या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात यहुदी (ज्यू) व इसाई (ख्रिश्चन) लोकांत ज्या वाईट समजुती व कुप्रथा पसरल्या होत्या त्यांचे वर्णन केल्यावर मिस्टर वास्वर्थ स्मिथ यांनी आपल्या पुस्तक ‘मुहम्मद अँड मुहम्मदइज्म’मध्ये लिहिले आहे –
“प्रेषित मुहम्मद (स.) अशासाठी आले की त्या सर्व खोट्या गोष्टी त्यांनी पुसून टाकाव्यात. मूर्ती काय आहे? निव्वळ जैतूनच्या (ऑलिव्हच्या) लाकडाचे तुकडे, जे ईश्वर असल्याचा दावा करतात, त्यांची वास्तविकता काय आहे? भ्रमजनक दार्शनिक विचार जणू कोळ्याने विणलेले जाळे व अधर्म, हे सर्वदूर करावे. अल्लाह सर्वात महान आहे आणि त्याच्याशिवाय कोणीही महान नाही. हाच आहे मुस्लिमांचा धर्म इस्लाम म्हणजे माणसाने अल्लाहच्या मर्जीवर विश्वास ठेवावा आणि असे करण्यात अत्यंत प्रसन्नता प्राप्त करावी. हीच मुस्लिमांची जीवनप्रणाली होय. एक टीकाकार असा प्रश्न करू शकतो की या दोन्ही सिद्धान्तामध्ये ज्यांचा उल्लेख वर केला आहे त्यात अशी कोणती गोष्ट आहे जिला असे म्हणावे की ती नवीन होती किंवा केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांनाच सुचली होती? नि:संशय कोणतीही नवीन गोष्ट नव्हती तर या गोष्टी तितक्याच पुरातन होत्या जितका पुरातन आदरणीय मूसा (अ.) यांचा काळ, इतकेच नव्हे तर या गोष्टी तितक्याच प्राचीन होत्या जितके खुद्द आदरणीय इब्राहीम (अ.) होते. प्रेषित महम्मद (स.) यांनी वारंवार अत्यंत गंभीरपणे सांगितले आहे की मी अरबांसाठी एखादी नवीन गोष्ट घेऊन आलेलो नाही, तर आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आलेलो आहे. हा धर्म सदैव येथे नांदत राहिला आहे. परंतु लोकांना याचा विसर पडलेला आहे अथवा याच्यापासून गाफील झालेले आहेत. जातीपासून वेगळे व शोकग्रस्त आणि अप्रसन्न. यहूदी लोक आपसात भांडणाऱ्या तीन ईश्वरांना मानणाऱ्या इसाई (ख्रिश्चन) आणि सर्व प्रकारच्या प्राणीपूजकांत एक उंट हाकणारा आला, अशसाठी नव्हे की त्याने त्यांना एखादी नवी गोष्ट शिकवावी तर ज्या जुन्या गोष्टी ते विसरून गेले आहेत, त्यांची आठवण त्यांना करून द्यावी. अरबस्थानच्या भूमीवर दोन हजार वर्षांपूर्वी एक अशा व्यक्तीला (आदरणीय मूसा (अ.)) जो जंगलात आपल्या वडिलांच्या (सासऱ्याच्या) शेळ्या चारीत होता, त्याला हा साधा परंतु चकित करणारा संदेश आला होता – ‘मी तो आहे जो मी आहे. ऐक, हे इस्राईल! आमचा स्वामी अल्लाह एक आहे. म्हणून जा! मी तुझ्या जिभेबरोबर असेन आणि तुला जे सांगावयास पाहिजे, ते तुला मी शिकवीन.’
हे शब्द ऐकूनही सन्मानप्राप्त जात (बनीइस्राईल) आफ्रिका सोडून आशियात गेली. गुलाम मुक्त झाले आणि एक वंश एक जात बनले. त्याच अरबस्थानच्या भूमीवर आता पुन्हा तो आवाज एका अन्य शेळ्या चारणाऱ्याला आला जो पहिल्या आवाजापेक्षा काही कमी विचित्र अथवा सामान्यपणे जगाला लाभ पोचविण्याच्या दृष्टीने त्यापेक्षा काही कमी नव्हता, म्हणजे “अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मर्रसूलुल्लाह’ हा संदेश देणाऱ्याचा स्वीकार केला व अल्लाहच्या संदेशाची घोषणा केली गेली आणि एका शतकात त्याचा आवा एडनपासून अन्ताकिया (आशियाई रोमन साम्राज्याचे केंद्र) पर्यंत व सेबील (स्पेनचा एक प्रांत व शहर) ते सरकंदपर्यंत पसरला आणि त्या सर्व देशांत त्याची सत्यता मान्य केली गेली.
-एजाजुत्तंजील, पृ. २८-२९
0 Comments