माननीय अबु हुरैरा (र.) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘माझ्या पालनकत्र्या ईश्वराने मला नऊ गोष्टींचा आदेश दिला आहे.
(१) दर्शनीय आणि अदर्शनीय – प्रत्येक स्थितीत ईश्वराचे भय बाळगणे.
(२) सत्य, रास्ती व समानतेवर टिवूâन रहावे, मग श्रीमंती असो वा गरीबी.
(३) कोणावर मेहरबानीच्या व संतापाच्या दोन्ही स्थितीत न्यायपूर्ण बोलावे.
(४) ज्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत, त्यांच्याशी संबंध जोडावेत.
(५) ज्यांनी मला वंचित केले त्यांना त्यांचा हक्क द्यावा.
(६) माझ्यावर अत्याचार करणाऱ्यास क्षमा करावी.
(७) माझे मौन राहणे विचार करण्यासाठी असावे.
(८) माझी दृष्टी बोध घेण्यासाठी असावी.
(९) माझ्या बोलचाल व चर्चेमधून ईश्वराचे महीमत्व स्मरण व्हावे.
यानंतर प्रेषितांनी सांगितले की, इस्लामचा प्रचार करणाऱ्यांच्या स्वभावात उपरोक्त गुणधर्म असावेत. क्षमा केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते
ह. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘सदका (दान) देण्याने संपत्तीचा ऱ्हास होत नाही. आणि एखादी व्यक्ती क्षमाशील असेल तर अल्लाह त्याच्या सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ करतो. आणि एखादी व्यक्ती केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी विनम्रता बाळगत असेल तर, ईश्वर अशा व्यक्तीस उच्चपदावर पोहोचवितो. (हदीस : मुस्लीम शरीफ)
स्पष्टीकरण
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की, सदका (दान) दिल्याने, संपत्तीचा ऱ्हास होतो. संपत्ती कमी होते. त्याचप्रमाणे लोक असेही विचार करतात की आम्ही इतरांना क्षमा करण्याचे ठरविले आणि लोकांसमोर विनयशिलतेने वर्तुणूक ठेवली तर लोक यास आमची दुर्बलता आणि मजबूरी समझतील. विनम्रताबाबत लोकात असा गैरसमज आहे की हे आमच्या स्वाभिमान आणि प्रतिष्टेच्या विरूद्ध आहे. उपरोक्त हदीसमध्ये लोकांच्या गैरसमजुतीला आणि त्यांच्या कुशंकाला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्पष्ट करण्यात आले आहे की सदका देण्याने संपत्तीमध्ये कमतरता येत नाही. वास्तविकता अशी आहे की सदका देवून भक्त, ईश्वराच्या कृतज्ञभक्तांमध्ये सामील होत असतो. ईश्वर आपल्या कृतज्ञभक्तास आपल्याकडील अतिरिक्त अनुग्रहाने (कृपेने) सन्मानित करतो, असे ईश्वराचे वचन आहे. ‘‘जर तुम्ही माझे कृतज्ञ दास व्हाल, तर तुम्हांला मी अधीक देईन.’’ (कृपा करीन) तसेच क्षमाशिल होण्यासाठी (हृदय) मनाचे मोठेपण, उदारपण होणे आवश्यक आहे. कोत्या मनाच्या माणसाच्या आवाक्यातील ही गोष्ट नव्हे. म्हणून या गैरसमजामध्ये राहू नका की, क्षमाशिल आणि विनयशिल वृत्तीमूळे आपल्या सन्मानाला आघात पोहोचेल. क्षमा केल्याने प्रतिष्ठामध्ये कमीपणा येत नाही, तर त्यामध्ये वाढच होते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती विनम्रता अंगीकारते तेव्हा ईश्वर त्याचा दर्जा उंचावत असतो. विनयशिलता ही मानवाच्या नैतीकतेच्या अस्तित्वाचे सौंदर्य आहे. सौंदर्य जिथे जिथे आढळेल, तिथे तो स्वत:चे महत्व स्विकारण्यास भाग पाडेल.
0 Comments