या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.
मिस्टर टॉम्स कार्यालय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर खोटे दोष लावणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेताना लिहितो –
“होय, असे कदापि नाही, हा तीक्ष्ण दृष्टीचा मनुष्य जो जंगली देशात जन्मला होता, जो मनमोहक काळे डोळे व प्रफुल्ल, शिष्टतापूर्ण व विचारशील स्वभावाबरोबर आपल्या मनात मान-सन्मानाच्या इच्छेविरुद्ध काही अन्य विचार बाळगत होता, तो एक शांतिमय आणि असामान्य शक्तिशाली आत्मा होता आणि त्या लोकांपैकी होता जे सत्यवान असण्याशिवाय अन्य काही असूच शकत नाहीत. ज्याला स्वत: निसर्गाने खरा व सत्यप्रिय म्हणून जन्मास घातले होते. या काळात अन्य लोक अंधविश्वास व संस्कारांचे पालन करीत होते आणि त्यावरच संतुष्ट होते. हा मनुष्य त्या विश्वास व संस्कारांचे पालन करू शकत नव्हता व आपला आत्मा व पदार्थांच्या तथ्यांच्या ज्ञानाविषयी तो अन्य लोकांपेक्षा भिन्न होता. जसे की मी वर्णन केले आहे की, सर्वशक्तिमानाचे रहस्य आपल्या प्रताप व सौंदर्यासह त्यावर प्रकट झाले होते आणि या तथ्यावर ज्याचे वर्णन करण्यास वाक्शक्ती असमर्थ आहे आणि ज्याने आपल्यासाठी ‘मी येथे आहे’ म्हणून प्रयोग केला. प्राचीन कथा त्यावर पडदा घालू शकल्या नाहीत
आणि असले सत्य ज्यास एखादे पर्यायी श्रेष्ठतर शब्द न मिळाल्यामुळे आम्ही ‘सत्य’ नाव ठेवले आहे, ते वास्तविकत: ईशचिन्हांपैकी एक चिन्ह आहे. अशा माणसाचे कथन एक वाणी आहे जी एखाद्या संबंधाविना थेट ईशप्रकृतीच्या हृदयातून निघते, जी मानव ऐकतात आणि जी ऐकण्यासाठी व वस्तूंच्या तुलनेसाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण याच्या तुलनेत जे काही आहे तुच्छ आहे. सुरवातीपासूनच त्याच्या हृदयात हजप्रसंगी व दररोज इकडे-तिकडे भ्रमण करताना त्यांच्या मनात विभिन्न प्रकारचे हजारो विचार येत असत. उदाहरणार्थ – “मी काय आहे? लोक ज्याला जग म्हणतात व ज्यात मी राहतो ही अथांग गोष्ट काय आहे? जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? मला कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे व काय केले पाहिजे?” ज्याचे उत्तर
(मक्काच्या) हिरा व (सीरियाच्या) सीना पर्वताच्या मोठमोठ्या दगडांच्या ढिगाऱ्यांची व निर्मम निर्जन वाळवंटाने व जंगलाने काहीही दिले नाही आणि डोक्यावर गुपचूप प्रदक्षिणा घालणाऱ्या आकाशानेसुद्धा आपल्या निळा प्रकाश देणाऱ्या नक्षत्रांसह काहीही सांगितले नाही. परंतु जरी कणी सांगितले असेल तर केवळ त्याच्याच आत्म्याने व ईश्वरी ज्ञानाने सांगितले जे त्याच्यात होते.”
– (एजाजुत्तंजील, पृ.१२५-१२६)
0 Comments