Home A स्त्री आणि इस्लाम A कन्येच्या रुपात स्त्रीचा दर्जा

कन्येच्या रुपात स्त्रीचा दर्जा

अज्ञानकाळात (अर्थात इस्लामपूर्व काळात) अरबवासी मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते, परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेषदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलतानादेखील त्यांची मान शरमेने खाली जात होती. इतकेच नव्हे तर काही कठोरहृदयी बाप आपल्या हाताने आपल्या निष्पाप (अल्पवयीन) मुलींना जिवंत दफन करीत होते कुरआनने म्हटले आहे,
“अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्वकाही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.”                (दिव्य कुरआन, 42 : 49 – 50)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली,
“अल्लाहने एखाद्या व्यक्तीची मुलींद्वारे कोणतीही कसोटी घेतली तरी त्या व्यक्तीने त्यांच्याशी सदव्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. या मुली त्या व्यक्तीकरिता नरकापासून वाचण्याचे साधन असतील.”    (हदीस : बुखारी)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
“तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिनी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर तो स्वर्गात निश्चितच प्रविष्ट होईल.”                (हदीस : तिर्मिजी)
एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“जी व्यक्ती दोन मुलींचे त्यांच्या तारूण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील, अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने (एकत्र) येऊ.” असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखविली.    (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात,
“ज्याला मुलगी असेल त्याने तिला दफन केले नाही अथवा तिच्याशी उपेक्षेने वागला नाही किंवा तिच्याऐवजी आपल्या मुलास प्राधान्य दिले नाही, तर अल्लाह त्यास स्वर्गात स्थान देईल.”    (हदीस)
एकदा अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“मुलींशी घृणा करू नका, त्या सहानुभूतीची प्रतिमा व अतिमौल्यवान आहेत.”     (हदीस : मुसनद अहमद)
माननीय सुराका (रजि.) यांना अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले,
“सर्वात मोठे दान कोणते हे मी तुम्हाला सांगू नये काय?”
माननीय सुराका (रजि.) यांनी नम्रपणे सांगितले, “”हे अल्लाहचे पैगंबर (स.)! आपण अवश्य सांगावे.”
पैगंबर म्हणाले, “”आपल्या त्या मुलीवर उपकार कर जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.”     (हदीस)
    अशाप्रकारे इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकारदेखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपातसुध्दा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे.
संबंधित पोस्ट
Febuary 2025 Sha'ban 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4
3 5
4 6
5 7
6 8
7 9
8 10
9 11
10 12
11 13
12 14
13 15
14 16
15 17
16 18
17 19
18 20
19 21
20 22
21 23
22 24
23 25
24 26
25 27
26 28
27 29
28 Ramadhan 1
1 2
2 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *