माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा दुराचाऱ्याची स्तुती केली जाते तेव्हा अल्लाह रागावतो आणि त्यामुळे सिंहासन हलू लागते.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : असे यासाठी की जो मनुष्य अल्लाहच्या आदेशांचा आदर करीत नाही आणि त्याच्या आदेशांना उघडपणे नाकारतो तेव्हा तो अब्रू व प्रतिष्ठेस पात्र राहात नाही. त्याच्याकडे घृणेनेच पाहिले जावे हाच त्याचा अधिकार आहे. आता जर मुस्लिम समाजात त्याला प्रतिष्ठा प्राप्त असेल तर याचा अर्थ हा आहे की लोकांमध्ये आपल्या ‘दीन’ (जीवनधर्म), अल्लाह व पैगंबरांवर प्रेम बाकी राहिलेले नाही अथवा असेल तर फारच क्षुल्लक प्रमाणात आहे. अशा स्थितीत अल्लाहला राग येणारच, हे उघड आहे. त्याची कृपा त्या जनसमुदायावर कशी होऊ शकेल.
माननीय अबू बकरा (रजि.) यांच्या कथनानुसार, ते म्हणतात, एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपस्थितीत स्तुती केली, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तू आपल्या बंधुची मान कापली याचा मला खेद वाटतो. (हे वाक्य पैगंबरांनी तीन वेळा म्हटले.) तुमच्यापैकी जो मनुष्या एखाद्याची स्तुती करीत असेल आणि असे करणे आवश्यक असेल तर अशाप्रकारे म्हणावे, ‘मला अमुक मनुष्याच्या बाबतीत असे वाटते आणि अल्लाहला हे माहीत आहे.’ या अटीवर की वास्तवात त्याला तसे वाटत असावे की तो मनुष्य अशाप्रकारचा आहे आणि एखाद्या मनुष्याची स्तुती अल्लाहच्या तुलनेत करू नका.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सभेत एक मनुष्याचा संयम व त्याच्या चांगल्या स्थितीची स्तुती करण्यात आली होती. अशा परिस्थितीत मनुष्य धोक्यात पडण्याची भीती होती, त्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मनाई केली आणि म्हटले, ‘‘तू आपल्या बंधुचा गळा कापला.’’ मग पैगंबरांनी उपदेश दिला की जर एखाद्या मनुष्याच्या बाबतीत काही सांगणे भागच असेल तर अशाप्रकारे म्हणा, ‘‘मी अमुक मनुष्याला सदाचारी समजतो’’ आणि असे म्हणू नका की अमुक मनुष्य अल्लाहचा मित्र (वली) आहे अथवा अमुक व्यक्ती निश्चितच स्वर्गात जाणार आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करण्याचा कोणा अल्लाहच्या दासाला अधिकार नाही, कारण हे सांगणे कठीण आहे की ज्याला तो स्वर्गवासी म्हणत आहे तो अल्लाहच्या दृष्टीतदेखील स्वर्गवासी आहे किंवा नाही? पर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत तो ‘ईमान’च्या परीक्षास्थळात आहे. कधी मनुष्याचे मन बदलेल आणि तो सरळमार्ग सोडून दुसरीकडे जाईल हे सांगता येत नाही. म्हणून एखाद्या जिवंत सदाचारी मनुष्याच्या बाबतीत खात्रीपूर्वक एखादा दृढ निर्णय घेतला जाऊ नये आणि मृत्यूनंतरदेखील एखाद्याच्या बाबतीत ‘‘तो स्वर्गवासी आहे’’ असे म्हणू नये.
इस्लामी धर्मपंडितांच्या मते जर एखाद्या मनुष्याने बंडखोरी करण्याचे भय नसेल आणि सद्यस्थिती पाहता त्याच्यादेखत त्याचे ज्ञान व संयम वगैरेची स्तुती केली जाऊ शकते. परंतु असहाय व्यक्तीने यापासून अलिप्त राहिले पाहिजे, कारण बंडखोरी करणे अथवा न करण्याबाबतचा निर्णय अल्लाहच करू शकतो. कोणाच्या अंतर्गत स्थितीबाबत सर्वसाधारणपणे बरोबर अंदाज येऊ शकत नाही.
खोटी साक्ष
माननीय खरीम बिन फातिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सकाळच्या नमाजचे नेतृत्व केले आणि जेव्हा लोकांकडे वळले तेव्हा बसून राहण्याऐवजी पैगंबर सरळ उभे राहिले आणि तीन वेळा म्हणाले, ‘‘खोटी साक्ष देणे आणि अनेकेश्वरत्व अवलंबिणे दोन्ही सारखेच पाप आहे.’’ मग पैगंबरांनी पुढीलप्रमाणे उच्चार केला, ‘‘फज्तनिबुर्रिजसा आखीर तक.’’ (तुम्ही अपवित्रता म्हणजे मूर्तींपासून दूर राहा आणि खोटे बोलण्यापासून दूर राहा आणि अल्लाहकडे लक्ष वेंâद्रित करा, अनेकेश्वरत्व सोडून एकेश्वरत्वाचा अवलंब करा.) (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘सूरह हज’ची ज्या आयतीचे पठण केले त्यात ‘कौल़ज़्जूर’ हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ आहे खोटे म्हणणे आणि खोटे बोलणे प्रत्येक ठिकाणी वाईट आहे, मग ते न्यायालयात न्यायाधीशासमोर बोललेले असो की एखाद्या दुसऱ्या ठिकाणी.
पाहा, खोटी साक्ष किती मोठे पाप आहे, परंतु मुस्लिमांच्या दृष्टीत हे पाप आता पाप राहिले नसून ती एकप्रकारची ‘कला’ बनली आहे. आम्ही न्यायालयात आपल्या ‘ईमान’च्या दबावाखाली खरी साक्ष देण्याचे धाडस करतो, म्हणून आम्ही त्यांच्यादरम्यान मूर्ख समजले जात आहोत.
0 Comments