Home A परीचय A शांतीचा एकच मार्ग

शांतीचा एकच मार्ग

धर्म आणि फक्त धर्मच जगाला गमावलेली सुख-शांती देऊ शकतो. तो माणसाच्या मनात खऱ्या अर्थाने प्रेम निर्माण करुन त्याला अन्यायाशी सामोरे जाऊन मुकाबला करण्याचे धैर्य प्रधान करतो आणि त्याला दर्शवितो की जर तो आपल्या पालनकर्त्या स्वामीच्या प्रसन्नतेचा इच्छुक आहे, तर त्याने दुष्टपणाचे अधिपत्य करणाऱ्या दैत्यांना नष्ट करून केवळ आपल्या पालनकर्त्याचे शासन स्थापित केले पाहिजे. या मार्गात येणाऱ्या सर्वप्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि केवळ परलोकीय यशावर दृष्टी ठेवली पाहिजे. काय आजच्या जगाला सुख, शांती, समाधान याकरिता धर्माची गरज नाही काय?
धर्माविना जीवनाला आरंभापासून काही अर्थ उरत नाही. परलोकावरील दृढ विश्वास ही धर्माची बहुमोल विशेषता आहे. हा विश्वास प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवन एका नव्या श्रद्धेचे बोट पकडते व त्याच्यासमोर नवनवी क्षितिजे उभी राहतात. परलोकावरील दृढविश्वासाविना मानव नीचतेच्या कष्टदायी अनुभूतीचे लक्ष्य बनतो. मरणोत्तर जीवनाच्या इन्काराचा अर्थ असा होतो की समाजातील एकत्र जीवनाचा, मानवी आयुष्याचा भाग केला जावा व मानवाला आपल्या आंधळ्या व बहिऱ्या वासना, इच्छा, तसेच अंधविश्वास यांच्या दयेवर मोकळे सोडून देण्यात यावे. त्यानंतर माणूस आपल्या इच्छापूर्तीमध्ये स्वतःला हरवून बसतो. जितके अधिक सुख तो मिळवू शकतो, तितके गोळा करावे आणि त्यात इतर कोणालाही वाटेकरी होऊ देऊ नये, हेच त्याच्या सर्व प्रयत्नांचे व पराकष्टेचे ध्येय व लक्ष्य बनते. येथूनच हेवेदावे, झगडे व रक्तरंजित युद्धांचा आरंभ होतो व इच्छादासांनी भरलेल्या या जगामध्ये आपल्यासमोर पसरलेल्या सुखद गोष्टीवर तुटून पडून प्रत्येकजण ते जास्तीतजास्त हस्तगत करु इच्छितो. अधिकाधिक फायदे कमीतकमी वेळात तो एकटा गोळा करु इच्छितो. त्याच्या मनात कोणत्याही उच्चतम सत्तेचे भय असत नाही, कारण त्यांच्यानुसार या जगाचा कोणी ईश्वर नसतो व कोणतीही न्याय व्यवस्था नसते.
पारलौकिक जीवनाच्या इन्कारामुळे माणूस इच्छांच्या खोल गर्तेत बुडून जातो. त्याच्या विचाराची व चितनाची भरारी उदात्ततेपासून वंचित होते आणि त्याचे हेतू व कार्यभाग साधून घेण्याचे मार्ग अधःपतनाचे लक्ष्य बनतात. मानवता आपापसातील झगड्यांचा व लढायांचा आखाडा बनते. त्यानंतर माणसाला इतकी उसंतच मिळत नाही की त्याने उच्च व उदात्त जीवन उद्देशांचा पाठपुरावा करावा. या नवीन जगात प्रेम व सहानुभूतीला काही स्थान नसते. भौतिक सुखाची लालसा व इच्छा वासनांचे अधिपत्य यामुळे जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा व सद्भावांचा आदर करण्याची माणसाची क्षमता लोप पावून असा आदर करण्यापासून तो अक्षम केला जातो.
भौतिक जडवादाचा परिणाम
भौतिकवादी माणसांना काही भौतिक फायदेही मिळून जातात यात शंका नाही, पण भौतिकवादात एक असा शाप आहे की वरपांगी दिसणारे हे फायदेही नाश पावतात. माणूस त्यांच्या लालसेने आंधळा बनून आपल्याच बांधवाशी लढत असतो. इच्छाशक्ती, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार या कुभावनांवर त्याचा ताबा नसतो आणि तो त्यांच्या बंधनातून कधीही मुक्त होऊ शकत नाही.
ज्या लोकजाती भौतिकतेचा अंगीकार करतात त्यांच्यावर निरंतर एक प्रकारच्या दडपणाचे व गृहकलहाचे वातावरण आच्छादित असते. परिणामस्वरुप समस्त मानवी जीवन अस्तव्यस्त होऊन जाते आणि विज्ञान व त्याची भयानक अस्त्रे मानवी वंशाची सेवा करण्याऐवजी माणसाचा सर्वनाश व संहार करण्यात व्यतीत होऊ लागतात.
संकुचितपणावर उपाय
भौतिकता माणसाच्या संकुचितपणाचे प्रतीक आहे. यातील बिघाडापासून वाचण्याकरिता मानवतेच्या मानसिक क्षितिजांचा विस्तार करण्याची गरज आहे. हा उद्देश केवळ धर्मानेच प्राप्त होऊ शकतो. केवळ तोच मानवतेला नवा विस्तार व नवी उदात्तता प्रदान करु शकतो, कारण धर्माच्या दृष्टीने मानवी जीवन फक्त इहलोकापुरतेच मर्यादित नसून ह्यानंतरचीही परंपरा निरंतर चालू राहत असते. हा विश्वास माणसाच्या मनात एका नवीन आशेची ज्योत प्रफुल्लित करतो, त्याला दुष्टपणा, अत्याचार, तसेच दडपण याविरुद्ध धैर्याने झगडण्याचे साहस प्रदान करतो आणि त्याला हे दाखवून देतो की सारी मानवजात एकमेकांचे बंधू आहेत. प्रेम आपापसांतील सहानुभूती व विश्वबंधुत्व या गोष्टीचे शिक्षण मानवतेला सुखशांती व वास्तविक समृद्धी, तसेच विकास व उन्नती यांनी वैभवसंपन्न करुन टाकतो. अशी वस्तुस्थिती व सत्य असतांना धर्म ही माणसाची अंतिम गरज नाही आणि मानव आजही तिचा गरजवंत नाही, जसा शतकानुशतकापूर्वी होता, असे कोण म्हणू शकतो? जीवनक्षेत्रात धर्म ज्याप्रकारे माणसाला घडवून तयार करतो, त्याप्रकारे दुसरी कोणतीही शक्ती माणसाला घढवू शकत नाही.
दीपस्तंभ
धर्म माणसाला स्वतःसाठी जगण्याऐवजी इतरांसाठी जगण्याचे शिकवितो, त्याला एक उदात्त व पवित्र लक्ष्य देतो आणि हे लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गांत येणाऱ्या कष्टांचे व संकटाचे, खुल्या मनाने स्वागत करण्याचे शिकवितो. धर्मांने प्रदान केलेल्या त्या ईमान (श्रद्धा) व विश्वास यापासून जर मानव वंचित झाला, तर तो स्वतःखेरजी दुसऱ्या कोठल्याही गोष्टीचा विचार करु शकत नाही. सर्व जीवन स्वार्थ व स्वभक्ती याची प्रतिमा होऊन जाते. त्यांच्यात व जंगली श्वापदात काही अंतर उरत नाही. इतिहासात अशा असंख्य व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी आयुष्यभर न्याय व सत्य याच्या रक्षणार्थ ढालीचे कार्य केले आणि त्यामध्ये आपल्या प्रिय प्राणाचीही आहुती व बलिदान केले. त्यांना आपल्या दीर्घ प्रयत्नाचे व त्यागाचे कसलेही फळ या जगात मिळाले नाही. प्रश्न असा आहे की कोणत्या दृष्टीने या लोकांना असा लढा देण्यास उद्युक्त केले? ज्याचा परिणाम असा निघाला की त्यामध्ये त्यांना कसलेही भौतिक यश प्राप्त झालेच नाही, परंतु जे काही त्यांच्यापाशी होते तेही या लढ्यानंतर त्यांच्या हातून निसटले. याचे उत्तर केवल एकच आहे आणि ते म्हणजे श्रद्धा या पवित्र मानवी जीवांचे अस्तित्व याच श्रद्धेचा एक छोटा चमत्कार आहे. याउलट लोभ, मोह, कपट, द्वेष, स्वार्थ तसेच तिरस्कार हे असे नीचतेचे प्रेरक आहेत की ज्यांच्याद्वारा कसलेही वास्तविक व सुदृढ यश प्राप्त होऊ शकत नाही. त्याचा झगमगाट बाह्यत्कारी व क्षणभर होत असतो. त्यांच्या प्रभावाखाली असलेली माणसे तत्काळ लाभाची इच्छा करतात. त्यामुळे माणसात कधीही स्वास्थ्यपूर्ण चारित्र्य वाढीस लागू शकत नाही. तसेच त्यामध्ये एखाद्या उच्च ध्येयासाठी, जगाचा त्याग करुन सोशिकपणाने, सहनशीलतेने व भक्कमपणे सतत प्रयत्न करीत राहण्याची भावना टिकून ती वाढीस लागू शकत नाही.
तिरस्काराचे भक्त
आम्हाला हे माहीत आहे की काही तथाकथित सुधारक प्रेमाऐवजी द्वेष व तिरस्कारद्वारा जगाची सुधारणा करु इच्छितात. द्वेषातच ते सतत गुरफटलेले असतात. त्यापासूनच ते पोषण व शक्ती प्राप्त करतात व त्याच्याच सहाय्याने, दुःखांनी आणि कष्टांनी वेढलेले असतानासुद्धा भक्कमपणे व साहस करुन आपले सुधारणाअभियान चालू ठेवतात. या लोकांच्या तिरस्काराचे लक्ष्य मानवी वंशाचा एखादा विशेष समूहही होऊ शकतो आणि हेही संभव आहे की सामूहिकरुपाने अखिल मानवजात अथवा तो ऐतिहासिक काल त्याचे लक्ष्य होतो, ज्यामध्ये तिरस्काराच्या भक्तास जाग येते. मानवतेपासून दूर असलेले हे वैफल्यग्रस्त ‘सुधारक’ व त्यांचा समूह, आपले उद्देश प्राप्त करणे निश्चतच संभवनीय आहे. तिरस्काराची आग त्यांच्या दुष्ट स्वभावाशी व उपजत अत्त्याचाराची सवय असल्याने हे लोक आपल्या उद्देशपूर्तीकरिता पूर्ण एकोपाही दाखवू शकतात व सर्व प्रकारच्या उणिवाही व वंचितपणा पसंत करु शकतात. परंतु जी श्रद्धा प्रेमाऐवजी तिरस्कारावर आधारलेली असेल त्यापासून, मानवतेला कसलेही कल्याण व यश प्राप्त होऊ शकत नाही. त्यापासून वर्तमान अन्यायाची, तसेच समाजातील प्रचलित वाईट गोष्टीचे परिमार्जन करुन झालेले नुकसान व त्याची भरपाई निसंदेह पुरी केली जाऊ शकते. पण त्याचा हात मानवतेच्या या आजाराच्या रामबाण उपायापासून बिलकूल रिकामा असतो. याच कारणस्तव समाजाचे वर्तमान दोष नष्ट करण्याच्या नावावर केले जाणारे हे सुधारणेचे इलाज व उपाय, त्या दोषांना कमी करुन त्यांना नष्ट करण्याऐवजी, त्यामध्ये अनेक पटीने वृद्धी करतात आणि अशी अवस्था निर्माण होऊन जाते की –
‘जो जो उपाय केला गेला तो तो आजार वाढतच गेला.
संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *