Home A hadees A ईमान (श्रद्धा) ची गोडी

ईमान (श्रद्धा) ची गोडी

ह. अब्बास (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘इमानाची (श्रद्धेची) गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून,  इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून आनंदित झाला.’’ (हदीस – बुखारी व मुस्लीम)

भावार्थ- सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञापालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्र-नियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित ह.  मुहम्मद (स.) याच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ठ आहे, त्याचा फैसला आहे की मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत  इस्लाम जीवनधर्मावर चालायचे आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही मानसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या माणसाची अशी व्यवस्था   होईल तेव्हा समजून घ्या की त्याने ईमानची गोडी चाखली. माननिय उमर (रजी.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘तुम्ही अल्लाहला, त्याच्या  फरिश्त्यांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, अल्लाहच्या प्रेषितांना आणि आखिरतला (मरणोत्तर जीवनाला) सत्य जाणा आणि सत्य माना आणि या गोष्टीस ही मान्य करा की, जगात जे  काही घडते, ते ईश्वरातर्फे घडत असते. मग ते चांगले असो की वाईट असो.’’ (हदीस – मुस्लिम)

भावार्थ- इमान (श्रद्धा) चा शाब्दिक अर्थ एखाद्यावर भरवसा करणे, मन:पुर्वक विश्वास राखणे आणि त्याचे म्हणणे खरे मानणे. ‘इमान’चा मूळ आत्मा हाच भरवसा व विश्वास आहे.   इमानचे वेगवेगळे संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण –
१) ‘ईमानबिल्लाह’ अर्थातच अल्लाहवर ईमान राखणे म्हणजे त्याला सृष्टीनिर्माता, रचनाकार व समस्त सृष्टीचा व्यवस्था राखणारा मानणे. मन:पुर्वक हे मान्य केले जावे की या सर्व  बाबीमध्ये अल्लाहचा कोणीही सहभागी नाही. आणि हे मानले जावे की सर्व प्रकारच्या व्यंगदोष, उणीवापासून अल्लाह मुक्त आहे, पवित्र आहे. तो सद्गुणांचा स्वामी आणि चांगुलपणाचा  मूल स्रोत आहे.
२) ‘प्रेषितांवर’ इमान राखणे म्हणजे, समस्त प्रेषितांना सच्चे, खरे मानणे. समस्त प्रेषितांनी किंचितही उणे अधीक न करता, ईश्वराचे आदेश व मार्गदर्शन लोकापर्यंत पोहोचविले. प्रेषित  शृंखलेची अंतीम कडी प्रेषित मुहम्मद (स.) होत. आता प्रलयकाळापर्यंतील मानवांना मुक्ती केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मार्गाचे अनुसरण केल्यानेच लाभेल.
३) फरिश्त्यांवर इमान राखणे म्हणजे त्यांचे अस्तित्व मान्य करणे, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत. सदा सर्वदा अल्लाहच्या उपासनेत व आज्ञापालनात ते मग्न असतात.
४) ग्रंथावर इमान राखणे म्हणजे अल्लाहने प्रेषितांद्वारे वेळोवेळी जे मार्गदर्शक ग्रंथ अवतरिले, त्या सर्व ग्रंथांना सत्य मानावे. त्या ईशग्रंथात अंतीम मार्गदर्शक ग्रंथ ‘पवित्र कुरआन’ आहे.  पूर्वीच्या जनसमुहांनी आपल्या काळातील ईशग्रंथामध्ये फेरबदल करून, त्याचे मूळ स्वरूप बिघडविले. अंतीम ग्रंथ कुरआन कसल्याही व्यंग-दोषापासून मुक्त आहे. तो सर्व प्रकारच्या   बिघाडापासून सुरक्षित आहे. या कुरआनाखेरीज जगात असा कोणताही ग्रंथ नाही. ज्याद्वारे ईश्वराप्रत पोहोचले जाऊ शकते.
५) आखीरतवर इमान म्हणजे, अंतीम न्यायनिवाड्यासंबंधी मान्य करणे. त्या दिवशी मानवाच्या संपूर्ण जीवनाचा हिशेब घेतला जाईल. ज्याचे आचरण ईश्वराच्या नजरेत पसंत ठरेल तो  बक्षिसपात्र ठरेल (जन्नतवासी), ज्याची कर्मे नापसंत तो शिक्षापात्र (नरकवासी) ठरेल. ही शिक्षा अमर्याद असेल आणि बक्षिसही अमर्याद असेल.
६) भाग्यावर इमान राखणे म्हणजे, जगात जे काही होत आहे ते ईश्वराच्या आदेशाने होत आहे. अल्लाहच्या कृतज्ञशील दासांवर जी आपत्ती कोसळते, ज्या अडचणींना त्यांना तोंड   द्यावे लागते, ही सर्व परिस्थिती अल्लाहच्या हुकुमौने आणि आधीपासूनच निर्धारित केलेल्या विधीनियमानुसार येत असते.

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *