Home A Uncategorized A अद्वैतवाद

अद्वैतवाद

निरीक्षण आणि अनुमानाच्या मिश्रणाने निर्माण होणारे तिसरे मत म्हणजे, मानव आणि सृष्टीच्या सर्व वस्तू आपल्या जागी स्वत: अवास्तविक आहेत. त्यांचे कायमस्वरूपी असे कोणतेही अस्तित्व नाही. वास्तविकपणे एका अस्तित्वाने या सर्व वस्तूंना आपल्या स्वत:च्या प्रकटीकरणाचे माध्यम बनविले आहे व तेच अस्तित्व या सर्व वस्तूंमध्ये कार्यरत आहे. विवरणांत या दृष्टिकोनाची असंख्य रूपे आहेत. परंतु त्या सर्व विवरणांत हाच एक समान विचार आहे की, सृष्टीच्या सर्व वस्तू म्हणजे त्याच एका अस्तित्वाचे बाø प्रकटरूप आहे. वास्तविकपणे अस्तित्वात तोच एकटा आहे त्याशिवाय काहीच नाही.
या दृष्टिकोनाच्या आधारे मनुष्य जे वर्तन अंगिकारतो ते असे की, तो आपल्या स्वत:च्या अस्तित्वासंबंधी साशंक होतो, मग एखादे कार्य करणे तर वेगळेच. तो स्वत:ला हाताचे बाहुले समजतो, ज्याला अन्य एखादा नाचवीत आहे किंवा ज्यात अन्य एखादा नाचत आहे. तो आपल्या कल्पनेच्या नशेत तल्लीन होतो. त्याच्यासमोर कोणतेही जीवनध्येय असत नाही व कार्यक्रमही असत नाही. तो कल्पना करू लागतो की, “”मी स्वत: तर काहीच नाही व मी करावे असे कोणतेही काम नाही. माझ्या केल्यानेसुद्धा काहीच होत नाही. वास्तविकपणे ते सर्वव्यापी अस्तित्व जे माझ्यात आणि संपूर्ण सृष्टीत शिरलेले आहे, जे अस्तित्व अनादी काळापासून ते अनंतापर्यंत वाटचाल करीत आहे, सर्व कामे त्याचीच आहेत. तोच सर्वकाही करीत असतो. तो जर परिपूर्ण आहे तर मीसुद्धा परिपूर्ण आहेच, मग प्रयत्न कशासाठी? तो जर आपल्या पूर्णतेसाठी झटत आहे, तर ज्या सार्वभौम गतीने तो पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे, त्याच्या विळख्यात एका अंशरूपात माझीसुद्धा आपोआप वाटचाल होईल. मी एक अंश आहे, मला काय माहीत की हे संपूर्ण अस्तित्व कोठे जात आहे व कोठे जाऊ इच्छिते.”
या विचारसरणीचे प्रत्यक्ष कृतीरूपात निघणारे परिणाम जवळजवळ तेच आहेत ज्यांना आताच मी विरक्तीच्या दृष्टिकोनासंबंधी सांगितले आहेत. किंबहुना काही परिस्थितीत अद्वैतवादाचे मत स्वीकारणाऱ्याचे वर्तन निव्वळ अज्ञानाची पद्धत स्वीकारणाऱ्या वर्तनासमान असते. कारण हा आपल्या इच्छा व वासनांच्या हातात आपली धुरा सोपवितो. मग ज्या दिशेने इच्छा व वासना नेतात त्या दिशेने नि:संकोचपणे असे समजून भरकटत राहतो की, वाटचाल परिपूर्ण अस्तित्व आहे, मी नाही.
पहिल्या दृष्टिकोनाप्रमाणेच सदरहू दृष्टिकोनसुद्धा अज्ञानाचे दृष्टिकोन आहेत. म्हणून याच्या आधारावर जी वर्तने निर्माण होतात तीसुद्धा अज्ञानाची वर्तने आहे. कारण प्रथमत: तर यांच्यापैकी कोणताही दृष्टिकोन कोणत्याही शास्त्रोक्त पुराव्यावर आधारित नाही, तर केवळ काल्पनिक आणि तार्किक आधारावर विभिन्न मते निश्चित केली गेली आहेत. दुसरे असे की, त्यांचे वास्तवतेविरुद्ध असणे अनुभवाअंती सिद्ध होते की, त्यांच्यापैकी कोणतेही मत जर वास्तविकतेला धरून असते तर त्यानुसार कृती केल्याने वाईट परिणाम अनुभवात आले नसते. जेव्हा आपण असे पाहतो की, एखादा पदार्थ एखाद्याने जर एखाद्या वेळी खाल्ला तर त्याच्या पोटात दुखल्याशिवाय राहात नाही, तर या अनुभवाद्वारे आपण असा निष्कर्ष काढतो की, वास्तविकपणे जठराची बनावट व त्याच्या स्वभावाशी तो पदार्थ अनुकूल नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्याअर्थ सत्य असे आहे की, अनेकेश्वरवाद, विरक्ती आणि अद्वैतवादाचे दृष्टिकोन स्वीकारल्याने माणसाला एकूणपणे हानीच पोचली आहे, त्याअर्थ हासुद्धा या गोष्टीचा पुरावा आहे की, यापैकी कोणताही दृष्टिकोन सत्य व वास्तविकतेला धरून नाही.
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *