Home A स्त्री आणि इस्लाम A आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

इस्लाम अल्लाह आणि पैगंबर यांच्यानंतर आईला सर्वोच्च दर्जा देतो. आई व वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्या आज्ञापालनाचा आदेश देतो. कुरआनोक्ती आहे,
“आणि ही वस्तुस्थिती आहे की, आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क ओळखण्याची स्वत: ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्याप्रती कृतज्ञता दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ राहा.”    (दिव्य कुरआन, 31 : 14)
अल्लाहचे आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.)1 यांनी वडिलांशीदेखील सद्व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे, परंतु आईशी सद्व्यवहार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे.
पैगंबरांचा आदेश आहे,
“मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या पित्याच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो.”     (हदीस : इब्ने माजा)
माननीय अबू हुरैरा (रजि.)2 यांचे कथन आहे की, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला व म्हणाला,
“”हे अल्लाहचे पैगंबर (स.)! माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे ?”
पैगंबर म्हणाले, “”तुझी आई!”
त्याने विचारले, “”त्यानंतर कोण ?”
पैगंबर म्हणाले, “”तुझी आई!”
त्याने पुन्हा विचारले, “”त्यानंतर कोण?”
पैगंबरांनी सांगितले, “”तुझी आई!”
त्याने विचारले, “”त्यानंतर कोण?”
मग पैगंबर म्हणाले, “”तुझे वडील!”    (हदीस : अल-अदबुल मुफद्न)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
“”आईची अवज्ञा करणे आणि मुलींना जिवंत दफन करणे हे अल्लाहने तुमच्यावर निषिध्द ठरविले आहे.”                                                   (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असेही फर्माविले आहे,
“”आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.”    (हदीस)
संबंधित पोस्ट
Febuary 2025 Sha'ban 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4
3 5
4 6
5 7
6 8
7 9
8 10
9 11
10 12
11 13
12 14
13 15
14 16
15 17
16 18
17 19
18 20
19 21
20 22
21 23
22 24
23 25
24 26
25 27
26 28
27 29
28 Ramadhan 1
1 2
2 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *