Home A hadees A जकात : अनिवार्यत: अदा केले जाणारे कर्तव्यदान

जकात : अनिवार्यत: अदा केले जाणारे कर्तव्यदान

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘नि:संशय सर्वश्रेष्ठ अल्लाहने लोकावर जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरविले आहे. जो त्यांच्या श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल व त्यास  त्यांच्या गरजवंत गरीब लोकांना परतविला जाईल. (हदीस : मुत्तफिक अलैय्)

भावार्थ
सदका हा शब्द जकातसाठीही वापरला जातो, ज्याचे अदा करणे इस्लामी कायद्यानुसार आवश्यक आहे आणि इथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. अशा प्रत्येक धनसंपत्तीस लागू पडते, जो मनुष्य आपल्या राजीखुषीने अल्लाहच्या मार्गात खर्च करतो. उपरोक्त हदीस वचनातील शब्द ‘परतविला जाईल’ स्पष्ट दर्शवितो की जकात जी धनवानाकडून वसूल केली जाईल, ती  वस्तुत: समाजातील गरीब आणि गरजवंतांचा हक्क आहे, जो त्यांना मिळवून दिला जाईल. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की ज्या माणसाला सर्वश्रेष्ठ अल्लाहने धन दिले  आणि मग त्याने त्याची जकात अदा केली नाही, त्याचे हे धन कयामतच्या दिवशी अतिशय विषारी सापाचे रूप धारीण करील, ज्याच्या डोक्यावर दोन काळे ठिपके असतील (हे अती  विषारी असण्याचे लक्षण आहे.) आणि तो त्याच्या गळ्याचा हार बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना पकडून हा साप म्हणेल, मी तुझे धन आहे, मी तुझा खजीना आहे. त्यानंतर प्रेषित  (स.) यांनी पवित्र कुरआनातील आयतीचे पठन केले जिचा अर्थ असा, ‘‘ते लोक जे आपले धन खर्च करण्यात कंजूसी करतात, त्यांनी असे समजु नये की त्यांचा हा कंजूसपणा  त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरेल. या उलट तो अधिक वाईट ठरेल. त्यांचे हे धन कयामतच्या दिवशी त्यांच्या गळ्याचा हार बनेल. अर्थात ते त्यांच्यासाठी भयंकर विनाशकारक ठरेल.  (हदीस- बुखारी)

माननीय आयशा (रजी.) सांगतात की, मी प्रेषित (स.) यांचे असे निवेदन ऐकले की, ‘‘ज्या धन-संपत्तीतून जकात न काढली जाईल, त्यातच ती मिसळलेली राहील तर ती त्या  धनसंपत्ती नाश केल्याशिवाय राहात नाही.’’ (हदीस – मिश्कात)

भावार्थ

नाश करण्याशी अभिप्रेत हे नव्हे की, जो मनुष्य जकात देत नसेल आणि स्वत:च खाईल तर अपरिहार्यत: कोणत्याही स्थितीत त्याची सर्व मालमत्ता नाश पावेल. ते धन ज्याचा लाभ घेण्याचा त्याला हक्क नव्हता आणि जो फक्त गरीबांचा हिस्सा होता, तो त्याने गिळंकृत करून आपल्या ईमानाचा सर्वनाश ओढवून घेतला. इमाम अहमद बिन हंबल यांच्याद्वारे हाच खुलासा उल्लेखित आहे, आणि असेही पाहण्यात आले आहे की जकात हडप करून घेणाऱ्याची संपूर्ण मालमत्ता बघता बघता नष्ट झाली आहे.

जकात : दिनदुबळ्यांचे अधिकार
मा. अनस बिन मालिक (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याकडे एक माणूस आला व म्हणाला की, ‘‘हे ईश्वराच्या प्रेषिता! मी खूप श्रीमंत आहे मुलेबाळेही  आहेत, तसेच गुरेढोरेही आहेत. तेव्हा मी आल्या संपत्तीचा व्यय (खर्च) कसा करावा?’’ प्रेषितांनी (स.) उत्तर दिले की, ‘‘तुम्ही आपल्या संपत्तीची जकात द्यावी कारण जकात तुमच्या   आत्म्यास शुद्ध करते.आपल्या नातलगांशी संबंध जोडा व त्यांचे अधिकार पूर्ण करा. याचक, शेजारी आणि दिनदुबळ्यांचे अधिकार त्यांना द्या. (हदीस – मसनद अहमद)

नमाज, रोजा, जकात चा आदेश पूर्ण करणारे आदरणीय आयेशा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘तीन प्रकारच्या लोकांसमोर, तीन प्रकारच्या  अडचणी अजिबात येत नाहीत. १) जे लोक नमाज, रोजा आणि जकात अदा करतात, त्यांच्याशी ईश्वर नमाज, रोजा, जकातची पूर्ती न करणाऱ्याबरोबर होणारा (प्रकोपीय) व्यवहार  करणार नाही. २) ज्या दासाला ईश्वराने त्याच्या भल्या पुण्य कर्मास्तव आपल्या छत्रछायेत व सुरक्षेत घेतले आहे, त्यास कयामतच्या दिवशी इतरांकडे स्वाधीन करणार नाही. ३) जो  माणूस एखाद्या समाजाशी स्नेह ठेवतो, ईश्वर त्याला त्याच्या स्वाधीन करतो. (हदीस – मसनद अहमद)

संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *