माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणीच सच्चा मुस्लिम असा नाही ज्याला मी या जगात व पारलौकिक जीवनात सर्वाधिक प्रिय नसेन. जर इच्छिता तर वाचा की पैगंबर ईमानधारकांसाठी त्यांच्या जिवांपेक्षासुद्धा अधिक निकट आहे.’’
….म्हणून ज्या ईमानधारकास मृत्यु येतो आणि तो संपत्ती मागे सोडतो तर त्याचे जिवंत नातेसंबंधी त्याचे वारसदार असतील आणि जो कोणी मागे कर्जाची रक्कम सोडून जाईल किंवा लहान मुलं मागे सोडले आणि ते माझ्याकडे आले तर मी त्यांच्यासाठी जबाबदार आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
म्हणजे त्याने त्याच्या मागे धनसंपत्ती सोडली असेल तर ती त्या मृताच्या वास्तविक वारसदारांना मिळेल. जर कोणी आपल्या मागे कर्ज आणि लहान मुलं सोडून जाईल तर अशा मृताचा स्वजन व आत्मिय स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) हे आहेत. त्याचे कर्ज फेडणे व त्याच्या लहान मुलांचे पालनपोषण करणे हे पैगंबरांचे दायित्व आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामी राज्याच्या अध्यक्षाच्या अधिकारात वरील विवेचन केले आहे. यावरून स्पष्ट कळून येते की शासनदायित्व अतिविस्तृत व महत्त्वपूर्ण असते. यावरून इस्लामी राज्याची मानसिकतासुद्धा कळून येते.
0 Comments