एखाद्या रोग्याने वैद्यकशास्त्राचा ग्रंथ घेतला व वाचत बसला आणि अशी कल्पना केली की केवळ या ग्रंथाचे वाचन केल्याने माझा रोग दूर होईल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्ही असे म्हणणार नाही का की पाठवा याला मनोरुग्णालयात! याचे डोके फिरले आहे. परंतु पूर्णत: रोगमुक्त करणाऱ्या अल्लाहने जो ग्रंथ तुमच्या रोगांच्या उपचारासाठी पाठविला आहे. त्याच्याशी तुमचा असाच व्यवहार आहे! तुम्ही याचे पठण करता आणि अशी कल्पना करता की केवळ याच्या पठणाने सर्व रोगराई दूर होईल? याच्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याची गरज नाही? आणि त्या गोष्टीचेही पथ्य पाळण्याची गरज नाही ज्यांना हा ग्रंथ अपमानकारक ठरवितो? मग जी गोष्ट तुम्ही त्या माणसाला लागू करता की जो केवळ वैद्यकीय ग्रंथाचे पठण रोग दूर करण्यासाठी पुरेसे मानतो तीच गोष्ट तुम्ही स्वत:वर का लागू करीत नाही?
एखादे पत्र अशा भाषेत आले की जी तुम्हाला येत नाही तर तुम्ही त्या भाषेच्या जाणकाराकडे पत्राचा मजवूâर समजून घेण्यासाठी धाव घेता. जोपर्यंत तुम्हाला पत्राचा मजवूâर काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्थ बसत नाही. ही तुमची अस्वस्थता ह्या साध्या व्यवहाराच्या पत्रातील मजकुराबद्दल आहे की ज्यात तुम्हाला चार पैशांचा लाभ होणार आहे. परंतु संपूर्ण जगाच्या पालनकर्त्या अल्लाहकडून जे पत्र तुमच्याकडे आले आहे आणि ज्यात तुमच्यासाठी या जगातील आणि पारलौकिक जीवनातीचे सर्व लाभ आहेत ते पत्र मात्र तुम्ही स्वत:जवळ तसेच ठेवून देता. त्याचा मजवूâर समजून घेण्यासाठी तुमच्या मनात कसलीही अस्वस्थता उत्पन्न होत नाही, काय ही कुतुहल व आश्चर्याची गोष्ट नव्हे?
0 Comments