर्ण आदर्श होते. कुरआनरूपात ईशआदेशच फक्त कयामतपर्यंत सुरक्षित करण्यात आले नाही तर यासोबत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवनसुद्धा कुरआनद्वारा कयामतपर्यंत सुरक्षित झाले आहे. पैगंबरांच्या पवित्र जीवनावरील सर्व ग्रंथ हरवले तरी तुम्ही त्यांचे पवित्र जीवनचरित्र व व्यक्तिमत्त्वाला कुरआनमध्ये पाहू शकता.
0 Comments