माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अल्लाह! मी एक मनुष्य आहे. मी ज्या कुणा मुस्लिमास वाईट म्हणेन अथवा त्याचा धिक्कार करीन, मार देईन तर यास त्याच्यासाठी उत्कृष्ठता व दयालुता बनव.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण
मी एक मनुष्य आहे आणि मनुष्य असल्याने कमतरता व उणिवा माझ्यात असू शकतात. शक्यतो रागाच्या भरात एखाद्या मुस्लिमास भले-बुरे म्हणावे, धिक्कार करावा किंवा त्यास मार दिल्यास, हे प्रभो! यास त्या व्यक्तीसाठी तुझ्या दयेचे व कृपेचे निमित्त बनव. माझे रागावणे त्या व्यक्तीसाठी वरदान ठरो. एका हदीसमध्ये आले आहे,
‘‘हे अल्लाह! ज्या कोणा मुस्लिमास मी भले-बुरे म्हटले असेल तर यास कयामतच्या दिवशी त्याच्यासाठी तुझ्या सान्निध्याचे साधन बनव.’’ (हदीस : बुखारी)
0 Comments