Home A प्रवचने A आम्ही अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करतो

आम्ही अल्लाहप्रति कृतज्ञता व्यक्त करतो

सत्यधर्म अर्थात इस्लामचा सर्वांत महत्त्वाचा आधार एका अल्लाहवर श्रद्धा ठेवणे होय. व्यक्ती असो की समाज, प्रत्येकाची सुधारणा होण्यासाठी अल्लाहशी खरा गाढ संबंध ठेवणे अत्यावश्यक आहे. याशिवाय व्यक्तीचे सुधारणात्मक प्रशिक्षण मिळणे व त्याचप्रमाणे समाजाची न्यायसंगत आणि वास्तविक उन्नती  शक्यच नाही. अल्लाहवर श्रद्धा ठेवल्याशिवाय मानव आणि राष्ट्रांच्या परस्पर संबंधात सलोखा निर्माण होण्याची शक्यता नसते.

हे विश्व आणि समस्त मानवांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे. तोच सर्वांचा पालनकर्ता, रक्षक आणि भाग्यविधाता आहे. आपल्याकडे असलेली प्रत्येक प्रकारची शक्ती, सामर्थ्य आणि पात्रता हे सर्वकाही त्यानेच प्रदान केलेले आहे. त्यानेच आपल्याला अस्तित्व प्रदान केलेले आहे. त्यानेच आपल्याला विचारशक्ती आणि भावना प्रदान केल्या, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची पूर्तता केली. आपल्याला राहण्यासाठी पृथ्वी, श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी, अन्न जे आम्ही खातो, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि प्रकाश ज्याच्याशी जमिनीचे व मानवाच्या सर्व कर्मांचा संबंध आहे. मिळणाऱ्या त्या असंख्य सवलती, शक्ती, सामर्थ्य, विचारबुद्धी त्यानेच प्रदान केली. याच संशोधन आणि विचारशक्तीच्या जोरावर मानवाने वैज्ञानिक प्रगतीचा कळस गाठला आहे, चंद्रावर आणि ग्रहतारे तसेच अणुशक्ती व ऊर्जास्त्रोतांवर विकासाचा झेंडा रोवला आहे. समस्त भौतिक सुखसाधने अल्लाहनेच मानवास प्रदान केलेली आहेत. आपली पत्नी, मुले, आई-वडील, सासु-सासरे, नातलग, मित्रमंडळी, घरदार, व्यापार, उद्योग, संपत्ती वगैरे अल्लाहनेच प्रदान केलेले आहे. आपण अल्लाह कृपेवरच जगतो आहोत. त्याच्या अनुग्रहांची गणना करणेदेखील आपल्यासाठी अशक्य आहे. स्वत: अल्लाहने ही वस्तुस्थिती कुरआनात अशा शब्दांत मांडली आहे, 

“जर तुम्ही अल्लाहच्या देणगीची गणना करू पहाल तर करू शकणार नाही.” (दिव्य कुरआन , १४:३४)

अल्लाहच्या या महान आणि अमर्याद उपकारांची फेड आम्ही मुळीच करु शकत नाही आणि याकरिता त्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. म्हणूनच आपण तन-मन-धनासह त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे. आपले मन त्याच्याप्रति प्रेमाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने ओसंडून वाहवे, त्याच्या असीम उपकाराच्या जाणिवेने आपले मनमस्तिष्क त्याच्यासमोर वंदन करीत असावे. त्याचे नेहमी स्मरण करणारे आपले मुख आणि त्याचे महिमत्व व कृतज्ञतेने आपले जीवन त्याचे आज्ञापालक असावे आणि आपण त्याचे आज्ञाधारक व त्याच्या मर्जीवर प्राण देणारे सच्चे उपासक आणि आजीवन दास व्हावे.

`सूरह-ए-फातिहा’ ही कुरआनची प्रारंभीची सूरह असून संपूर्ण कुरआनच्या शिकवणीचा सार आणि आत्मा समजले जाते. म्हणूनच ही सूरह नमाजच्या प्रत्येक रकअतमध्ये पठण करणे अनिवार्य ठरविले आहे. `सूरह-ए-फातिहा’ची पहिली आयत `अल हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन’ (अर्थात : स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे, जो समस्त सृष्टींचा रब (पालनकर्ता) आहे.) अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) हेदेखील आपल्या प्रत्येक भाषणाची व प्रवचनाची सुरुवात याच आयतीने करीत असत, म्हणजेच सर्वप्रथम अल्लाहाचे स्तवन करीत असत. हा या गोष्टीचा पुरावा आहे की, इस्लामचा सर्वांत मौलिक आणि भक्कम आधार अल्लाहची मनोभावाने कृतज्ञता व्यक्त करणे आणि आभार मानणे हेच होय. इस्लामी समुदायावर जगाचे नेतृत्व करण्याची आणि सत्याची साक्ष देण्याची जबाबदारी आल्यावर सर्वप्रथम ही मूलभूत शिकवण अशा शब्दांत अल्लाहने दिली,

“तुम्ही माझे स्मरण ठेवा, मी तुमची आठवण ठेवीन आणि माझ्याशी कृतज्ञ राहा, कृतघ्न होऊ नका.” (दिव्य कुरआन , २:१५२)

साधारणत: माणूस हा सुख आणि भौतिक समाधानात तसेच चंगळवादात असल्यावर त्यास अल्लाहचा विसर पडतो. अहंकार आणि गर्वाच्या नशेत स्वत:च्या वास्तविकतेचा अर्थ हरवून बसतो. संपत्ती, सत्ता आणि सामथ्र्याच्या नशेत दीन-पददलितांवर अन्याय व अत्याचार करतो. इच्छा, आकांक्षा आणि स्वैर अभिलाषांच्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी निष्पाप मानवतेचा निर्घृण बळी देतो. तसेच लग्न समारंभ आणि आनंदाच्या प्रसंगी आपल्या प्रत्येक मित्र व नातलगास खूश करण्याचा आटापिटा करतो आणि अल्लाह व त्याच्या पैगंबर (स.) यांना हेतुपुरस्सर नाराज करतो. पैसा व्यर्थ खर्च करू नये, आपल्याकडे अल्लाहचाच ठेवा असलेल्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करू नये आणि अल्लाहच्या आज्ञेचा भंग करता कामा नये. संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी होणारी पैशांची उधळपट्टी करणे हे मुळात इस्लामी नियमाविरुद्ध आहे.

लग्न-समारंभाच्या प्रसंगी तर सैतान माणसाला तांडव करावयास लावतो आणि आपणही कोणताही सारासार विचार न करता पैशांची उधळपट्टी करीत असतो, हे मात्र इस्लामविरोधी कर्म होय, अपराध आणि गुन्हा होय. यामुळे आपण आपले जीवन आणि पारलौकिक जीवन आपल्याच हाताने उद्ध्वस्त करीत असतो.

असे का होत असते? कारण आपणास याप्रसंगी या गोष्टीचा पूर्णत: विसर पडलेला असतो की आपल्याला प्राप्त होणारा आनंद, सुख आणि यासारखा प्रत्येक अनुग्रह व यश हे केवळ अल्लाहकडूनच मिळत असते. आणि कधीही तो परत घेऊही शकतो. संतती आणि त्याचे सुखदेखील अल्लाहने दिल्यामुळेच आपल्याला मिळालेले असते आणि तो कधीही हे सुख आपल्याकडून हिरावून घेऊ शकतो. शिवाय एकवेळ तर अशी येईलच की समस्त सुख-समाधान एक-एक करून आपल्याकडून हिरावून घेण्यात येईल, म्हणूनच आपण ही सर्व सुखे पाहून आनंदाच्या भरात स्वत:ची वास्तविकता विसरून जाता कामा नये, विवेकशक्ती हरवून बसता कामा नये. आनंद आणि सुख प्रदान करणाऱ्या आपल्या असीम दयाळू आणि कृपाळू अल्लाहसमोर तन-मन-धनाने शरण जावे, त्याची कृतज्ञता व्यक्त करावी, त्याचे स्तवन करावे, त्याचे आभार मानावे; अर्थातच त्याच्या आदेशाची पायमल्ली न करता त्याने दिलेल्या सुख-समाधान आणि संपत्तीचा त्याच्याच मर्जीनुसार वापर करावा. जर आम्ही असे केले तर अल्लाहवर उपकार करीत नाही तर आपलेच भले करील. या वर्तमान जीवनातही आपले भले होईल आणि महत्त्वाचे म्हणजे परोक्षात त्याच्या असीम कृपाफळांचा भोग घेता येईल. नाहीतर आपल्याला या जीवनात आणि परोक्षातही अल्लाहच्या प्रकोपाच्या असह्य यातना सहन करण्याची नामुष्की पत्करावी लागेल, हे विसरता कामा नये. कुरआनात हीच बाब अशा शब्दांत अधोरेखित करण्यात आली आहे,

“ आणि स्मरण ठेवा, तुमच्या पालनकर्त्याने सावध केले होते की जर कृतज्ञ बनाल तर मी तुम्हाला आणखी जास्त उपकृत करीन आणि जर कृतघ्नता दर्शवाल तर माझी शिक्षा फारच कठोर आहे.” (दिव्य कुरआन , १४:७) 

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *