सर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह)महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही. ह्या इतक्या उघड वास्तव बाबी आहेत की यासंबंधी पवित्र कुरआनातील संबंधित आयतींचा आणि हदीसांचा हवाला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. इच्छुक व्यक्ति पवित्र कुरआनच्या कोणत्याही अनुवादावर नजर फिरवून त्यांची सत्यता पडताळू शकतो.
व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये निश्चित व्याख्येसह आहे. जीवनाच्या कोणत्याही पैलू विषयी केलेल्या वर्णनापेक्षा अधिक विस्ताराने या कायद्यांचे वर्णन पवित्र कुरआन व हदीस मध्ये करण्यात आले आहे. नमाज, जकात, रोजा आणि हज यासारख्या मौलिक धार्मिक कार्याविषयी सुद्धा अशा व्याख्या केलेल्या नाहीत. कोणत्याही हिता शिवाय आणि आवश्यकते शिवाय असे होऊ शकत नाही. हित आणि आवश्यकतेच्या निश्चितीकरणात मतभिन्नता होऊ शकते. तथापि व्यक्तिगत कायद्यांच्या विवरणामध्ये वैशिष्टपूर्ण व्याख्या देण्यात आल्यामुळे पवित्र कुरआनच्या दृष्टीत त्याना खास महत्व असल्याच्या पुराव्याबाबत दुमत होऊ शकत नाही.
अल्लाहचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण
कोणत्याही आदेशांचा उल्लेख पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये असल्यास ते आदेश पाळणे मुस्लिमांना बंधनकारक असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्यासंबंधी वादविवाद केला जात आहे, तो व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीसमध्ये अस्तित्वात असल्यामुळे त्या कायद्याचे मुस्लिमांना अनुसरण करणे अनिर्वाय आहे. या सैद्धान्तिक वास्तवतेवर विसंबवून पवित्र कुरआन या कायद्यांचे केवळ विवेचन करून थांबत नाही तर प्रत्येक स्तरावर त्याचे पालन करणे कसे बंधन कारक आणि आवश्यक आहे तेही सांगितले आहे. उदाहरणार्थ लग्नविधी(निकाह) संबंधी काही आदेश दिल्यानंतर एके ठिकाणी ताकिद केली आहे की,
‘‘अल्लाहने तुमच्यावर ह्याला(या कायद्याला) बंधनकारक ठरविले आहे’’(सुरत निसा आयत २४)
आणखी एका ठिकाणी आदेश दिला आहे की,
‘‘हा अल्लाहचा आदेश, तो तुमच्या बाबतीत निर्णय घेतो’’(सूरत मुम्मतहिना आयत १०)
या प्रमाणे तलाक आणि खुलअ यासंबंधी काही आदेशांचे विवेचन करून सावधान केले जाते की,
‘‘या मर्यादा अल्लाहने ठरविल्या असून त्यांचे उल्लंघन करू नका’’(सूरत बकर आयत २२९)
इद्दत विषयी काही सूचना देऊन आठवण करून दिली जाते की,
‘‘हे अल्लाहचे आदेश, त्याने तुमच्या पर्यंत पोहोचविले आहेत.’’(सूरत तलाक आयत ५)
आणखी एके ठिकाणी तलाक आणि इद्दत या विषयी काही आदेश देऊन त्याना ‘‘हुद्दुल्लाह’’(अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा) असे म्हणून त्यांची ओळख करून देण्यात आली आहे.

वारसा हक्काच्या कायद्या संबंधी तर व्याख्या अगदी स्पष्ट करून त्याचे विवेचन करताना सर्वात प्रथम त्यातच निःसंद्विग्ध हुकूम दिला आहे की,
‘‘माता पित्यानी किवा जवळच्या नातेवाईकांनी सोडून गेलेल्या वारशाच्या संपत्तित पुरूषाचा सुद्धा हिस्सा आहे आणि स्त्रियांचा सुद्धा त्या संपत्तित हिस्सा आहे. संपत्ति कमी असो की ज्यादा, हा हिस्सा निर्धारित केलेला आहे’’(सूरत निसा: आयत ७)
नंतर या कायद्याच्या विवेचनाची सुरवात खालील शब्दानी होते.
‘‘तुमच्या मुलाबाळांच्या वारशासंबंधी अल्लाह तुम्हाला या गोष्टींचा वारसा पत्र करतो की, ’’(सूरत निसा: आयत ११)(म्हणजे वारसदारासाठी अल्लाहनेच वारसा पत्र केले आहे, कुणा व्यक्तिने ते करून ठेवण्याची आवश्यकता नाही)
यानंतर याच कायद्याच्या एका विभागाचे विवेचन पूर्ण होण्यापूर्वी मध्येच थांबून आठवण करून दिली जाते की,
‘‘हे(वारसांचे हिस्से) अल्लाहकडून निर्धारित केले आहेत. अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि सर्वज्ञ आहे.’’(सूरत निसा: आयत ११)

आणि पुन्हा या विवेचनाची समाप्ती खालील शब्दांनी होते.
‘‘हे अल्लाहकडून केलेले वारसा पत्र(अर्थात सक्त आज्ञा आणि हुकूम) आहे आणि अल्लाह सर्व जाणणारा आणि समझदार आहे. या मर्यादा अल्लाहने निर्धारित केल्या आहेत.’’(सूरत निसा: आयत १२-१३)
या प्रमाणे या वारसा हक्का बाबत, शब्द आणि शैली बदलून केवळ एक दोन वेळाच नव्हे तर पाच वेळा खंबीरपणे हे वास्तव सांगून मनावर ठसविले आहे की हे कायदे अल्लाहने निश्चित केलेले असून यांचे पालन करणे अनिवार्य ठरविले आहे.
पवित्र कुरआन मध्ये असलेल्या या निःसंदिग्ध आदेशामुळे, हे कायदे कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक होऊ शकतील हा विचार कोणत्याही अनुचित युक्तिवादाने सुद्धा योग्य ठरवू शकत नाही आणि या कायद्याना आपण बनविलेल्या कायद्याच्या पातळीवर आणता येत नाही.

इस्लामी मूल्यांचे निर्देशक
हे कायदे इस्लामच्या मूळ मूल्यांचे आणि उद्देशांचे पोषक आणि संरक्षक असून त्यात धर्माचा पाया असलेल्या मूल्यांचा आत्मा अस्तित्वात आहे. म्हणून हे कायदे मुस्लिमांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांना व्यवस्थित सोडविण्याचे साधन आहेत. या शिवाय श्रद्धेची आणि इस्लामी मूल्यांची जपणूक करणार्या आवश्यक बाबी एकत्रित ठेवण्याची साधने ही त्या कायद्यात आहेत. उदाहरणार्थ अनेकेश्वरवाद्याशी विवाह करता येत नाही असा एक पायाभूत इस्लामी कायदा आहे. कारण हा कायदा मोडणार्या व्यक्तिस श्रद्धा(ईमान), इस्लामी संस्कार आणि मरणोत्तर जीवनातील सफलता याना ती व्यक्ति पारखी होण्याची सबब बनू शकते असे पवित्र कुरआनांत सांगितले आहे.(सुरत बकरा)

अढळ श्रद्धेची संपत्ति ही मुस्लिमाकरिता सर्वाधिक मूल्यवान बाब असते आणि मरणोत्तर जीवनाची सफलता हा तिचा वास्तविक उद्देश्य असतो. आणि त्या बाबीचे संरक्षण करण्यासाठी अनेकेश्वरवाद्याशी विवाहास प्रतिबंध करणे हा इस्लामचा असलेला मौलिक सिद्धान्त योग्य आणि आवश्यक ठरतो.
त्याच प्रमाणे सर्व पत्नीशी न्यायाने वागण्याच्या अटीसह एकापेक्षा अधिक विवाहास अनुमती दिलेली आहे. त्यास बंदी घातलेली नाही. ही अनुमती अनेक सामाजिक आणि नैतिक कल्याणासाठी दिलेली आहे. आणि त्यात सर्वात महत्वाचा आणि मुख्य उद्देश्य अनाथांच्या संरक्षणाचा आहे.(सूरत निसा)
घटस्फोटाचे आणखी एक उदाहरण घ्या. इस्लामने वैवाहिक नात्याला अतिमहत्वाचे आणि आदरणीय ठरविले असले तरी तलाक आणि खुलअ यांचीही मुभा ठेवली आहे. अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यापासून वाचविणे हा त्यामागे उद्देश्य आहे.(सूरत बकरा: आयत २२९)
आपापसातील घृणा, तिरस्कार आणि उदासीनतेमुळे दांपत्य जीवनातील उद्देशच जर दोघांच्या नजरेतून अदृष्य झाला असेल आणि समेटाची अजिबात आशा उरलेली नसेल तर असे नाते टिकवून ठेवणे म्हणजे आपल्या चारित्र्यावर कलंक लावणे आणि अल्लाहने दाम्पत्यातील प्रत्येकाला दिलेली कर्तव्ये आणि अधिकार यांना हरताळ फासत राहणे म्हणजे उघड उघड सामाजिक वितंडवाद असेल. तथापि इस्लाम हा जीवनाच्या कोणत्याही स्तरावर वितंडवाद, तंटेबखेडे अजिबात पसंद करीत नाही असे वितंडवाद आणि तंटेबखेडे थांबविण्यासाठी पती-पत्नीला वेगळे होण्याशिवाय कोणतीही शक्यता उरत नाही. म्हणून तलाक आणि खुलअची परवानगी देणे आवश्यक समजले गेले आहे.
इस्लामचे व्यक्तिगत कायदे हे केवळ कायदेच नसून त्यांच्या सहाय्याने अपेक्षित मानवी मूल्ये स्थापित करण्यात यावीत असा उद्देश्य या कायद्यात आहे. हे वरील उदाहरणावरून सहज लक्षात येईल.
धर्मावरील दृढ श्रद्धेकरिता आणि मोक्षाकरिता अटी
उपरोल्लेखित कायदे अमलात आणणे इस्लाम धर्मावरील दृढ श्रद्धेसाठी आणि मोक्षासाठी अनिवार्य अटी आहेत हे पवित्र कुरआनच्या शिकवणीने स्पष्ट होते. या वास्तवाला प्रत्यक्ष स्पष्टीकरणाची गरज नाही. कारण अल्लाहचा ग्रंथ आणि प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या हदीस मध्ये या कायद्याचे अस्तित्व असणे म्हणजे ते प्रत्येक मुस्लिमाने अमलात आणणे अढळ श्रद्धा आणि इस्लामसाठी आवश्यक आणि पुरेसे आहे.

याबाबतीत पवित्र कुरआनची शिकवण पहाणे योग्य ठरेल. हे आदेश दृढ श्रद्धेच्या वचनबद्धतेसाठी आवश्यक असून धर्मनिष्ठेचा अविभाज्य अंग आहे. त्यांचे उल्लंघन करणे जुलूम, पापपरायणता, नास्तिकता असून ईश्वरी शिक्षेस कारणीभूत आहे. म्हणून वारसा हक्कासंबंदीच्या कायद्याचे वर्णन केल्यानंतर खालील आज्ञा होते.
‘‘हे(कायदे) अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा आहेत, जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांचे आज्ञापालन करील त्याला अल्लाह अशा बागांमध्ये प्रवेश देईल ज्यांच्या खालून कालवे वहात असतील. ह्या बागांत तो कायम राहील आणि हेच मोठे यश असेल आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांची अवज्ञा करील त्याला तो नरकाच्या आगीत टाकील, त्यात तो कायम राहील आणि त्याच्यासाठी खूप वेदनादायक शिक्षा असेल.’’(सूरत निसा : आयत १३-१४)
वारसा हक्कासंबंधी पवित्र कुरआनने दिलेल्या आज्ञांच्या पालनाचे फळ मृत्यूनंतरच्या निरंतर जीवनाचे साफल्य आणि आज्ञांच्या उल्लंघनाचा परिणाम मृत्यूनंतरच्या कायमच्या जीवनात अपयश पदरी पडेल अशी आज्ञा या गोष्टींची स्पष्ट घोषणा अल्लाह करीत आहे.

त्याच प्रमाणे घटस्फोटाचे काही आदेश दिल्यानंतर अशी आज्ञा केली जाते.
‘‘हा आदेश(अल्लाहच्या हुकूमांचे पालन करण्याचा) तुमच्यापैकी त्या लोकांना केला जात आहे, जे अल्लाह आणि मृत्यूनंतरच्या जीवनाच्या दिवसावर श्रद्धा ठेवतात.’’(सूरत बकराह : आयत २३२)
हे आदेश अमलात आणणे आणि मुस्लिम असणे या दोन्ही गोष्टी पवित्र कुरआनच्या दृष्टीकोनातून परस्पराना पूरक आहेत असा याचा अर्थ होतो.

सूरत मुजादला मध्ये ‘जहार’(पत्नीला माता मानणे) संबंधीच्या आदेशांचे विवेचन केल्यानंतर त्यांचे महत्व खालील शब्दात वर्णन करण्यात आले आहे.
‘‘हे आदेश(अशासाठी दिले आहेत) की तुम्ही अल्लाहवर आणि त्यांच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवणारे बनावेत आणि अल्लाहने निर्धारित केलेल्या या मर्यादा आहेत आणि त्यांचा इन्कार करणार्यासाठी यातनादायक शिक्षा आहेत.’’(सूरत मुजादला: आयत ४)
‘‘व लिल काफिरीन अजाबुन अलीम’’ हे शब्द येथे आले असल्यामुळे पवित्र कुरआनचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की वर विवेचन केलेल्या ‘जहार’ चे आदेश धुडकावून लावणारी व्यक्ति श्रद्धेच्या कक्षेत शिल्लक राहू शकत नाही.

‘‘धर्म श्रद्धेचा अविभाज्य अंग असण्याचा स्पष्ट पुरावा’’
विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा इत्यादि बाबी संबंधी पवित्र कुरआनात जे आदेश दिलेले आहेत त्यांचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद(स.) यानी केलेले आहे. या स्पष्टीकरणास ‘सुन्नत’ असे म्हणतात. पवित्र कुरआन आणि सुन्नतचे आदेश जे व्यक्तिच्या आणि समाजाच्या जीवनाशी संबंधित आहेत, ते आदेश इस्लाम धर्मशास्त्राचे(शरीअतचे) अत्यंत महत्वाचे, अविभक्त आणि अविभाज्य असे अंग आहेत. विवाह घटस्फोट, पोटगी, वारसा इ. बाबतीत पवित्र कुरआनने जे आदेश दिले आहेत त्या सर्वांना एकत्रितपणे शरीअत म्हणतात आणि शरीअतचे संपूर्णपणे पालन करण्याची आज्ञा पवित्र कुरआनने दिली आहे. या शरीअतलाच ‘मुस्लिम पर्सनल लॉ(मुस्लिम व्यक्तिगत कायदा)’ असे सध्या संबोधण्यात येते.
0 Comments