माननीय आएशा (रजि.) सांगतात,
‘‘मी कधी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना अशा प्रकारे हसताना पाहिले नाही की तोंड पूर्णत: उघडे आहे आणि आतील कंठी दिसू लागेल. पैगंबर केवळ स्मितहास्य करीत असत जेव्हा आकाशात ढग व सोसाट्याचा वारा पहात तेव्हा त्यांचा चेहरा बदलून जात ज्याला सहज समजले जात असे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा चेहरा भयभीत होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत असत. त्यांचे हृदय नेहमी ईशभययुक्त असे. आकाशात ढग आच्छादित होणे व सोसाट्याचा वारा वाहणे, यावर ते अधिक चिंतीत होत असत, कारण ढग व हवेच्या मागे एखादे वेळी ईशप्रकोपाची वीज तर दडलेली नसावी.
एका हदीसनुसार कळते की अशा परिस्थितीत त्यांची चिंता अधिक वाढत असे, ज्यामुळे ते घरात व घराबाहेर ये-जा करीत असत. त्यांची ही व्याकुळ स्थिती तेव्हाच संपत असे जेव्हा पाऊस पडणे सुरू होत असे.
माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबरांना त्यांच्या व्याकुळतेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे आएशा! कोणास ठाऊक, हे ढग तेच तर नाहीत ज्यांच्याविषयी आदच्या राष्ट्रातील लोकांनी सांगितले होते, ‘हे ढग आहेत, पाऊस पडेल.’ परंतु आद लोकसमुदाय भ्रमात राहिला होता. ईश्वराने त्या राष्ट्राला नष्ट करून त्वरित त्यांचा हा भ्रम दूर केला.’’
0 Comments