‘तौहीद’ म्हणजे केवळ अल्लाहचे अस्तित्व मान्य करणे असा अर्थ होत नाही. जगात असा कोणताच समाज नव्हता व आजही नाही जो अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करतो. जगात फार पूर्वीपासून नास्तिक अस्तित्वात आहेत. रशियाचे नास्तिकत्व तर सर्वांना माहीतच आहे. पण रशियाचे नास्तिकशासक एक पंचमांश नागरिकांनासुद्धा अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करण्यास राजी करू शकले नाहीत. आश्चर्य म्हणजे ते गेले चाळीस-पन्नास वर्षे नास्तिकतेचा प्रचार करीत आहेत व या प्रचारासाठी शक्ती व संपत्तीचा बेछूट व्यय करीत आहेत. गंमतीची गोष्ट अशी की, मागच्या जागतिक युध्दात जेव्हा जर्मन फौजा विजयी होत रशियात शिरु लागल्या तेव्हा स्टालिनने स्वत: जनतेस आवाहन केले की, मस्जिद व चर्चमध्ये जाऊन अल्लाहची प्रार्थना करा की, त्याने आमची रक्षा करावी. याचाच अर्थ असा की, जे लोक अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करतात, तेच वेळ पडल्यास अल्लाहसमोर हात पसरून दयेची याचना करतात. सारांश मानव कधीही अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करू शकला नाही आणि करु शकणार नाही.
‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे असे होते. जगातील कोणताही समाज सर्व शक्तींना (आराध्यांना) ईश्वर मानत नाही.
भारतातील अनेकेश्वरत्वी परमात्मा हाच ईश्वर आहे असे मानतात. भूतकालीन झरतुष्ट्री (इराणी अग्निपूजक) ईश्वर एक आहे असे मानत असत. कुरआन मक्कावासी अश्रध्दावंताना विचारतो की, त्यांना कोणी जन्म दिला? ते उत्तर देतात अल्लाहाने!’ त्यांना पुन्हा विचारले जाते की, धरती व आकाश कोणी निर्माण केले? ते पुन्हा म्हणतात, ‘अल्लाहाने!’ पुरातन कालापासून आजपर्यंत माणूस दिशाभूल करणाऱ्यांमुळे गोंधळला गेला आहे. सर्वांना माहीत आहे की, ‘ईश्वर एक आहे’, तरीही ते अनेक शक्तींची (ईश्वरांची) पूजा करण्याची चूक करीत असतात.

0 Comments