Home A इस्लामी व्यवस्था A अपराध निर्मूलनाचे काही तात्काळ उपाय

अपराध निर्मूलनाचे काही तात्काळ उपाय

इस्लामी शिकवणींच्या आधारे माणसाने स्वतः प्रेरित होऊन अपराधी कर्मांपासून दूर राहण्यासाठी होय. आपण अशा उपायांसंबंधी चर्चा करू या, जे इतरांतर्फे होणार्या संभावित गुन्हेगारींचे निर्मूलन करतात. निश्चितच माणूस हा स्वतःही अपराध करतो आणि इतरांकडून होणार्या गुन्हेगारींचेही भोग भोगतो. या दोन्ही स्वरुपांच्या समस्यांचे समाधान झाले तरच खर्या अर्थाने गुन्हेगारीचे पूर्णतः निर्मूलन शक्य आहे. म्हणजेच माणसाने स्वतःही अपराध करू नये आणि इतरांनाही अशी संधी उपलब्ध होऊ देऊ नये. या ठिकाणी प्रत्यक्ष इस्लामी कायद्याने दिलेल्या गुन्हेगारी निर्मूलनाचे उपाय आपण पाहणार आहोत.
आक्रमक हल्ल्यापासून बचावाचे उपाय
जणू हा काळच आक्रमक हल्ले आणि रक्तपाताचा दिसतो. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रश्न असा आहे की एखादा गुन्हेगार हा अतिरेकी पद्धतीचा अवलंब का करतो? इतरांच्या रक्ताची आणि प्राणाची त्याच्याकडे काहीच किंमत नसावी काय? याचे एक मूळ कारण द्वेष, वैरभाव, क्रोधाग्नी, ईर्ष्यालूवृत्ती व मत्सर असल्याचे दिसते. या अतिरेकी भावनांचे मूळ विभिन्न प्रकारच्या सामाजिक आणि मानसिक समस्यांत दडलेले आहे. याच समस्यांतून या भावना जन्मास येतात. म्हणूनच इस्लामने अशी प्रेरणाद दिली आहे की, माणसाने स्वतःहून अशा अपराधी कर्मांपासून दूर राहावे. त्याचप्रमाणे क्रोध, क्षोभ, हेवा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैरभावासारख्या भावना इतरांतही निर्माण करणारी परिस्थिती उद्भवू न देण्याचे उपायसुद्धा योजले आहेत.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की, ‘‘तुम्ही श्रद्धावंत(अर्थात सच्चे मुस्लिम) होऊ शकत नाहीत, जोपर्यंत(मानवजातीप्रति) प्रेम आणि स्नेहाची भावना ठेवत नाहीत. तुम्हाला असा उपाय दाखवू का, ज्यामुळे आपसात प्रेम व स्नेहाची भावना निर्माण होईल?‘‘
‘‘होय! अवश्य दाखवा!‘‘ अनुयायांनी म्हटले.
‘‘तर तुम्ही आपसात एक दुसर्यांना ‘सलाम‘(शुभ चिंतनाची प्रार्थना) करा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
सलाम करणे म्हणजे आपल्या मानवबंधुविषयी ईश्वरदरबारी शांती व सुरक्षेची प्रार्थना करणे होय. त्याचप्रमाणे याचा अर्थ असाही होतो की ज्याला तुम्ही सलाम करता, त्याच्याविषयी तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा वैरभाव नसल्याचे जणू प्रमाणपत्रच आहे. म्हणजेच दोघेही एकमेकांचे हितचिंतक आहेत. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सलाम करण्याबरोबरच एकदुसर्यांना भोजन देण्याची, भेटवस्तु देण्याचीसुद्धा शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा माणसातील स्नेहसंबंध वाढीस लागतात, मनातील मळ नाहीसा होतो. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका प्रत्येकाकडून होतच असतात. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी आपल्या मानवबंधुच्या चुका माफ करून उदारपूर्ण वर्तन करण्याचीही शिकवण दिली आहे. यामुळेसुद्धा द्वेश, मत्सर, हेवा आणि वैरभावाने प्रदूषित झालले वातावरण निवळते.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी, मौत्ता)
कधीकधी माणूस अशी चूक करून बसतो की ती सहसा कोणी माफ करायला तयार होत नाही. म्हणूनच इस्लामने माणसाला संयम आणि धीर राखण्याची शिकवण दिली. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयमाबरोबरच न्यायपूर्ण वर्तनाचीसुद्धा शिकवण दिली. त्यांनी म्हटले की,
‘‘तुम्ही एखाद्यावर प्रेम करताना इतकेही भावूक होता कामा नये की सत्य आणि न्यायाचे भान हरवून बसावे. त्याचप्रमाणे तुमचा क्रोध इतका अविवेकी असू नये की तुम्ही एखाद्यास त्याच्या अपराधापेक्षाही जास्त शिक्षा द्यावी.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – बुखारी)
अर्थातच या दोन ओळींमध्ये प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संयम आणि धैर्याची परिपूर्ण व्याख्या मानवजगतासमोर मांडली.
अतिरेकी भावनांचे एक मोठे कारण शोषण आणि मानवाधिकारांची पायमल्ली आहे. म्हणूनच मामसाला असे वाटत असेल की आपणाला इतरांपासून त्रास होऊ नये, इतरांच्या अतिरेकास आपण बळी पडू नये तर यासाठी त्याने इतरांचे वैध अधिकार देऊन टाकावे. इतरांचे अधिकार पूर्ण करणे म्हणजे काही इतरांवर उपकार करणे नव्हे. ते सानंद पूर्ण करावेत आणि इतरांचे शोषण करू नये. म्हणजेच आपण इतरांकडून सुरक्षित राहू शकतो.
संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *