ज्यांवर इस्लामचा पाया आधारलेला आहे. त्या पाचही श्रद्धांचे विवरण या एका वचनातच सामावलेले आहे ते वचन म्हणजे,
‘‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर्रसूलुल्लाह’’
(अल्लाहखेरीज कोणीही आज्ञापालनास व उपासनेस पात्र नाही. मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.)
मुखातून जेव्हा तुम्ही ‘लाइलाहा इल्लल्लाह’ उच्चारता तेव्हा एकूण सर्व खोट्या उपास्यांचा व नियंत्यांचा त्याग करून केवळ एकाच अल्लाहचे दास्यत्व पत्करल्याचा तुम्ही कबुलीजबाब देत असता. तसेच तुम्ही ‘मुहम्मदुर्रसूलुल्लाह’ म्हणता तेव्हा आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत, या गोष्टीच्या सत्यतेबद्दल तुम्ही कबुली देत असता. प्रेषित्वाची कबुली दिल्यानंतर ही गोष्ट तुम्हांवर आपोआपच अनिवार्य ठरते की, तुम्ही ईशत्वासंबंधी ईशसत्ता व ईश्वराच्या गुणवत्तेसंबंधी, त्याच्या ‘फरिश्त्या’ (दूता) संबंधी, ईश्वरी ग्रंथासंबंधी, ईश्वराच्या सर्व प्रेषितांसंबंधी, तसेच ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) संबंधी, जी शिकवण मुहम्मद (स.) यांनी दिलेली आहे, त्यावर अंतःकरणापासून व निष्ठापूर्वक श्रद्धा (ईमान) बाळगावी. अल्लाहच्या आज्ञांचे पालन करण्याची व उपासनेची जी पद्धत त्यांनी दाखवून दिली त्यानुसार आचरण करावे, हे तुम्हावर अनिवार्य ठरते.(१)
१) सूरह अल बकरा, आयत २८५, सूरह अन निसा आयत १३६ आधारित आहेत. यात शंका नाही की ‘हदीस’ मध्ये ‘तकदीर’ला सुद्धा श्रद्धेत (ईसान) सामील केले आहे आणि अशा प्रकारे मौलिक श्रद्धा पाचऐवजी सहा होतात. खरे तर ‘तकदीर’वर ईमान धारण करणे अल्लाहवर ईमानधारण करण्याचाच भाग आहे आणि कुरआनमध्ये याचा उल्लेख याचसाठी आला आहे. म्हणून या धारणेला मी एकेश्वरत्वाच्या व्याख्येतच समाविष्ट केले आहे. याच प्रकारे हदीसमध्ये जन्नत, जहन्नुम, सिरात व मिजानला वेगवेगळ्या धारणा म्हणून उल्लेखले आहे. खरे तर हे सर्व ‘आखिरत’वर ईमान धारण करण्याचाच भाग आहे.
इष्ट मंगलमय वचन; कल्म-ए-तैय्यबा
संबंधित पोस्ट
0 Comments