उमर (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“आचरण हेतूवर अवलंबून आहे आणि प्रत्येक माणसाला त्याच्या हेतूप्रमाणे फळ मिळेल. अल्लाह व त्याचे प्रेषित यांच्यासाठी माणसाने देशत्याग केला (हिजरत) तर ती त्यांच्यासाठी आहे आणि ऐहिक गरजेपोटी अगर एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करण्यासाठी त्याने देशत्याग केला (हिजरत) तर ज्या हेतूने त्याने तसे केले त्यासाठीच ते राहील.”
(सर्वसंमत) ‘हिजरत’चा अर्थ धर्मरक्षणासाठी स्थलांतर करणे. पूर्वी लोक मक्केहून मदीनेस प्रयाण करीत, त्याला ‘हिजरत’ म्हणत.
आचरणाचा अभिप्रेत अर्थ सदाचरण हा आहे. दुराचार कोणत्याही हेतूने केलेला असला तरी तो दुराचारच व ईश्वराजवळ त्याची काही किंमत नाही. सदाचारसुद्धा सद्हेतूने केलेला नसेल तर तोदेखील निरर्थकच व ईश्वराजवळ अशा आचरणाबद्दल काही फळ मिळत नाही.
नमाज अदा करणे हे चांगले आचरण. ईश्वराने नेमून दिलेले कर्तव्य म्हणून हे आचरण करीत राहिल्यास ईशदरबारी दासाची ही सेवा रुजू होऊन त्याला त्याचे फळ लाभेल. पण लोकांनी आपणास नमाजी म्हणावे, धार्मिक वृत्तीचा म्हणावे या हेतूने कोणी नमाज पढत असेल तर त्याची नमाज ईशदरबारी कवडीमोल आहे.
आचरण व त्यामागील हेतू यांचा विचार होऊनच अल्लाहच्या दरबारी त्यांचे चांगले वा वाईट फळ मिळते. अल्लाहच्या कृपेचा लाभ होण्यासाठी आचरणही चांगले हवे व त्यामागील हेतूही चांगला हवा.

0 Comments