प्रश्न असा उत्पन्न होतो की, जर असे करायचे नसेल तर आपल्याला काय करावे लागेल? तुम्हाला जर हे कर्तव्य अनिवार्य आहे असे वाटत नसेल तर तुम्हाला ते अनिवार्य का वाटत नाही, यासंबंधीचा पुरावा द्यावा लागेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कर्तव्य अनिवार्य आहे तर मग तुम्हीच सांगा की, मुस्लिमांच्या एवढ्या संघटनांपैकी कोणती संघटना अशी आहे जी हे कर्तव्य पूर्ण करीत आहे? हे ही नाही तर मग तुमच्याकडे अशी अवस्था झाली आहे काय की, जे लोक या कर्तव्याला ओळखून ते पूर्ण करण्यासाठी उठले आहेत, त्यांनाच तुम्ही गुन्हेगार ठरवता.
जमाअते इस्लामीवर असाही आरोप केला जातो की, तुम्ही तुमच्या नेत्याला ’अमीर किंवा इमाम’ का म्हणता? त्यांच्या मते अमीर किंवा इमाम केवळ तीच व्यक्ती असते जी प्रत्येक बाबतीत स्वत:कडे अधिकार राखून असते आणि जिच्या हातात सत्तेची लगाम असते. ते आपल्या या म्हणण्याला पुष्टीदायक हदीससुद्धा सादर करतात. ज्यायोगे असे सिद्ध केले जाते की, इमामत (नायकत्व) केवळ तीन गोष्टींचेच असू शकते. 1. ज्ञानाची (इल्म) इमामत, 2. नमाजची इमामत, 3. जिहाद आणि युद्धाची इमामत. या शिवाय बाकी कुठल्याही प्रकारची इमामत इस्लामला मान्य नाही.
वास्तविक पाहता हा आक्षेप तेच लोक घेतात ज्यांना इस्लामी दंड शास्त्रातील त्या भागातील हदीस माहित आहेत ज्या भागात इस्लामी सत्ता प्राप्त केल्यानंतर व्यवस्था स्थापन केली जाते. मात्र त्यांना हे माहित नाही की जेव्हा सत्ता गेलेली असेल, मुस्लिम हे सत्तेपासून दूर असतील, इस्लामी व्यवस्था अस्तव्यस्त झालेली असेल, त्या परिस्थितीमध्ये काय आदेश आहेत?
मी त्यांना विचारतो की, अशा परिस्थितीत मुस्लिमांनी काय हेच काम करावे की, प्रत्येक माणसाने वेगवेगळे बसून फक्त प्रार्थना (दुआ) करावी की, ”हे अल्लाह! एखादा असा इमाम पाठव ज्याच्याकडे सर्वाधिकार असतील?” किंवा असे नेतृत्व कायम करण्यासाठी एखादी संघटना बांधून सामुहिक पद्धतीने प्रयत्न केले जावेत. जर त्यांना असं वाटत असेल की सामुहिक प्रयत्न करायला हवेत तर मेहरबानी करून त्यांनीच आम्हाला सांगावे की जमाअत बनविल्याशिवाय कोणते सामुहिक प्रयत्न केले जावू शकतात? जर त्यांना असे वाटते की, जमाअत बनविल्याशिवाय, दुसरा कुठलाच मार्ग नाही तर मग कुठलीही जमाअत विना नेत्याच्या, अध्यक्षाच्या किंवा आमीरच्या शिवायही चालू शकेल काय? जर आक्षेप घेणारे या गरजेचाही स्वीकार करतात तर त्यांनी स्वत:च आम्हाला सांगावे की, इस्लामी उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी संघटना तयार केली जाईल, त्याच्या अध्यक्षाला इस्लाममध्ये कुठल्या शब्दाने संबोधतात? ते जो शब्द सुचवतील आम्ही तो शब्द मान्य करू फक्त अट एकच आहे की, तो शब्द इस्लामी असायला हवा. किंवा त्यांनी स्पष्ट रूपात असं सांगावे की इस्लाममध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतरचेच आदेश उपलब्ध आहेत. आणि सत्तेपासून दूर झाल्यानंतरच्या स्थितीमध्ये सत्ता परत कशी मिळविता येईल. यासंबंधी अल्लाहने कुठलेच मार्गदर्शन केलेले नाही. हे काम ज्याला करावयाचे असेल त्यांनी ते बिगरइस्लामी पद्धतीने आणि बिगर इस्लामी नावाने करायला हवेत. जर या लोकांचा असा हेतू नाही तर मग आम्ही हे कोडे सोडविण्यामध्ये असमर्थ आहोत की, सदर, लिडर आणि काईद वगैरे शब्द उपयोगात आणले जावेत तर ते सर्व यांना स्वीकार आहे. परंतु, अमीर हा शब्द ऐकताच ते का चिडतात?
साधारणपणे लोकांना या प्रश्नाला समजण्यामध्ये तेंव्हा अडचण निर्माण होते जेव्हा पैगम्बर मुहम्मद सल्ल. च्या काळामध्ये अमीर किंवा इमाम हे शब्द वापरले गेले नव्हते. कारण त्या काळात इस्लामी सत्ता स्थापन झाली होती. ज्या काळात इस्लामी सत्ता कायम झाली नव्हती त्या काळी प्रेषित मुहम्मद सल्ल. पैगम्बरच्या नात्याने इस्लामच्या स्थापनेसाठीचे जे प्रयत्न होत होते त्याचे नेतृत्व आणि मार्गदर्शन ते स्वत: करीत होते. म्हणून त्या वेळेस आमीर किंवा इमाम हे शब्द वापरण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. मात्र संपूर्ण इस्लामी व्यवस्थेवर नजर टाकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होऊन जाते की, इस्लामी व्यवस्था ही मुस्लिमांच्या प्रत्येक सामुहिक कार्यामध्ये अनुशासन आणि संघशक्तीची मागणी करते. आणि इस्लामी व्यवस्था अनुशासन आणि संघशक्तीची खरी स्थिती हे निर्धारित करते की, संघटनेचे कार्य जमाअत तयार करून केले जावे. आणि जमाअतमध्ये जबाबदार व्यक्तीच्या आज्ञा ऐकणे आणि त्यानुसार कार्य करण्याची संवेदना जन्मजात असते आणि ही सुद्धा संवेदना जन्मजात असते की, तिचा एक आमीर ( अध्यक्ष) असावा. हज केला जावा तर सामुहिक केला जावा. म्हणून हजसाठी एक आमीर असावा. एवढेच नव्हे तर तीन माणसं जर प्रवास करत असतील तर त्यांनीही एक जमाअत म्हणून प्रवास करायला हवा आणि आपल्यामधून एकाची निवड अमीर म्हणून करायला हवी, असे निर्देश प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी देऊन ठेवलेले आहेत. इस्लामी शरियतची हीच आत्मा आहे की, जमाअतशिवाय इस्लाम नाही आणि अमारत (अध्यक्षता) शिवाय जमाअत नाही. आणि इताअत (आज्ञापालन) शिवाय जमाअत (अध्यक्षता) नाही. हे कथन हजरत उमर रजि. यांनी केले असल्याची इस्लामी इतिहासामध्ये नोंद आहे.
म्हणून आपण शेवटी ह्या निर्णयापर्यंत पोहोचतो की, दीनच्या स्थापनेसाठी आणि लोकांसमोर सत्याची साक्ष देण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील ते करण्यासाठी सर्वप्रथम जमाअत तयार केले जाईल आणि तिच्या अध्यक्षाच्या रूपात जी व्यक्ती असेल तिला अमीर किंवा इमाम या शब्दाने संबोधले जाईल, हेच योग्य आहे. इमाम या शब्दाला दूसराही एक विशेष अर्थ जोडला गेलेला आहे म्हणून आम्ही टिकेपासून वाचण्यासाठी इमाम शब्द न वापरता आमच्या जमाअतच्या अध्यक्षासाठी आमीर या शब्दाचा उपयोग केलेला आहे.
(सदरील लेखमाला, शहादते हक या पुस्तकातील असून, मौलाना अबुल आला मौदूदी याचे लेखक आहेत.)

0 Comments